AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Vivo चा मोठा धमाका, आता ‘हे’ 2 स्मार्टफोन पूर्वीपेक्षा स्वस्त, लवकर करा खरेदी

Vivo ने T सीरिजच्या Vivo T3 Ultra आणि Vivo T3 Pro स्मार्टफोनच्या किंमतीत कपात केली आहे. प्रीमियम फीचर्स आणि ५जी सपोर्टसह येणारे हे फोन आता अधिकच परवडणारे झाले आहेत. जर तुम्ही नवीन स्मार्टफोन खरेदी करण्याचा विचार करत असाल तर विवोचे हे दोन फोन एक उत्तम पर्याय ठरू शकतात. ते तुम्ही फ्लिपकार्टवरून खरेदी करू शकता.

Vivo चा मोठा धमाका, आता 'हे' 2 स्मार्टफोन पूर्वीपेक्षा स्वस्त, लवकर करा खरेदी
Vivo चा मोठा धमाकाImage Credit source: Instagram
| Edited By: | Updated on: Jan 15, 2025 | 1:32 PM
Share

विवो कंपनी त्यांच्या स्टायलिश असलेल्या फोन डिझाइन आणि नाविन्यपूर्ण वैशिष्ट्यांसाठी जगभर ओळखली जाते. प्रीमियम परफॉर्मन्स आणि परवडणाऱ्या किमतींचे उत्तम कॉम्बिनेशन म्हणून कंपनीने T सीरिज सादर केली आहे. अशातच तुम्ही सुद्धा नवीन स्मार्टफोन घेण्याच्या त्याराची आहेत तर ही संधी तुमच्यासाठी उत्तम आहे. कारण आता विवोने Vivo T3 Ultra आणि Vivo T3 Pro या स्मार्टफोनच्या किंमती कमी केल्या आहेत जेणेकरून ते अधिक आकर्षक होतील, जेणेकरून ग्राहकांना ते खरेदी करता येईल.

Vivo ने T सीरिजच्या दोन स्मार्टफोनच्या किंमती कमी केल्या आहेत. Vivo T3 Ultra आणि Vivo T3 Pro आता कमी किंमतीत उपलब्ध आहेत. हे दोन्ही फोन ५जी सपोर्टसोबत येतात. ऑगस्ट २०२४ मध्ये हे स्मार्टफोन भारतात लाँच करण्यात आले होते. प्रीमियम फीचर्स असलेले हे स्मार्टफोन फ्लिपकार्टवर उपलब्ध आहेत. नवीन किमतींसह खरेदी करण्याची ही योग्य वेळ आहे. चला जाणून घेऊयात किंमत आणि फीचर्स

Vivo T3 Ultra किंमत आणि फीचर्स

Vivo T3 Ultra चे 8 जीबी + 128 जीबी असलेले मॉडेल पहिले 31,999 रुपयांना विकले जात होते. मात्र कंपनीने हे मॉडेल आता फक्त 29,999 रुपय किमतीत विकत आहे. तसेच 8 जीबी + 256 जीबी मॉडेल सुरुवातीला 33,999 रुपयांना विकले जात होते. मात्र कंपनीने हे मॉडेल आता फक्त31,999 रुपये आणि 12 जीबी + 256 जीबी व्हेरिएंट 33,999 रुपयांना उपलब्ध केले आहे. हा फोन मीडियायेक डायमेंसिटी ९२००+ प्रोसेसरसह तुम्हाला मिळणार आहे.तसेच यात ५० एमपी सोनी आयएमएक्स ९२१ कॅमेरा आणि ८ एमपी अल्ट्रा-वाइड कॅमेरा आहे. 5500 एमएएच बॅटरी 80 वॉट फास्ट चार्जिंगला सपोर्ट करते. या फोनला आयपी६८ रेटिंग मिळाले आहे.

Vivo T3 Pro किंमत आणि फीचर्स

Vivo T3 Pro च्या 8 जीबी + 128 जीबी व्हेरिएंटची किंमत 22,999 रुपये आणि 8 जीबी + 256 जीबी व्हेरिएंटची किंमत 24,999 रुपये आहे. यापूर्वी हे मॉडेल 24,999 रुपये आणि 26,999 रुपयांमध्ये उपलब्ध होते. यात क्वालकॉम स्नॅपड्रॅगन 7 जेन 3 चिपसेटचा सपोर्ट आहे. 50MP Sony IMX882 कॅमेरा आणि ८ एमपी अल्ट्रा-वाइड कॅमेरा आहे. याची 5500mAh बॅटरी ८० वॉट फास्ट चार्जिंगला सपोर्ट करते.

रिव्ह्यू आणि रेटिंग चेक करा

Vivo T3 Ultra आणि Vivo T3 Pro दोन्ही प्रीमियम डिझाइन आणि उत्कृष्ट कामगिरीसह येतात. नव्या किमतीत हे दोन्ही फोन त्यांच्या सेगमेंटमध्ये उत्तम पर्याय ठरू शकतात. हे स्मार्टफोन खरेदी करण्यापूर्वी कृपया त्यांचे रिव्ह्यू आणि रेटिंग तपासा आणि तुमच्या गरजेनुसार खरेदी करा.

बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो.
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं.
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!.
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?.
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?.
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.