कमी किंमत आणि दमदार फीचर्ससह Vivo Y73 भारतात लाँच

| Updated on: Jun 10, 2021 | 10:17 PM

चीनी स्मार्टफोन ब्रँड व्हिवोने (Vivo) गुरुवारी आपल्या भारतीय युजर्ससाठी 20,990 रुपयांमध्ये सिंगल व्हेरिएंट स्मार्टफोन Y73 सादर केला.

कमी किंमत आणि दमदार फीचर्ससह Vivo Y73 भारतात लाँच
Vivo Y73
Follow us on

मुंबई : चीनी स्मार्टफोन ब्रँड व्हिवोने (Vivo) गुरुवारी आपल्या भारतीय युजर्ससाठी 20,990 रुपयांमध्ये सिंगल व्हेरिएंट स्मार्टफोन Y73 सादर केला. हा स्मार्टफोन मीडियाटेक हेलिओ G95 प्रोसेसरद्वारे सपोर्टेड आहे. या स्मार्टफोनमध्ये 8 जीबी रॅम आणि 128 जीबी इंटर्नल स्टोरेज स्पेस आहे, ही स्पेस मायक्रो एसडी कार्डद्वारे 1 टीबी पर्यंत वाढवता येईल. हा फोन अँड्रॉयड 11 वर आधारीत लेटेस्ट फनटच ओएस 11.1 वर चालतो. (Vivo Y73 launched in India with MediaTek Helio G95 SoC)

स्मार्टफोनमध्ये 6.44 इंचांचा एमोलेड डिस्प्ले फुल एचडी प्लस अल्ट्रा हाय-रिजॉल्यूशनसह देण्यात आला आहे. यात ट्रिपल रियर कॅमेरा सेटअप आहे ज्यामध्ये 64 MP प्रायमरी कॅमेरा, 2 MP बोकेह सेन्सर आणि 2 MP मॅक्रो सेन्सर देण्यात आला आहे. सेल्फीसाठी फोनमध्ये 16 MP चा फ्रंट कॅमेरा देण्यात आला आहे.

स्मार्टफोनमध्ये 33W फास्ट चार्जिंगसह 4000mAh क्षमतेची बॅटरी देण्यात आली आहे. यात अल्ट्रा गेम मोड फीचरदेखील आहे, ज्याद्वारे नोटिफिकेशन्स ब्लॉक करुन कोणत्याही अडथळ्यांशिवाय युजर्स गेम्स खेळू शकतात. हा स्मार्टफोन अनुकूलित फ्रेम रेट आणि टेम्परेचर अॅलोकेशनसह येतो, जो सीपीयूला अधिक नियंत्रित करतो.

याव्यतिरिक्त, मल्टी-टर्बो ART++ टर्बो सह अपडेट केले गेले आहे, ज्यामुळे फोनचा परफॉर्मन्स सुधारतो. हा स्मार्टफोन डायमंड फ्लेअर आणि रोमन ब्लॅक अशा दोन रंगांमध्ये ऑनलाइन आणि ऑफलाइन विक्रीसाठी उपलब्ध आहे. फोनमध्ये 4 जी, ड्युअल सिम, 2.4 / 5GHz वायफाय, ब्लूटूथ 5.0 सारखे फीचर्स देण्यात आले आहेत.

इतर बातम्या

दमदार प्रोसेसर आणि डिस्प्लेसह Realme X7 Max 5G भारतात लाँच, जाणून घ्या किंमत आणि फीचर्स

लाँचिंगपूर्वीच Samsung Galaxy Tab S8 ची किंमत आणि फीचर्स लीक, जाणून घ्या काय असेल खास?

OnePlus चा किफायतशीर स्मार्टफोन लाँचिंगसाठी सज्ज, जाणून घ्या किंमत आणि फीचर्स

(Vivo Y73 launched in India with MediaTek Helio G95 SoC)