टेलिग्राममध्ये मिळणाऱ्या ग्रुप पोल फिचर्सवर आता WhatsApp काम करत आहे, यूजर्सना मिळणार अनेक फायदे, जाणून घ्या काय काय आहेत नवीन फीचर्स

सध्या व्हॉट्सअ‍ॅपचा वापर प्रामुख्याने चॅटिंगसाठी केला जातो, आणि जगभर हे अ‍ॅप्स मोठ्या प्रमाणात वापरले जाते. त्यामुळे वापरकर्त्याचा अनुभव सुधारण्यासाठी हे अ‍ॅप आता नवनवीन फीचर्स देत आहे. चॅटिंगशिवाय यूजर्सला या अ‍ॅपच्या माध्यमातून इतर अनेक गोष्टी करता येऊ शकतात. व्हिडिओ कॉल, व्हॉइस कॉल, स्टेटस सेटिंग, मीडिया आणि फाइल शेअरिंग आणि पेमेंट यासारख्या गोष्टी या अ‍ॅप्सच्या माध्यमातून करता येतात.

टेलिग्राममध्ये मिळणाऱ्या ग्रुप पोल फिचर्सवर आता WhatsApp काम करत आहे, यूजर्सना मिळणार अनेक फायदे, जाणून घ्या काय काय आहेत नवीन फीचर्स
TelegramImage Credit source: TV9
Follow us
| Updated on: Mar 07, 2022 | 6:32 PM

मुंबईः मेसेजिंग प्लॅटफॉर्मवर (messaging platform) आता आपल्या वापरकर्त्यांसाठी ग्रुप पोलिंग (Group polling) फीचर सादर करण्याचा विचार सध्या सुरु आहे. हे नक्कीच वापरकर्त्यांसाठी खूप उपयुक्त ठरणार आहे. टेलिग्राम (Telegram) आणि ट्विटरसारखे अ‍ॅपचे स्पर्धक आता आधीच त्यांच्या अ‍ॅप्सवर पोल तयार करण्याचे वैशिष्ट्य देतात. सध्या व्हॉट्सअ‍ॅपचा वापर प्रामुख्याने चॅटिंगसाठी केला जातो, आणि जगभर हे अ‍ॅप्स मोठ्या प्रमाणात वापरले जाते. त्यामुळे वापरकर्त्याचा अनुभव सुधारण्यासाठी हे अ‍ॅप आता नवनवीन फीचर्स देत आहे. चॅटिंगशिवाय यूजर्सला या अ‍ॅपच्या माध्यमातून इतर अनेक गोष्टी करता येऊ शकतात.

व्हिडिओ कॉल, व्हॉइस कॉल, स्टेटस सेटिंग, मीडिया आणि फाइल शेअरिंग आणि पेमेंट यासारख्या गोष्टी या अ‍ॅप्सच्या माध्यमातून करता येतात. त्यामुळे या अ‍ॅपमधील अनेक गोष्टी यूजर्ससाठी उपयुक्त ठरणाऱ्या आहेत. त्यामुळे कंपनीतर्फे यूजर्ससाठी भविष्यात अनेक नवनवीन गोष्टी देण्यात येणार आहेत. तसेच या अ‍ॅपमध्ये आणखी काही नवीन गोष्टी करण्यासाठी कंपनी मेसेज रिअ‍ॅक्शन आणि कम्युनिटी टॅबसारख्या गोष्टींवर काम करत आहे.

ग्रुप पोलिंग फीचर आणण्याची योजना

आताच्या माहितीनुसार, WaBetaInfo ने सांगितले आहे की मेसेजिंग प्लॅटफॉर्म आपल्या वापरकर्त्यांसाठी ग्रुप पोलिंग फीचर आणण्याची योजना करत आहे. याचा फायदा यूजर्सना होणार आहे. या अ‍ॅपला असणारे स्पर्धक टेलिग्राम आणि ट्विटरसारख्या प्लॅटफॉर्मवर हे अ‍ॅप्स असण्याआधीपासून आपल्याकडे असल्याचे सांगून ते पोल तयार करणार असल्याचे सांगत असतात. या अ‍ॅप्सद्वारे लोक कोणत्याही विषयावर आपले मत नोंदवू शकतात, आणि त्याचा झटपट निकालही पाहू शकतात. अ‍ॅपचा मागोवा घेणाऱ्या वेबसाइटवर एक इमेज शेअर करण्यात आली आहे.

व्हॉट्सअ‍ॅपचे पोलिंग फीचर कसे काम करेल?

