Old Car : 30 हजारात WagonR, स्वस्तात Swift Dzire !

देशातील सर्वात मोठी कार निर्माती कंपनी मारुती सुझुकी नव्या कारसोबतच जुन्या कारचीही खरेदी विक्री करते.

Old Car : 30 हजारात WagonR, स्वस्तात Swift Dzire !

Used Maruti Cars in Cheapest Price  मुंबई/नवी दिल्ली : देशातील सर्वात मोठी कार निर्माती कंपनी मारुती सुझुकी नव्या कारसोबतच जुन्या कारचीही खरेदी विक्री करते. कंपनी आपल्या Truevalue वेबसाईटवर परवडणाऱ्या किमतीत, सर्व दस्तऐवजांसह विविध कारची खरेदी-विक्री केली जाते. सध्या मारुतीच्या Truevalue वेबसाईटवर केवळ 30 हजार रुपयांपासून WagonR आणि Swift Dzire यासारख्या कार उपलब्ध आहेत.

महत्त्वाचं म्हणजे तुमच्या शहरातही जुन्या कार परवडणाऱ्या किमतीत उपलब्ध आहेत. सर्व कार काही 30 हजारात उपलब्ध नाहीत. कार जेवढी जुनी, तेवढी त्याची किंमत कमी आहे.

Maruti WagonR LX : अल्पावधित प्रसिद्धीस आलेली मारुतीची Maruti WagonR LX ही कार दिल्ली-मुंबईत विक्रीसाठी उपलब्ध आहे. दिल्लीत उपलब्ध असलेल्या या कारची सविस्तर माहिती वेबसाईटवर देण्यात आलेली आहे. त्यानुसार 2004 मधील या कारने 1 लाख 10 हजार 632 किमी प्रवास केला आहे. या कारची किंमत 30 हजार रुपये आहे.

Maruti Swift Dzire LDI:  मारुतीची लोकप्रिय स्विफ्ट डिझायर ही कार सर्वाधिक विक्री झालेली कार आहे. आकर्षक लूक, चांगलं मायलेज आणि बहुपयोगी असल्याने देशभरात या कारला पसंती मिळाली. Truevalue या वेबसाटईवर जुन्या स्विफ्ट कार विक्रीसाठी उपलब्ध आहेत. वेबसाईटवरील माहितीनुसार 2010 चं मॉडेल असलेल्या Maruti Swift Dzire LDI ने 82 हजार 370 किमीचा प्रवास केला आहे. दुसऱ्या मालकाद्वारे ही कार विक्रीसाठी ठेवण्यात आली आहे. दिल्लीत उपलब्ध असलेल्या या कारची किंमत 1 ला 8 हजार रुपये आहे.

नोट : कारबाबत दिलेली माहिती ही मारुतीची अधिकृत वेबसाईट ‘Truevalue’ वरील माहितीवरुन देण्यात आली आहे. वाहन खरेदी करताना तज्ज्ञांचा सल्ला घ्या.

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI