व्होडाफोनची ऑफर, ग्राहकांना मिळणार 50 जीबी एक्स्ट्रा डेटा, जाणून घ्या सविस्तर

व्होडाफोन-आयडियाच्या मोबाईल अ‍ॅपवरुन रिचार्ज केल्यास ग्राहकांना बोनस डेटा मिळणार आहे. | Vodafone Idea

व्होडाफोनची ऑफर, ग्राहकांना मिळणार 50 जीबी एक्स्ट्रा डेटा, जाणून घ्या सविस्तर
2,595 रुपयांच्या या प्रीपेड प्लॅनची वैधता एका वर्षाची आहे. त्यामध्ये आता ग्राहकांना 50 जीबी इतका बोनस डेटा मिळेल.
Follow us
| Updated on: Jan 27, 2021 | 3:32 PM

मुंबई: व्होडाफोन कंपनीने नव्या ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी एक नवा प्लॅन आणला आहे. या प्लॅननुसार व्होडाफोन (Vodafone) कंपनीकडून आपल्या 2,595 रुपयांच्या प्रीपेड प्लॅनमध्ये बोनस डेटा दिला जाणार आहे. व्होडाफोन-आयडियाच्या मोबाईल अ‍ॅपवरुन तुम्ही या प्लॅनचा रिचार्ज करु शकता. (Vodafone Idea 2595 prepaid recharge)

50 जीबी एक्स्ट्रा डेटा

व्होडाफोन-आयडियाच्या मोबाईल अ‍ॅपवरुन रिचार्ज केल्यास ग्राहकांना बोनस डेटा मिळणार आहे. कंपनीच्या संकेतस्थळावरुन रिचार्ज करणाऱ्यांसाठी ही ऑफर उपलब्ध नाही. 2,595 रुपयांच्या या प्रीपेड प्लॅनची वैधता एका वर्षाची आहे. त्यामध्ये आता ग्राहकांना 50 जीबी इतका बोनस डेटा मिळेल.

बोनस डेटा एक वर्ष मिळणार का?

व्होडाफोन-आयडियाच्या मोबाईल अ‍ॅपवर 50 जीबी एक्स्ट्रा डेटाची ऑफर दिसत आहे. मात्र, हा एक्स्ट्रा डेटा कधीपर्यंत मिळणार, याविषयी कंपनीने कोणतीही माहिती दिलेली नाही. त्यामुळे हा 50 जीबी एक्स्ट्रा डेटा काही दिवसांपुरताच मर्यादित असेल, असा अंदाज आहे. सध्या 2,595 रुपयांच्या या प्रीपेड प्लॅनमध्ये 2 जीबी डेटा एफयूपी लिमिटसह मिळतो. या प्लॅनमध्ये देशभरात कुठेही अनलिमिटेड व्हॉईस कॉलची सुविधा आहे. तसेच प्रत्येक दिवसाला 100 एसएमएस मोफत आहेत. याशिवाय, हा प्लॅन घेणाऱ्यांना ZEE 5 या ओटीटी प्लॅटफॉर्मचे एका वर्षाचे सबस्क्रिप्शनही मोफत मिळते.

ग्राहकांना मिळणार एकूण 780 जीबी डेटा

सध्या 2,595 रुपयांच्या या प्रीपेड प्लॅनमध्ये ग्राहकांना 730 जीबी डेटा दिला जातो. मात्र, बोनस डेटाचा विचार केल्यास एकूण 780 जीबी डेटा ग्राहकांना मिळेल. व्होडाफोन-आयडियाच्या मोबाईल अ‍ॅपवरून रिचार्ज मारल्यावरच ग्राहकांना एक्स्ट्रा 50 जीबी डेटा मिळेल. या प्लॅनमध्ये वीकेंड रोलओव्हर डेटा ही ऑफरही आहे. त्यामुळे तुम्ही आठवडाभरात वाचवलेला डेटा वीकेंड म्हणजे शनिवारी आणि रविवारी वापरु शकता.