व्हॉट्सअ‍ॅपवर मतदानासाठी किती पर्याय दिले जातील याची माहिती सध्या तरी देण्यात आलेली नाही. टेलिग्राम तुम्हाला 10 पर्याय जोडण्यासाठी परवानगी देते. याव्यतिरिक्त, Twitter तुम्हाला फक्त चार पर्याय जोडण्याची परवानगी देते आणि तुम्हाला मतासाठी आणखी पर्याय जोडायचे असल्यास तुम्हाला दुसरा थ्रेड तयार करावा लागत असतो.

अ‍ॅपमध्ये वेगवेगळ्या गोष्टी किती आहेत हे अजून कंपनीने स्पष्ट केले नाही. त्यामुळे व्हॉट्सअ‍ॅपच्या यूजर्सला एका वेळी किती पोल तयार करू शकतो आणि लोक मतदानासाठी किती वेळ घेऊ शकतात. व्हॉट्सअ‍ॅपवरील ग्रुप पोलिंग फीचर तुमच्या नेहमीच्या चॅटप्रमाणे एंड-टू-एंड एन्क्रिप्टेड राहणार आहे. त्यामुळे ग्रुपमध्ये असणाऱ्यांनाच मतदान आणि निकाल पाहता येणार आहेत. वेगवेगळ्या गोष्टींसह आता मतदानाचे वैशिष्ट्यही सध्या सुधारत आहे. आणि अ‍ॅपचे आगामी अद्यावत यंत्रणेत आणले जाणार आहे. हे फीचर iOS 22.6.0.70 बीटा व्हर्जनमध्ये दिसणार आहे.

व्हॉट्सअ‍ॅपमध्ये नवीन फीचर्स येत आहेत

याशिवाय, WhatsApp आपल्या नवीन गोष्टींमध्ये अपडेट करत असून त्यामध्ये आणखी वेगळी वैशिष्ट्ये आणण्याची शक्यता आहे. कंपनी अनेक महिन्यांपासून यावर काम करत आहे. WaBetaInfo नुसार, WhatsApp तुमच्या चॅट्समध्ये प्रतिक्रियेसाठी एका बटणावर जोडण्याची योजना तयार करत आहे. जे तुम्हाला इमोजी वापरून संदेशांवर प्रतिक्रिया देण्यास अनुमती देणार आहे. कंपनीकडून ही गोष्ट अजून अंमलात आणली गेली नाही पण सध्या यावर चाचपणी करण्याचे काम सुरु आहे, त्यामुळे ते लवकरच Android आणि iOS वर येण्याचीसुद्धा शक्यता आहे.

संबंधित बातम्या

50MP कॅमेरा, 18W पॉवर अडॅप्टरसह Realme चा बजेट स्मार्टफोन बाजारात, लाँचिंगसाठी उरले फक्त काही तास

नवीन मोबाईल खरेदी करताय? मोबाईल खरेदी करताना गोंधळ उडालाय, मग ही माहिती वाचाच

स्टारलिंक सॅटेलाईट सिस्टमचा सावधानतेने वापर करा;स्पेसएक्सचा सीईओ एलन मास्कचे आवाहन; रशिया करु शकते गैरवापर

Non Stop LIVE Update
लोकसभा निवडणुकीतील कमी जागांवर शरद पवार यांचं मोठं विधान
लोकसभा निवडणुकीतील कमी जागांवर शरद पवार यांचं मोठं विधान.
एअर इंडियाची तेल अवीवमध्ये जाणारी सेवा 30 एप्रिलपर्यत स्थगित
एअर इंडियाची तेल अवीवमध्ये जाणारी सेवा 30 एप्रिलपर्यत स्थगित.
दोन महिन्यामध्ये एकनाथ शिंदे दिसणार नाहीत, प्रकाश आंबेडकरांचं वक्तव्य
दोन महिन्यामध्ये एकनाथ शिंदे दिसणार नाहीत, प्रकाश आंबेडकरांचं वक्तव्य.
बेकायदा फेरीवाल्यांवर थेट कारवाई करा, मुंबई हायकोर्टाचे स्पष्ट आदेश
बेकायदा फेरीवाल्यांवर थेट कारवाई करा, मुंबई हायकोर्टाचे स्पष्ट आदेश.
मोठी बातमी, धनगर आरक्षणाची याचिका सुप्रीम कोर्टानं फेटाळली
मोठी बातमी, धनगर आरक्षणाची याचिका सुप्रीम कोर्टानं फेटाळली.
अजित पवार लोकसभेची एकही जागा जिंकणार नाहीत, पाहा कोणी केलं भाकीत?
अजित पवार लोकसभेची एकही जागा जिंकणार नाहीत, पाहा कोणी केलं भाकीत?.
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग.
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?.
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?.
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद.