AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

200 मेगापिक्सेल कॅमेऱ्यासह Vivo V70 FE स्मार्टफोन भारतात या दिवशी होणार लाँच, जाणून घ्या तारीख

Vivo V70 FE हा फोन लवकरच भारतात लॉन्च होणार आहे. कंपनीने Amazon वर एक मायक्रोसाइट आणि कंपनीच्या वेबसाइटवर एक पोस्ट तयार केली आहे. हा फोन ड्युअल रियर कॅमेऱ्यांसह देखील लॉन्च केला जाऊ शकतो. चला तर मग हा फोन भारतात कधी लाँच केला जाऊ शकतो ते जाणून घेऊयात.

200 मेगापिक्सेल कॅमेऱ्यासह Vivo V70 FE स्मार्टफोन भारतात या दिवशी होणार लाँच, जाणून घ्या तारीख
Vivo V70
| Edited By: | Updated on: Mar 24, 2026 | 3:26 PM
Share

विवो कंपनीने या महिन्याच्या सुरुवातीला इंडोनेशियामध्ये Vivo V70 सोबत Vivo V70 FE लाँच करण्यात आला होता. कंपनीने आता पुष्टी केली आहे की, हा फोन लवकरच V70 लाइनअपमधील तिसरा मॉडेल म्हणून भारतात लाँच केला जाईल. या लाइनअपमध्ये सध्या Vivo V70 Elite आणि Vivo V70 यांचा समावेश आहे. या आगामी फोनसाठी कंपनीच्या वेबसाइटवर आणि ॲमेझॉनवर एक समर्पित मायक्रोसाइट तयार करण्यात आली आहे, ज्याद्वारे कंपनी हळूहळू फोनची वैशिष्ट्ये उघड करेल. हा फोन भारतात किमान दोन रंगांच्या पर्यायांसह आणि ड्युअल रियर कॅमेरा युनिटसह दाखल होईल. चला तर मग हा फोन भारतात कधी लाँच केला जाऊ शकतो ते जाणून घेऊयात.

X वरील एका पोस्टमध्ये कंपनीने घोषणा केली आहे की Vivo V70 FE लवकरच भारतात लाँच केला जाईल. Amazon वरील फोनच्या मायक्रोसाइटवरून असेही सूचित होते की, लाँच झाल्यानंतर तो कंपनीच्या वेबसाइटसोबतच Vivo च्या अधिकृत वेबसाइटवरही विकला जाईल. इतकेच नाही, तर असेही समोर आले आहे की या फोनमध्ये ऑप्टिकल इमेज स्टॅबिलायझेशन (OIS) सह 200-मेगापिक्सलचा प्रायमरी कॅमेरा सेन्सर असेल.

जरी कंपनीने अद्याप फोनच्या लाँचची तारीख जाहीर केली नसली तरी, टेक ब्लॉगर पारस गुगलानी यांच्या दाव्यानुसार Vivo V70 FE भारतात 2 एप्रिल रोजी लाँच होऊ शकतो. यात टिपस्टरने सांगितले आहे की हा फोन 8 जीबी रॅम आणि 128 जीबी स्टोरेज, तसेच 12 जीबी रॅम आणि 256 जीबी स्टोरेज या व्हेरिएंटमध्ये उपलब्ध होऊ शकतो. या डिव्हाइसची किंमत 35 हजार रूपयांपेक्षा कमी असण्याची शक्यता आहे. तथापि सुरुवातीच्या बँक सवलती आणि कॅशबॅक ऑफर्ससह, बेस व्हेरिएंटची किंमत 30 हजारांपासून सुरू होऊ शकते.

ही इंडोनेशियामधील किंमत आहे

काही आठवड्यांपूर्वी म्हणजेच 9 मार्च रोजी कंपनीने इंडोनेशियामध्ये Vivo V70 FE हा फोन IDR 64,99,000 भारतीय चलनानुसार अंदाजे 35 हजार रूपयांच्या या सुरुवातीच्या किमतीत लाँच केला. ही किंमत 8 जीबी रॅम आणि 256 जीबी स्टोरेज असलेल्या फोनच्या बेस व्हेरिएंटसाठी आहे.

Follow Us
बाप्पा विसर्जनाच्या प्रतीक्षेत ताटकळला; उपनगरचा राजा काल सकाळपासून...
Ganpati Visarjan 2026 : बाप्पा विसर्जनाच्या प्रतीक्षेत ताटकळला; उपनगरचा राजा काल सकाळपासून मढ जेटीवरच, प्रशासनाच्या नियोजनावर प्रश्नचिन्ह
राज्यात दुष्काळ जाहीर; दत्ता भरणे नेमकं काय म्हणाले?
Maharashtra Drought Issue : राज्यात दुष्काळ जाहीर; दत्ता भरणे नेमकं काय म्हणाले?
राऊत अचानक राज ठाकरेंच्या भेटीला दोघांमध्ये नेमकी काय चर्चा?
Sanjay Raut Meet Raj Thackeray : संजय राऊत अचानक राज ठाकरेंच्या भेटीला शिवतीर्थवर! दोघांमध्ये नेमकी काय चर्चा? राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण
मोठी अपडेट समोर! ट्रिगर-1 म्हणजे काय? महाराष्ट्रातील दुष्काळ निवारण...
मोठी अपडेट समोर! ट्रिगर-1 म्हणजे काय? महाराष्ट्रातील दुष्काळ निवारणाचा पहिला टप्पा
मराठा आरक्षणासाठी जरांगे पाटील यांची नवी रणनीती; नेमकं काय ठरवलं?
मराठा आरक्षणासाठी जरांगे पाटील यांची नवी रणनीती; नेमकं काय ठरवलं?
मुख्यमंत्री फडणवीसांमुळे शेतकऱ्यांची दिवाळी गोड होणार; नेत्याचं...
मुख्यमंत्री फडणवीसांमुळे शेतकऱ्यांची दिवाळी गोड होणार... बड्या नेत्याचं विधान चर्चेत
राज्यातील 265 तालुक्यात दुष्काळ जाहीर विरोधक काय म्हणतात?
Maharashtra Drought Issue : राज्यातील 265 तालुक्यात दुष्काळ जाहीर विरोधक काय म्हणतात?
मोठी बातमी! महाराष्ट्रातील 75 टक्के भागात दुष्काळ जाहीर; म्हणजेच 265..
मोठी बातमी! महाराष्ट्रातील 75 टक्के भागात दुष्काळ जाहीर; म्हणजेच 265 तालुक्यांमध्ये...
अखेरचं मुख दर्शन; लालबागच्या राजाला कार्यकर्त्यांचा भावनिक निरोप
Lalbagcha Raja 2026 : अखेरचं मुख दर्शन; लालबागच्या राजाला कार्यकर्त्यांचा भावनिक निरोप
डोळ्यांत सामावून घेण्यासारखा क्षण; लालबागच्या राजाचे दिमाखात विसर्जन
डोळ्यांत सामावून घेण्यासारखा क्षण; लालबागच्या राजाचे दिमाखात विसर्जन