…तर एक महिन्यात तुमचं व्हॉट्सअ‌ॅप बंद होणार…

| Updated on: Jan 06, 2021 | 3:00 PM

व्हॉट्सॲप येत्या 8 फ्रेबुवारी 2021 ला व्हॉट्स अ‌ॅप आपली सेवा, अटी तसंच गोपनियतेच्या धोरणात बदल करत आहे.

...तर एक महिन्यात तुमचं व्हॉट्सअ‌ॅप बंद होणार...
Follow us on

नवी दिल्ली : फेसबुकच्या मालकीचं व्हॉट्स‌अ‌ॅप नवीन वर्षात कात टाकतंय. येत्या 8 फ्रेबुवारी 2021 ला व्हॉट्स अ‌ॅप आपली सेवा, अटी तसंच गोपनियतेच्या धोरणात बदल करत आहे. व्हॉट्स अ‌ॅपच्या नव्या अटी आणि धोरणांशी सहमत नसाल तर तुमचं व्हॉट्स बंद होणार आहे. (Whats App Will Stop Working if you Do not Working New terms And policy)

व्हॉट्स‌अ‌ॅपचं नवं अटी आणि गोपनियता धोरण 8 फ्रेब्रुवारी 2021 पासून अंमलात येईल. या तारखेनंतर हे अ‌ॅप वापरु इच्छित असलेल्या युझर्सला नव्या अपडेटनुसार अटी आणि गोपनियता धोरणांना सहमती दर्शवावी लागेल. जर तुम्ही नव्या धोरणांना सहमती दर्शवली नाही तर तुम्हाला व्हॉट्स अ‌ॅप वापरता येणार नाही.

एखादा युझर डेटा कशा पद्धतीने व्यवस्थापित करतो तसंच फेसबुक या कंपनीसह विविध प्रकारची माहिती कशी शेअर करतो, याबद्दलचं धोरण नव्या व्हॉट्सअ‌ॅप अपडेटमध्ये असणार आहे.

आम्ही नव्या अटी (terms) आणि गोपनियता धोरण (privacy Policy) आणत असल्याचं नोटिफिकेशन व्हॉट्स‌अ‌ॅपने आपल्या युझर्सना पाठवण्यास सुरुवात केलं आहे. तसंच युझर्सना नवीन धोरणाला सहमती देण्यासही सांगितलं आहे.

व्हॉट्स‌अ‌ॅपच्या नव्या अटी आणि शर्थी…

व्हॉट्स अ‌ॅप आपला डेटा कसा वापरतो यावरील अधिक माहिती

व्हॉट्स अ‌ॅकाउंटशी चॅट करण्यात बदल

व्हॉट्स अप आपला डेटा फेसबुकसह अन्य कंपनीला कसा शेअर करतं

व्हॉट्सअ‌ॅपचे नवे अपडेट….

व्हॉट्सॲप वेब आणि डेस्कटॉप ॲपवरुन कॉलिंगची सुविधा

अनेक युजर्स या फिचर्सची गेल्या काही दिवसांपासून वाट बघत आहेत. त्यामुळे लवकरचे व्हॉट्सअॅप वेब, डेस्कटॉप आणि macOS द्वारे Voice/ Video कॉल्स करता येणार आहे. हे फिचर डेस्कटॉपद्वारे पाठवण्यात येणाऱ्या मॅसेजप्रमाणे काम करणा आहे. मात्र त्यासाठी समोरच्या व्यक्तीकडे इंटरनेट असणे गरजेचे आहे.

व्हिडीओ म्यूट

व्हॉट्सॲपवर कोणताही व्हिडीओ पाठवताना किंवा स्टेट्स ठेवताना व्हिडीओ म्यूट करण्याची सोय नाही. मात्र आता व्हॉट्सॲप अपडेट झाल्यावर तो तुम्हाला म्यूट करता येणार आहे. WABetaInfo ने दिलेल्या माहितीनुसार, सध्या कंपनी यावर काम करत आहे. लवकरच हे फिचर्स अपडेट केले जाणार आहे.

Read later

Read later हे फिचर्स व्हॉट्सॲपवरील Archived Chats चे अपडेट व्हर्जन आहे. यामुळे कोणतेही चॅट्स Read later या ठिकाणी Move केल्यानंतर व्हॉट्सॲप तुम्हाला त्या संबंधित चॅट्सचे नोटिफिकेशन पाठवणार नाही. विशेष म्हणजे या फिचर्ससोबत तुम्हाला vacation mode हे नवे फिचर्सही अपडेट केले जाणार आहे.

मिस्ड कॉल्स कधीही जाईन करता येणार

अनेकदा कामात असल्यावर व्हॉट्सअॅपवरील कॉल आपल्या लक्षात राहत नाही. मात्र जर आता तुम्हाला एखादा व्हिडीओ कॉल किंवा व्हॉईस कॉल आला असेल तर तो तुम्हाला काही वेळानंतर जाईन करता येणार आहे. मात्र यासाठी तो व्हिडीओ कॉल सुरु असायला हवा, ही ऐवढी अट असणार आहे.

व्हॉट्सॲप Insurance

येत्या काही दिवसात तुम्हाला व्हॉट्सॲपद्वारे Insurence ही खरेदी करता येणार आहे. व्हॉट्सॲपकडून लवकरच हेल्थ Insurence आणि मायक्रो पेन्शन प्रोडक्ट लाँच केले जाणार आहे. सुरुवातीला व्हॉट्सॲप SBI आणि HDFC या दोन बँकेचे इन्शुरन्स स्कीम पाठवणार आहे.

(Whats App Will Stop Working if you Do not Working New terms And policy)

हे ही वाचा

WhatsApp लवकरच अपडेट होणार, यूजर्सला मिळणार ‘हे’ सहा अनोखे फीचर्स

WhatsApp मधील ‘या’ 5 दमदार फिचर्सचा वापर करायलाच हवा