किंमत फक्त 62,999… Vivo चा तगडा फोन लॉन्च, जेनजींनाही या धमाकेदार फिचर्सची भुरळ

नवा Vivo V80 स्मार्टफोन भारतात लॉन्च झाला आहे, ज्याची किंमत ₹62,999 पासून सुरू होते. यात 6.59 इंचाचा AMOLED डिस्प्ले, Snapdragon 7 Gen 4 प्रोसेसर, 50MP Zeiss ट्रिपल कॅमेरा सेटअप आणि 7,200mAh बॅटरी आहे. जेनझींना आकर्षित करणारी ही दमदार वैशिष्ट्ये 13 ऑक्टोबरपासून फ्लिपकार्टवर उपलब्ध होतील.

किंमत फक्त 62,999... Vivo चा तगडा फोन लॉन्च, जेनजींनाही या धमाकेदार फिचर्सची भुरळ
Vivo V80 Launched
Image Credit source: tv9 marathi
| Updated on: Oct 06, 2026 | 5:16 PM

विवोने भारतात आपला नवीन Vivo V80 स्मार्ट फोन लॉन्च केला आहे. हा फोन कंपनीच्या V-सीरीजमधील Vivo V70च्या पुढचं मॉडल आहे. V80ला भारतात तीन स्टोअरेज व्हेरिएंटमध्ये लॉन्च करण्यात आलं आहे. या 8GB RAM आणि 128GB स्टोअरेज असणाऱ्या बेस मॉडलची किंमत 62,999 रुपये ठेवण्यात आली आहे. तर, 8GB RAM आणि 256GB स्टोअरेज व्हेरिएंटची किंमत 69,999 रुपये ठेवण्यात आली आहे. टॉप मॉडल 8GB RAM आणि 512GB सोबत मिळत आहे. त्याची किंमत 79,999 रुपये आहे. या फोनमधील फिचर्स अत्यंत धमाकेदार असून जेनजींनाही त्याची भुरळ पडली आहे.

हा फोन तीन कलरमध्ये देण्यात आला आहे. स्टेलर ब्लॅक, होरिझोन ब्ल्यू आणि सनराईज अन्थेम कलरमध्ये हा फोन खरेदी करता येणार आहे. भारतात या फोनची विक्री 13 ऑक्टोबरपासून सुरू होणार आहे. Flipkart आणि Vivoच्या ऑनलाइन स्टोअरमध्ये ही विक्री सुरू होणार आहे. लॉन्च ऑफरच्या अंतर्गत ग्राहकांना 10 टक्क्यापर्यंत इन्स्टेंट कॅशबॅक वा 10 टक्के एक्सचेंज बोनस मिळणार आहे. त्याशिवाय 100GB Google One क्लाउड स्टोअरेज विना अतिरिक्त किंमतीत देण्यात येणार आहे.

Loading...

हटके डिस्प्ले

Vivo V80 मध्ये 6.59 इंचाचा AMOLED डिस्प्ले देण्यात आला आहे. त्याचे रिझोल्यूशन 1,260×2,750 पिक्सल आहे आणि हा 144Hz रिफ्रेश रेट सपोर्ट करतो. कंपनीच्या मते, स्क्रीनमध्ये लोकल पीक ब्रायटनेस 5 हजार निट्स पर्यंत आणि HBM ब्रायटनेस 1,800 निट्स पर्यंत आहे. डिस्प्लेमध्ये 3 वाइड कलर गॅमट आणि 459ppi पिक्सल डेन्सिटी देण्यात आली आहे. 144Hz रिफ्रेश रेटच्यामुळे स्क्रॉलिंग आणि अॅनिमेशन अधिक स्मूथ ठेवण्यात आले आहे.

Snapdragon 7 Gen 4 प्रोसेसर

फोनमध्ये Qualcommचे Snapdragon 7 Gen 4 प्रोसेसर देण्यात आले आहेत. हे 4nm प्रोसेसवर तयार करण्यात आले आहे. Vivo V80मध्ये 8GB LPDDR4X RAM आणि 512GB पर्यंत UFS 3.1 स्टोअरेजचा पर्याय मिळतो. सॉफ्टवेअरबाबत बोलायचं झालं तर हा फोन Android 17 वर बेस्ड OriginOS 7 वर चालतो.

50MP Zeiss कॅमेरा सेटअप

V80 ची सर्वात मोठी खासियत म्हणजे त्याचा कॅमेरा सेटअप आहे. फोनच्या मागे ट्रिपल कॅमेरा सिस्टिम देण्यात आली आहे. यात 50MP चा मेन कॅमेरा देण्यात आला आहे. हा कॅमेरा ऑटोफोकस, OIS आणि f/1.88 अपर्चरसोबत देण्यात आलेला आहे. त्याशिवाय 50MP चा Zeiss नाइट टेलिफोटो कॅमेराही देण्यात आला आहे. यात ऑटोफोकस आणि OIS मिळतो. तिसरा कॅमेरा 8MPचा अल्ट्रा वाइड अँगल लेन्सचा आहे. यात 115 डिग्री फील्ड ऑफ व्ह्यू मिळतो. सेल्फी आणि व्हिडिओ कॉलसाठी फोनमध्ये 50MP Zeiss ग्रुप सेल्फी कॅमेरा देण्यात आला आहे. यात ऑटोफोकस आणि 92 डिग्री फील्ड ऑफ व्ह्यू देण्यात आले आहे.

दमदार बॅटरी

V80 मध्ये 7,200mAh ची मोठी बॅटरी देण्यात आली आहे. फोन 90W फास्ट चार्जिंग सपोर्ट करतो. कंपनीने याला IP68 आणि IP69 रेटिंग दिली आहे. त्यामुळे फोनला धूळ आणि पाण्यापासून चांगली सेफ्टी मिळते. कनेक्टिव्हिटीसाठी फोनमध्ये 5G, Wi-Fi, Bluetooth 5.4, GPS, NFC आणि USB Type-C पोर्ट देण्यात आले आहे. USB पोर्ट USB 2.0 ला सपोर्ट करतो. फोनमध्ये इंफ्रारेड ब्लास्टर आणि X-axis linear motor सुद्धा देण्यात आला आहे. याशिवाय एक्सेलेरोमीटर, जायरोस्कोप, प्रॉक्सिमिटी सेंसर, एंबिअंट लाइट सेंसर आणि इलेक्ट्रॉनिक कंपास सारखे सेंसरही देण्यात आले आहेत. Vivo V80चे वजन 203 ग्रॅम आहे आणि त्याची साईज 157.52×74.33×7.69mm आहे.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us