AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

तुमचं व्हॉट्सॲप अकाऊंट कुठे-कुठे वापरलं जातंय, तुम्हाला माहित आहे का? जाणून घ्या फक्त एका क्लिकवर

अनेकदा आपले व्हॉट्सॲप अकाऊंट कोणत्या डिव्हाइसवर वापरले जात आहे, याची माहिती अनेकांना नसते. अशा वेळी सायबर क्राईमच्या अनेक घटना घडण्याची शक्यता वाढते. मात्र तुम्ही यापासून सुटका मिळवण्यासाठी एका फीचरच्या मदतीने तुम्ही हे जाणून घेऊ शकता.

तुमचं व्हॉट्सॲप अकाऊंट कुठे-कुठे वापरलं जातंय, तुम्हाला माहित आहे का? जाणून घ्या फक्त एका क्लिकवर
Image Credit source: freepik
| Edited By: | Updated on: Jan 23, 2025 | 4:45 PM
Share

व्हॉट्सॲप हे एक असे मेसेजिंग ॲप आहे जे संपूर्ण जगभरात वापरले जाते. हे ॲप एक असे प्लॅटफॉर्म आहे जे वापरकर्त्यांना चॅट करण्यास, ऑडिओ-व्हिडिओ कॉल करण्यास आणि फाइल्स शेअर करण्यास सुलभ बनले आहे. तसेच यात युजर्सचा अनुभव वाढवण्यासाठी कंपनी नियमितपणे नवनवीन फीचर्स सादर करते. तसेच व्हॉट्सॲपवरील अशाच एका फीचरमुळे लोकं आपले व्हॉट्सॲप अकाऊंट अनेक डिव्हाइसवर वापरू शकतात. या फीचरला व्हॉट्सॲप लिंक्ड डिव्हाइस फीचर असं नाव देण्यात आलं आहे. ज्यामुळे काम करणे अगदी सोपे होऊन गेले आहे. मात्र या आधुनिक युगात देखील त्याचे वाईट परिणाम आपल्याला पहिला मिळतात. सायबर क्राईमच्या अनेक घटना देखील वाढत चालेले आहे.

हे फिचर ठरेल उपयुक्त

लिंक केलेल्या डिव्हाइस फीचरच्या मदतीने तुम्ही तुमचे आपले व्हॉट्सॲप अकाऊंट स्मार्टफोन, टॅब्लेट, कॉम्प्युटर अशा अनेक डिव्हाइसवर वापरू शकतात. वापरकर्ते व्हॉट्सॲप डिव्हाइस लीक केल्यास चॅट करू शकतात, परंतु चॅट आपोआप तुम्ही केलेल्या इतर सर्व डिव्हाइसवर अपडेट होतात. एकापेक्षा जास्त स्मार्टफोन वापरणाऱ्यांसाठी हे फीचर खूप फायदेशीर आहे.

मात्र जेव्हा तुम्ही एकापेक्षा अनेक डिव्हाइस वर जर लीक केलेलं असेल तर हे तूमच्यासाठी धोक्याचे ठरू शकते. कारण याने तुमचा फोन किंवा व्हॉट्सॲप अकाउंट हॅक होण्याची शक्यता असते. अनेकदा तुमचे व्हॉट्सॲप अकाऊंट कोणत्या डिव्हाइसवर वापरले जात आहे, याची माहिती नसते. अशा वेळी तुमच्या सोबत सायबर क्राईम म्हणजे तुमचा व्हॉट्सॲप इतर कोणती व्यक्ती वापरून त्याचा गैरफायदा घेऊ शकते. सुरक्षिततेच्या कारणास्तव या काही गोष्टी तुम्ही जाणून घेणे खूप महत्वाचे आहे. लिंक केलेले डिव्हाइस फीचरद्वारे तुम्ही जाणून घेऊ शकता. ही अगदी सोपे प्रक्रिया जी आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत.

1. सर्वप्रथम तुमच्या फोनमध्ये व्हॉट्सॲप ओपन करा.

