AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

आता 28 नव्हे 31 दिवसांचा रिचार्जही मिळणार, Vodafone Idea चे कॅलेंडर मंथ व्हॅलिडिटी प्लॅन लाँच

रिलायन्स जिओ (Reliance Jio) आणि एअरटेल नंतर, आता दूरसंचार ऑपरेटर कंपनी व्होडाफोन आयडियाने (Vodafone Idea) 30 आणि 31 दिवसांच्या वैधतेसह प्रीपेड प्लॅन सादर केले आहेत. ज्याची किंमत 327 आणि 337 रुपये आहे. हे प्लॅन 30 दिवसांच्या वैधतेसह येतात.

आता 28 नव्हे 31 दिवसांचा रिचार्जही मिळणार, Vodafone Idea चे कॅलेंडर मंथ व्हॅलिडिटी प्लॅन लाँच
Image Credit source: File
अक्षय चोरगे, टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम
अक्षय चोरगे, टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम | Updated on: Apr 03, 2022 | 4:47 PM
Share

मुंबई : रिलायन्स जिओ (Reliance Jio) आणि एअरटेल नंतर, आता दूरसंचार ऑपरेटर कंपनी व्होडाफोन आयडियाने (Vodafone Idea) 30 आणि 31 दिवसांच्या वैधतेसह प्रीपेड प्लॅन सादर केले आहेत. ज्याची किंमत 327 आणि 337 रुपये आहे. हे प्लॅन 30 दिवसांच्या वैधतेसह येतात. यामध्ये दररोज 2GB डेटा मिळतो, त्यामुळे युजर्सना महिन्यानुसार 56GB ते 62GB पर्यंत डेटा मिळतो. TRAI (Telecom Regulatory Authority of India) ने दूरसंचार ऑपरेटर्सना किमान एक प्रीपेड प्लॅन (मंथ व्हॅलिडिटीसह) समाविष्ट करण्यास सांगितल्यानंतर, ऑपरेटर कंपनीने मासिक प्लॅन सुरू केले आहेत. यापूर्वी जिओने मासिक प्लॅन ऑफर केले होते. ज्याची वैधता 30 आणि 31 दिवसांची आहे. या प्लॅन्सचे त्याच तारखेला नूतनीकरण केले जाते. तसेच, त्यांना कॅलेंडर महिना वैधता योजना (Calendar month validity plan) असेही म्हणतात.

Vodafone Idea चे नवीन प्लॅन

Vodafone Idea चा 327 रुपयांचा प्रीपेड प्लॅन 30 दिवसांच्या वैधतेसह येतो. हा प्लॅन दररोज 100 एसएमएससह एकूण 25GB डेटा ऑफर करतो. प्रीपेड प्लॅनमध्ये दररोज 100 एसएमएस देखील उपलब्ध आहेत. यासह, प्रीपेड प्लॅन अनलिमिटेड व्हॉईस कॉल्स, Vi Movies आणि टीव्ही सबस्क्रिप्शनची मोफत मेम्बरशिप देतो. प्रीपेड प्लॅन मोठी व्हॅलिडिटी ऑफर करत असताना, यात दैनंदिन डेटाचा लाभ मिळत नाही. या प्लॅनमध्ये ग्राहकांना एकूण 25GB डेटा मिळेल.

त्याचप्रमाणे, Vodafone Idea चा 337 रुपयांचा प्रीपेड प्लॅन 31 दिवसांच्या व्हॅलिडिटीसह येतो. प्रीपेड प्लॅन दररोज 100 SMS सह एकूण 28GB पर्यंत डेटा ऑफर करतो. यासह, प्रीपेड प्लॅन अनलिमिटेड व्हॉईस कॉल्स, Vi Movies आणि टीव्ही सबस्क्रिप्शनची मोफत मेंबरशिप देतो. हा प्रीपेड प्लॅन दैनिक डेटा देत नाही ही बाब युजर्ससाठी निराशाजनक असू शकते.

Jio चा कॅलेंडर मंथ व्हॅलिडिटी प्लॅन

रिलायन्स जिओने गेल्या आठवड्यात एक नवीन प्रीपेड प्लॅन ऑफर केला आहे. कंपनीने हा प्लॅन ‘कॅलेंडर मंथ व्हॅलिडिटी’ (Calendar Month Validity) या टॅगलाइनसह लॉन्च केला आहे. त्याची किंमत 259 रुपये आहे. युजर्सना यात एका कॅलेंडर महिन्यासाठी अनलिमिटेड डेटा आणि कॉलिंगचे फायदे मिळतात. या प्लॅनची व्हॅलिडिटी 30 दिवस आणि 31 दिवसांची वैधता. कंपनीने दावा केला आहे की संपूर्ण महिन्याच्या वैधतेसह प्लॅन सादर करणारी जिओ ही देशातील पहिली टेलिकॉम कंपनी आहे. या प्लॅनमध्ये युजर्सना दररोज 1.5GB डेटा, 100 SMS/दिवस आणि अनलिमिटेड व्हॉइस कॉलिंगची सुविधा मिळते. विशेष म्हणजे आता एका वर्षात रिचार्जची संख्या फक्त 12 असेल. पूर्वी 28 दिवसांच्या वैधतेच्या प्लॅनमध्ये युजर्सना एका वर्षात 13 रिचार्ज करावे लागत होते.

