Vivo बजेट फोन: Vivo ने भारतात नवीन बजेट फोन केला लाँच; जाणून घ्या, किंमत अन् फिचर्स

| Updated on: May 09, 2022 | 4:42 PM

5000 Vivo Budget Phone: Vivo ने भारतात एक नवीन फोन लॉंच केला आहे. Vivo बजेट फोन या Vivo फोनच्या मागील पॅनलवर ड्युअल कॅमेरा सेटअप आहे, ज्यामध्ये फ्रन्ट कॅमेरा 13 मेगापिक्सेल आहे. यात 8-मेगापिक्सलचा फस्ट कॅमेरा आहे.

Vivo बजेट फोन: Vivo ने भारतात नवीन बजेट फोन केला लाँच; जाणून घ्या, किंमत अन् फिचर्स
Vivo Budget Phone
Image Credit source: Twitter
Follow us on

Vivo Budget Phone: Vivo ने भारतीय मोबाईल बाजारात आपला नवीन स्मार्टफोन लॉंच केला आहे. हा Y सीरीजचा स्मार्टफोन आहे. Vivo च्या या मोबाईलचे नाव Vivo Y15C आहे. या स्मार्टफोनच्या मुख्य वैशिष्ट्यांबद्दल  (features) बोलायचे झाल्यास, यात 5000 mAh बॅटरी, बॅक पॅनलवर ड्युअल कॅमेरा सेटअप, 3.5 मिमी जॅक आणि Android 12 मिळेल. यापूर्वी, कंपनीने Vivo Y15S देखील सादर केला होता, ज्याची सध्या किंमत 10490 रुपये असून, तो फ्लिपकार्टवर उपलब्ध (Available on Flipkart) आहे. Vivo Y15S हा फोन दोन प्रकारांमध्ये सादर करण्यात आला आहे, ज्यामध्ये एक 3 + 32 GB आणि दुसरा 3 + 64 GB स्टोरेज वेरिएंटसह येतो. यात मायक्रोएसडी कार्ड मिळेल. त्यात अतिरिक्त स्टोरेज कार्ड (Additional storage card) ठेवता येते.

Vivo Y15c चे स्पेसिफिकेशन

Vivo Y15c च्या स्पेसिफिकेशनबद्दल बोलायचे झाले तर, यात 6.51 इंच LCD डिस्प्ले आहे. हे HD+ रिझोल्यूशन आणि वॉटरड्रॉप नॉचसह येते. या Vivo फोनमध्ये MediaTek Helio P35 प्रोसेसर देण्यात आला आहे. तसेच, यात 3 GB रॅम आणि 64 GB पर्यंत स्टोरेज आहे. यामध्ये स्वतंत्र मायक्रोएसडी कार्डही ठेवता येईल. या फोनमध्ये 5000 mAh बॅटरी युनिट्स आहेत, जी 10W फास्ट चार्जिंगसह येते.

Vivo Y15c ची वैशिष्ट्ये

Vivo Y15c च्या फीचर्स सॉफ्टवेअरबद्दल बोलायचे झाले तर ते Android 12 आधारित Funtouch OS 12 वर काम करते. यात साइड माउंटेड फिंगरप्रिंट स्कॅनर आणि पॉवर बटण आहे. कनेक्टिव्हिटी पर्यायांबद्दल बोलायचे झाले तर फोनमध्ये MicroUSB पोर्ट, Dual 4G VoLTE, DigiTE, 3.5mm हेडफोन जॅक, WiFi आणि Bluetooth 5.2 आहे.

हे सुद्धा वाचा

Vivo Y15c चा कॅमेरा सेटअप

हे डिव्हाइस ग्रेडियंट बॅक पॅनल आणि वर्टिकल स्ट्रिप्ससह येते. यात चौकोनी आकाराचा कॅमेरा मॉड्यूल आहे. यात 13 मेगापिक्सल्सचा फ्रन्टं कॅमेरा आहे, तर 2 मेगापिक्सल्सचा सेंकड कॅमेरा देण्यात आला आहे. हा फोन 8 मेगापिक्सेल सेल्फी कॅमेरासह येतो. या फोनमध्ये फोटोग्राफीसाठी वेगवेगळे मोड देण्यात आले आहेत.

Vivo Y15c किंमत आणि रंग प्रकार

Vivo Y15c मिस्टिक ब्लू आणि वेव्ह ग्रीन रंगांमध्ये उपलब्ध करून दिला जाईल. तसेच, आतापर्यंत कंपनीने या बजेट फोनच्या किंमतीबद्दल माहिती दिलेली नाही.