२. त्यानंतर होम स्क्रीनच्या वरच्या उजव्या कोपऱ्यातील तीन ठिपक्यांवर क्लिक करा.

3. एक पॉप-अप विंडो दिसेल.

4. त्यानंतर त्यातील Linked devices पर्यायावर क्लिक करा.

5. एक नवीन पेज ओपन होईल.

६. येथे तुम्हाला तुमचे व्हॉट्सॲप ॲक्टिव्ह असलेल्या सर्व डिव्हाइसची यादी मिळेल.

७. तुम्हाला कोणतेही अनोळखी डिव्हाइस सापडल्यास तर तुम्ही तेथे दिल्यास लॉग आऊट ऑप्शनवर जाऊन लॉग आऊट करू शकता.

८. यामुळे तुमचा फोन किंवा व्हॉट्सॲप हॅक होण्याची घटना कमी होतील.

Follow Us
शॉर्टसर्किटमुळे 2 विद्यार्थिनींना विजेचा धक्का अन् पुढे जे घडलं....
नवी मुंबईत थरार! शॉर्टसर्किटमुळे 2 विद्यार्थिनींना विजेचा धक्का अन् पुढे जे घडलं....
भिवंडीत वाहतुकीचा खोळंबा! मुसळधार पावसामुळे महामार्गावर वाहनांच्या...
Mumbai -Nashik Highway | भिवंडीत वाहतुकीचा खोळंबा! मुसळधार पावसामुळे महामार्गावर वाहनांच्या लांबच लांब रांगा
ठाकरेंसोबत दगाफटका? एकीकडे आम्ही भाजपच्या विरोधात लढतोय अन्...
ठाकरेंसोबत दगाफटका? एकीकडे आम्ही भाजपच्या विरोधात लढतोय अन् संभाजीनगरात... बोलता बोलता सुषमा अंधारे हे काय म्हणाल्या?
बनावट बियाण्यांना लगाम, दिवसा वीज... फडणवीसांनी सांगितला प्लॅन!
मोठी बातमी! बनावट बियाण्यांना लगाम, दिवसा वीज, AI शेती... मुख्यमंत्री फडणवीसांनी सांगितला प्लॅन!
नाव पुकारलं मात्र... कृषी पुरस्कार वितरण कार्यक्रमात सुनेत्रा पवारांना
Sunetra Pawar | नाव पुकारलं मात्र... कृषी पुरस्कार वितरण कार्यक्रमात सुनेत्रा पवारांना वेटिंगवर ठेवलं? भर मंचावर...
ड्रग्ज रॅकेटवर पोलिसांचा आणखी एक घाव; गोरेगाव प्रकरणात 13 वा आरोपी....
Goregaon Drugs Case | ड्रग्ज रॅकेटवर पोलिसांचा आणखी एक घाव; गोरेगाव प्रकरणात 13 वा आरोपी गजाआड
अजितदादा आणि सचिन भाऊंचं नातं कुटुंबासारखं, सचिन अहिर यांची उपसभापती
अजितदादा आणि सचिन भाऊंचं नातं कुटुंबासारखं, सचिन अहिर यांची उपसभापतीपदी निवड होताच सुनेत्रा पवार यांच्याकडून अभिनंदन!
मुसळधार पावसाचा कहर! नालासोपारा जलमय; पालघरमध्ये तर घराची भिंतच कोसळली
Heavy Rain | मुसळधार पावसाचा कहर! नालासोपारा जलमय; पालघरमध्ये तर घराची भिंतच कोसळली
श्रीकांत शिंदेंचा ताफा अडवला; काळे झेंडे दाखवत शिवसैनिकांचा संताप
मोठी बातमी! श्रीकांत शिंदेंचा ताफा अडवला; काळे झेंडे दाखवत शिवसैनिकांचा संताप
उंच उंच लाटा... समुद्र उसळला...मुंबईच्या समुद्रात मोठी भरती; पहा Video
उंच उंच लाटा... समुद्र उसळला...मुंबईच्या समुद्रात मोठी भरती; पहा व्हिडीओ!