व्होडाफोनच्या प्‍लानमध्ये अ‍ॅमेझॉन प्राईमचं एक वर्षाचं सब्सक्रिप्शन

व्होडाफोन, आयडिया, पोस्टपेड प्लान 499 रुपयांचं आहे. ओटीटी बेनिफिट्स असलेल्या या वोडाफोन आयडिया पोस्टपेड प्लानमध्ये 75 जीबी डेटा, दर महिन्याला 100 एसएमएस आणि कुठल्याही नेटवर्कला अनलिमिटेड कॉलिंगसोबत 200 जीबी रोलओव्हर ची सुविधा देखील आहे.

हा प्लान युझरला 999 रुपये किंमतीचा अ‍ॅमेझॉन प्राईम व्हिडीओचं एक वर्षाचं सब्सक्रिप्शन मिळतं. 1 वर्षाचं झी-5 प्रि‍म‍िअमसोबतच व्हीआय मुव्हिज अँड टीव्हीचंही फ्री एक्सेस मिळतं. नेटफ्लिक्स आणि डिझनी प्लस हॉटस्टार दोन्ही ओटीटी अ‍ॅप्सचा फायदा व्हिआय प्लान ऑफर करत नाही.

संबंधित बातम्या:

Xiaomi कडून या ढासू स्मार्टफोनच्या किंमतीत कपात, स्वस्तात खरेदी करा प्रीमियम स्मार्टफोन

Samsung च्या या ढासू स्मार्टफोनवर 10 हजार रुपयांहून अधिक डिस्काऊंट

Amazon Great Republic Day Sale ची जबरदस्त ऑफर; फक्त 1130 रुपयांत आणा 52 हजारांचा स्मार्ट टीव्ही

(Vodafone Idea 2595 prepaid recharge)

Non Stop LIVE Update
कीर्तिकर यांचा मुलाला बिनविरोध निवडून आणण्याचा कट होता, दरेकरांचा आरोप
कीर्तिकर यांचा मुलाला बिनविरोध निवडून आणण्याचा कट होता, दरेकरांचा आरोप.
भोंगळ कारभारावर ठाकरे गटाच बोट, मतदान संथ गतीनं का? अनिल देसाईंचा सवाल
भोंगळ कारभारावर ठाकरे गटाच बोट, मतदान संथ गतीनं का? अनिल देसाईंचा सवाल.
पुणे अपघात प्रकरणी विशाल अग्रवालला 3 दिवसांची पोलीस कोठडी
पुणे अपघात प्रकरणी विशाल अग्रवालला 3 दिवसांची पोलीस कोठडी.
अतिउत्साही कार्यकर्त्यांचा नादच खुळा, निकालापूर्वी झळकवले विजयाचे बॅनर
अतिउत्साही कार्यकर्त्यांचा नादच खुळा, निकालापूर्वी झळकवले विजयाचे बॅनर.
अग्रवाल कुटुंबाचा अंडरवर्ल्ड डॉनशी संबंध, शिवसेना नेत्याचा गंभीर आरोप
अग्रवाल कुटुंबाचा अंडरवर्ल्ड डॉनशी संबंध, शिवसेना नेत्याचा गंभीर आरोप.
कीर्तिकरांना मातोश्रीवर लोटांगण घालण्याची घाई, त्यांची.. कुणाची मागणी?
कीर्तिकरांना मातोश्रीवर लोटांगण घालण्याची घाई, त्यांची.. कुणाची मागणी?.
बाल हक्क न्यायालयाचा निर्णय हा... पुणे अपघातावर अमृता फडणवीसांचा संताप
बाल हक्क न्यायालयाचा निर्णय हा... पुणे अपघातावर अमृता फडणवीसांचा संताप.
लोकसभा निवडणुका संपताच राज ठाकरे क्रिकेटच्या मैदानावर; टॉस उडवून...
लोकसभा निवडणुका संपताच राज ठाकरे क्रिकेटच्या मैदानावर; टॉस उडवून....
'तुमच्या व्यवस्थेने 2 जीव घेणाऱ्या हैवानाला पिझ्झा खाऊ घातला'
'तुमच्या व्यवस्थेने 2 जीव घेणाऱ्या हैवानाला पिझ्झा खाऊ घातला'.
मान्सूनची वाट पाहणाऱ्यांसाठी आनंदाची बातमी, राज्यात कधी होणार आगमन?
मान्सूनची वाट पाहणाऱ्यांसाठी आनंदाची बातमी, राज्यात कधी होणार आगमन?.