AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Vivo ने दमदार पॉवर बॅटरीसह Vivo V70 सिरीज केली लाँच, जाणून घ्या किंमत आणि स्पेसिफिकेशन

Vivo V70 सिरीज भारतात लाँच करण्यात आली आहे, ज्यामध्ये Vivo V70 Elite आणि Vivo V70 यांचा समावेश आहे. दोन्ही फोनमध्ये 120Hz AMOLED डिस्प्ले, 90W फास्ट चार्जिंग, 50MP ट्रिपल चला जाणून घेऊया प्रत्येक स्मार्टफोनची किंमत किती आहे.

Vivo ने दमदार पॉवर बॅटरीसह Vivo V70 सिरीज केली लाँच, जाणून घ्या किंमत आणि स्पेसिफिकेशन
Image Credit source: Social media
| Edited By: | Updated on: Feb 21, 2026 | 4:16 PM
Share

भारतीय बाजारात Vivo V70 सिरीज लाँच करण्यात आली आहे, ज्यामध्ये Vivo V70 Elite आणि Vivo V70 या स्मार्टफोनचा समावेश आहे. दोन्ही फोन लवकरच ई-कॉमर्स प्लॅटफॉर्मवर आणि कंपनीच्या वेबसाइटवर विक्रीसाठी उपलब्ध होणार आहेत. मानक मॉडेल भारतात दोन शेडमध्ये उपलब्ध असेल, तर Elite मॉडेल तीन रंगांच्या पर्यायांमध्ये उपलब्ध असेल. चला तर मग आजच्या लेखात आपण या सिरीज मधील स्मार्टफोन कोणत्या किमतीत खरेदी करता येईल ते जाणून घेऊयात.

Vivo V70 Elite ची भारतातील किंमत

Vivo V70 Elite ची किंमत 8GB/256GB स्टोरेज व्हेरिएंटसाठी 51 हजार 999 रूपये आहे. तर 12GB/256GB स्टोरेज व्हेरिएंटसाठी 56 हजार 999 रूपये आणि 12GB/512GB स्टोरेज व्हेरिएंटसाठी 61 हजार 999 रूपये आहे. या किंमतीच्या रेंजमध्ये, हा फोन Samsung, Google Pixel आणि Apple iPhone सारख्या मॉडेल्सशी स्पर्धा करेल.

Vivo V70 ची भारतातील किंमत

दुसरीकडे, Vivo V70 या मोबाईल फोनच्या 8GB/256GB व्हेरिएंटची किंमत 45 हजार 999 रूपये आहे आणि 12GB/256GB व्हेरिएंटची किंमत 49 हजार 999 रूपये आहे. तुम्ही जर हा फोन खरेदी करताना SBI, HDFC बँक आणि Yes Bank कार्डचा वापर केल्यास तुम्हाला 10 टक्क्यांपर्यंत कॅशबॅक उपलब्ध असेल. नवीन Vivo फोनची विक्री भारतात 26 फेब्रुवारीपासून Flipkart आणि Vivo ऑनलाइन स्टोअरद्वारे सुरू होईल. या किंमतीच्या रेंजमध्ये हा फोन Samsung Galaxy S24 आणि Motorola च्या फ्लिप फोनसारख्या मॉडेल्सशी स्पर्धा करेल.

Vivo V70 Elite आणि Vivo V70 चे फीचर्स

स्क्रीन: दोन्ही फोनमध्ये 6.59-इंचाचा VM9 AMOLED डिस्प्ले आहे जो 120Hz पर्यंत रिफ्रेश रेट आणि 5000 निट्स पर्यंत पीक ब्राइटनेसला सपोर्ट करतो.

चिपसेट: Vivo V70 Elite मध्ये स्पीड आणि मल्टीटास्किंगसाठी Snapdragon 8S Gen 3 चिपसेट आहे, तर Vivo V70 मध्ये Snapdragon 7 Gen 4 प्रोसेसर आहे.

कॅमेरा: दोन्ही फोनमध्ये ट्रिपल रियर कॅमेरा सेटअप आहे, ज्यामध्ये 50-मेगापिक्सेलचा प्रायमरी सेन्सर, 50-मेगापिक्सेलचा सुपर टेलिफोटो सेन्सर आणि 8-मेगापिक्सेलचा अल्ट्रा-वाइड-अँगल सेन्सर आहे. सेल्फीसाठी, दोन्ही मॉडेल्समध्ये 50-मेगापिक्सेलचा सेन्सर आहे.

बॅटरी: फोनला पॉवर देण्यासाठी एक पॉवरफुल 6500 mAh बॅटरी देण्यात आली आहे, दोन्ही फोन 90 W फास्ट चार्जिंगला सपोर्ट करतात.

राज ठाकरे यांना आम्ही विकासासाठी सोबत घेणार, शिरसाटांचं विधान
राज ठाकरे यांना आम्ही विकासासाठी सोबत घेणार, शिरसाटांचं विधान.
राष्ट्रवादीच्या विलीनीकरणाची सुनील तटकरे यांनाही पूर्वकल्पना होती?
राष्ट्रवादीच्या विलीनीकरणाची सुनील तटकरे यांनाही पूर्वकल्पना होती?.
संजय राऊत आणि दादा भुसे यांच्यातील फौजदारी खटला संपला
संजय राऊत आणि दादा भुसे यांच्यातील फौजदारी खटला संपला.
टिपू सुलतानच्या मुद्द्यावर ठाकरे गटाची भूमिका काय? संजय राऊतांनी एका..
टिपू सुलतानच्या मुद्द्यावर ठाकरे गटाची भूमिका काय? संजय राऊतांनी एका...
रोहित पवारांचे VSR कंपनीवर गंभीर आरोप; SR कंपनीला एका बड्या नेत्याचा..
रोहित पवारांचे VSR कंपनीवर गंभीर आरोप; SR कंपनीला एका बड्या नेत्याचा...
बदलापूरमध्ये अंडाशय तस्करीचा धक्कादायक प्रकार उघड; तीन महिलांना अटक
बदलापूरमध्ये अंडाशय तस्करीचा धक्कादायक प्रकार उघड; तीन महिलांना अटक.
चंद्रपूरचा बदला भिवंडीत, काँग्रेसच्या पाठिंब्याने नारायण चौधरी महापौर
चंद्रपूरचा बदला भिवंडीत, काँग्रेसच्या पाठिंब्याने नारायण चौधरी महापौर.
भाजप- संघाला कुठलाही धोका नाही; सुरक्षा घेऊन... संजय राऊतांचा घणाघात
भाजप- संघाला कुठलाही धोका नाही; सुरक्षा घेऊन... संजय राऊतांचा घणाघात.
सत्ताधाऱ्यांनाही एक्सपायरी डेट राज ठाकरे यांचा हल्लाबोल
सत्ताधाऱ्यांनाही एक्सपायरी डेट राज ठाकरे यांचा हल्लाबोल.
ज्यांनी विरोध केला त्यांनी व्याख्यानाला यावे;अमोल कोल्हे स्पष्टच बोलले
ज्यांनी विरोध केला त्यांनी व्याख्यानाला यावे;अमोल कोल्हे स्पष्टच बोलले.