यासह, प्लॅनमधील दैनिक डेटा संपल्यानंतर, डेटा स्पीड 64 Kbps पर्यंत खाली येतो. या व्यतिरिक्त, प्लॅनमध्ये काही अतिरिक्त फायदे देखील आहेत ज्या अंतर्गत युजर्सना JioCinema, JioTV, JioCloud आणि JioSecurity सारख्या Jio अॅप्समध्ये फ्री अॅक्सेस मिळतो.

इतर बातम्या

150W अल्ट्राडार्ट फास्ट चार्जिंगसह Realme GT Neo3 बाजारात, लाँचिंगसाठी उरले काही तास

Apple Down : ॲपलच्या सेवा ठप्प, App Store, Music सह अनेक ॲप्सवर परिणाम

क्वाड कॅमेरा सेटअपसह Samsung चा 5G स्मार्टफोन भारतात लाँच, जाणून घ्या किंमत आणि फीचर्स

Follow Us
शिवसेना सुनावणी, नीट आंदोलन, राजकीय घडामोडींचा आढावा
महाराष्ट्रातील महत्त्वाच्या बातम्या: शिवसेना सुनावणी, नीट आंदोलन, राजकीय घडामोडींचा आढावा
आवडत्या शिक्षकाची बदली रोखण्यासाठी विद्यार्थी थेट आमदारांकडे पोहोचले,
आवडत्या शिक्षकाची बदली रोखण्यासाठी विद्यार्थी थेट आमदारांकडे पोहोचले, मग शिंदेंच्या आमदाराने काय प्रतिक्रिया दिली पाहा...
मोठी खळबळ! कुंभमेळा घोटाळ्यात मत्री गिरीश महाजनांच्या 2 नातलगांना अटक,
मोठी खळबळ! कुंभमेळा घोटाळ्यात मत्री गिरीश महाजनांच्या 2 नातलगांना अटक, नेमकं काय घडलं?
CM फडणवीसांचा मोठा निर्णय; भरती परीक्षांबाबत सरकारचा मास्टरप्लॅन
CM फडणवीसांचा मोठा निर्णय; भरती परीक्षांबाबत सरकारचा मास्टरप्लॅन, नेमकं काय घडणार?
इमामपूर रोडवर वाल्मिक कराड समर्थकांकडून गोळीबार; नेमकं काय घडलं?
मोठी बातमी! इमामपूर रोडवर वाल्मिक कराड समर्थकांकडून गोळीबार; नेमकं काय घडलं?
चेन्नईला जाणाऱ्या इंडिगो विमानाच्या इंजिनमध्ये बिघाड
Kolkata To Chennai Flight | चेन्नईला जाणाऱ्या इंडिगो विमानाच्या इंजिनमध्ये बिघाड; विमानाचं तातडीने लँडिंग, चेन्नई विमानतळावर आपत्काल जाहीर
कोर्टाच्या आगामी सुनावणीत मोठं घडणार? सुनावणीच्या अखेरीच कपिल सिब्बल..
कोर्टाच्या आगामी सुनावणीत मोठं घडणार? सुनावणीच्या अखेरीच कपिल सिब्बल यांची मोठी मागणी
शिंदेंच्या मुख्यमंत्रीपदावरच सिब्बलांचा सवाल; कोर्टात नेमकं काय घडलं?
Shivsena Case Hearing | एकनाथ शिंदेंच्या मुख्यमंत्रीपदावरच सिब्बलांचा सवाल; सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडलं?
फूट म्हणजे नक्की काय? सुप्रीम कोर्टाचा थेट सवाल; सिब्बलांचा युक्तिवाद
Shivsena Hearing | फूट म्हणजे नक्की काय? सुप्रीम कोर्टाचा थेट सवाल; कपिल सिब्बलांचा जोरदार युक्तिवाद
कपिल सिब्बलांचा एक-एक युक्तिवाद, शिंदे गटाची धाकधूक वाढली...
Kapil Sibbal | कपिल सिब्बलांचा एक-एक युक्तिवाद, शिंदे गटाची धाकधूक वाढली; सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडतंय?