AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Vivo Y75s 5G चा स्टायलिश लूक पाहिलात का? दमदार कॅमेर्‍यासह मजबूत बॅटरी बॅकअप

Vivo Y75s 5G स्मार्टफोन नुकताच लाँच करण्यात आला आहे, हा Vivo मोबाईल फोन 64 मेगापिक्सेल ट्रिपल रियर कॅमेरा सेटअपसह दाखल झाला आहे. या लेखाच्या माध्यमातून याच्या किंमतीसह इतर दमदार फीचर्सची माहिती घेणार आहोत.

Vivo Y75s 5G चा स्टायलिश लूक पाहिलात का? दमदार कॅमेर्‍यासह मजबूत बॅटरी बॅकअप
दमदार कॅमेर्‍यासह मजबूत बॅटरी बॅकअप
| Edited By: Govinda Hatwar | Updated on: Sep 07, 2022 | 5:40 PM
Share

विवो वाय 75 एस 5जी (Vivo Y75s 5G) हा स्मार्टफोन नुकताच दाखल करण्यात आला आहे. महत्वाच्या फीचर्सबद्दल बोलायचे झाल्यास या स्मार्टफोनमध्ये 64 मेगापिक्सेल ट्रिपल रियर कॅमेरा (camera) सेटअप आणि मीडियाटेक प्रोसेसरचा (processor) वापर करण्यात आला आहे. या सोबतच अनेक अत्याधुनिक फीचर्सचा यात वापर करण्यात आला आहे. फोनमध्ये 12 जीबीपर्यंत LPPDR4x रॅम आणि 256 जीबीपर्यंत UFS 2.2 स्टोरेज आहे, मायक्रोएसडी कार्डच्या मदतीने स्टोरेज 1 टीबीपर्यंत वाढवणे शक्य आहे.

Vivo Y75s 5G ची किंमत

विवो स्मार्टफोनच्या 8 जीबी रॅम आणि 256 जीबी स्टोरेज व्हेरिएंटची किंमत अंदाजे 22,000 रुपये आहे. त्याच वेळी, 12 जीबी रॅमसह 256 जीबी स्टोरेज व्हेरिएंटची किंमत सुमारे 25,000 रुपये आहे. फोन ब्लॅक आणि इतर ग्रेडियंट कलर पर्यायांसह लॉन्च करण्यात आला आहे.

डिस्प्ले : फोनमध्ये 60Hz रिफ्रेश रेटसह 6.58 इंच फुल एचडी प्लस (1080×2408 पिक्सेल) एलसीडी डिस्प्ले आहे.

प्रोसेसर : स्पीड आणि मल्टीटास्किंगसाठी, फोनला MediaTek Dimensity 700 octa-core प्रोसेसरसह ग्राफिक्ससाठी Mali G57 GPU देण्यात आला आहे.

रॅम आणि स्टोरेज : फोनमध्ये 12 जीबीपर्यंत LPPDR4x रॅम आणि 256 जीबीपर्यंत UFS 2.2 स्टोरेज आहे, मायक्रोएसडी कार्डच्या मदतीने स्टोरेज 1 टीबीपर्यंत वाढवणे शक्य आहे.

कॅमेरा : फोनच्या मागील बाजूस तीन कॅमेरे, 64 मेगापिक्सलचा प्रायमरी सेंसर, 8 मेगापिक्सेल अल्ट्रा-वाइड अँगल लेंस आणि 2 मेगापिक्सेल मॅक्रो कॅमेरा सेंसर देण्यात आला आहे. सेल्फीसाठी 8 मेगापिक्सेल फ्रंट कॅमेरा सेंसर उपलब्ध होईल.

बॅटरी : फोनमध्ये जिवंतपणा आणण्यासाठी 18 वॅट फ्लॅश चार्ज सपोर्टसह 5000 mAh बॅटरी देण्यात आली आहे.

कनेक्टिव्हिटी : फोनमध्ये 3.5 मिमी हेडफोन जॅक, यूएसबी टाइप-सी पोर्ट, ब्लूटूथ व्हेरिएंट 5.1 आणि ड्युअल सिम सपोर्ट सारखे फीचर्स देण्यात आली आहेत. सेफ्टीसाठी फोनच्या बाजूला फिंगरप्रिंट सेंसर देण्यात आला आहे.

Follow Us
नुसते दौरे करण्यापेक्षा मदत घेऊन जा; राऊतांचा विरोधकांना...
नुसते दौरे करण्यापेक्षा मदत घेऊन शेतकऱ्यांकडे जा; संजय राऊतांचा विरोधकांना सल्ला
CM फडणवीसांचा विरोधकांवर निशाणा, निवडणूक आयोगावरील आरोपांवरून सुनावलं
CM फडणवीसांचा विरोधकांवर निशाणा, निवडणूक आयोगावरील आरोपांवरून सुनावलं
ठाकरे बंधूंची एकत्र पत्रकार परिषद! 4 ऑक्टोबरच्या मोर्चापूर्वी...
ठाकरे बंधूंची एकत्र पत्रकार परिषद! 4 ऑक्टोबरच्या मोर्चापूर्वी राज-उद्धव ठाकरे घेणार मोठा निर्णय?
EVM मॅनेज केला जात आहे? रोहित पवारांच्या दाव्यांनी राजकारणात खळबळ
EVM मॅनेज केला जात आहे? रोहित पवारांच्या दाव्यांनी राजकारणात खळबळ
आदित्य ठाकरेंचा दुष्काळ पाहणी दौरा, शेतकऱ्यांना तातडीने मदती करण्याची
आदित्य ठाकरेंचा दुष्काळ पाहणी दौरा, शेतकऱ्यांना तातडीने मदती करण्याची मागणी
दुष्काळात लग्न साधं करण्याच्या आवाहनावर राऊत आक्रमक; विखेंना...
दुष्काळात लग्न साधं करण्याच्या आवाहनावर राऊत आक्रमक; विखेंना दिलं उत्तर
मुंबईत गोंधळ केलेला चालणार नाही, तुम्हाला...ठाकरे बंधूंच्या मोर्चावर..
मुंबईत गोंधळ केलेला चालणार नाही, तुम्हाला...ठाकरे बंधूंच्या मोर्चावर सदावर्तेंचा थेट इशारा
मतदारांची नावे वगळल्याचा आरोप; ठाकरे बंधूंचा 4 ऑक्टोबरला निवडणूक...
मतदारांची नावे वगळल्याचा आरोप; ठाकरे बंधूंचा 4 ऑक्टोबरला निवडणूक आयोगाविरोधात मोर्चा
SIR प्रक्रियेवर निवडणूक आयोगाचा खुलासा; ‘सर्व निर्णय सहमतीने...
SIR प्रक्रियेवर निवडणूक आयोगाचा खुलासा; सर्व निर्णयांबाबत दिलं स्पष्टीकरण, महाराष्ट्रात...
अधिकारी फिरकलेच नाहीत; शेतकऱ्याचा थेट कृषिमंत्र्यांना फोन, म्हणाले...
अधिकारी फिरकलेच नाहीत; शेतकऱ्याचा थेट कृषिमंत्र्यांना फोन, म्हणाले...