5

Whatsapp पेमेंट्सचा वापर करणार आहात? त्याआधी ‘या’ सहा गोष्टी लक्षात ठेवा

व्हॉट्सअॅपच्या पेमेंट्स फिचरचा वापर करण्यापूर्वी या सहा महत्त्वाच्या गोष्टी प्रत्येक युजरने लक्षात ठेवायला हव्यात.

Whatsapp पेमेंट्सचा वापर करणार आहात? त्याआधी 'या' सहा गोष्टी लक्षात ठेवा
WhatsApp शॉपिंग बटणाचा वापर करण्यासाठी तुम्हाला व्हॉट्सअॅपच्या कोणत्याही बिझनेस अकाऊंटवर जावं लागेल. हे अकाऊंट कोणाचंही असू शकतं. ज्यांच्याकडून तुम्ही कोणतंही प्रोडक्ट अथवा सर्व्हिस (सेवा) खरेदी केली असेल किंवा त्यासंबंधी मेसेज पाठवला-रिसिव्ह केला असेल, त्यांचं अकाऊंट बिझनेस अकाऊंट असू शकतं.
Follow us
| Updated on: Nov 15, 2020 | 10:35 PM

मुंबई : भारतात डिजिटल व्यवहारांमध्ये युनिफाइड पेमेंट्स इंटरफेस (UPI) आधारित व्यहारांचे प्रमाण वाढले आहे. फोन पे (PhonePe), गुगल पे (Google Pay), पेटीएमसारख्या (Paytm) युपीआय आधारित अॅप्सचा देशात मोठ्या प्रमाणात वापर होतो. त्यांना टक्कर देण्यासाठी आता व्हॉट्सअॅप मैदानात उतरलं आहे. व्हॉट्सअॅपवरुन (Whatsapp) आता पैसे ट्रान्सफर करता येणार आहेत. व्हॉट्सअॅपच्या यूपीआय पेमेंट सुविधेमुळे पैसे ट्रान्सफर करणं शक्य होणार आहे. काही दिवसांपूर्वी व्हॉट्सअ‍ॅपला भारतात यूपीआय (UPI) आधारित पेमेंट सेवा सुरू करण्याची परवानगी मिळाली आहे. त्यानुसार WhatsApp Pay हे फिचर नुकतंच भारतात रोलआऊट करण्यात आलं आहे. (6 Things Whatsapp wants you to know while using payments)

युजर्स आता व्हॉट्सअॅपद्वारे UPI चा वापर करु शकतात. हे अॅपही इतर पेमेंट्स अॅपप्रमाणेच आहे. भारतात WhatsApp Pay चा वापर करायचा असल्यास तुमच्याकडे बँक अकाऊंट आणि त्या बँकेचं डेबिट कार्ड असणं गरजेचं आहे. याद्वारे तुम्ही WhatsApp Pay चा वापर करु शकाल. व्हॉट्सअॅपच्या पेमेंट्स फिचरचा वापर करण्यापूर्वी या सहा महत्त्वाच्या गोष्टी प्रत्येक युजरने लक्षात ठेवायला हव्यात.

1. WhatsApp तुम्हाला पेमेंट्स अॅप अॅक्टिव्हेट करण्यासाठी कोणताही कॉल किंवा मेसेज करणार नाही. WhatsApp Pay सुरु होताच सायबर क्राईम वाढण्याची शक्यता आहे. त्यामुळे तुम्हाला काळजी घ्यावी लागेल. तुम्हाला WhatsApp च्या नावाने कोणताही कॉल आला तर तो फेक कॉल आहे, हे समजून जा.

2. WhatsApp ची कोणतीही कस्टमर केअर सर्व्हिस नाही. त्यामुळे कोणत्याही माहितीसाठी तुम्ही WhatsApp कस्टमर केअरचा नंबर शोधण्याचा प्रयत्न कराल आणि स्वतःचं नुकसान करुन घ्याल.

3. कार्ड डिटेल्स आणि ओटीपी शेअर करु नका : तुम्ही जर कोणत्याही व्यक्तीसोबत तुमच्या कार्डची माहिती आणि ओटीपी शेअर केली तर तुमचं अकाऊंट रिकामं होऊ शकतं. त्यामुळे ही माहिती कोणाशीही शेअर करु नका.

4. WhatsApp वर कोणत्याही फालतू लिंकवर क्लिक करु नका, समजा तुम्ही तसं केलंच तर तिथे विचारलेली माहिती देऊ नका. प्रामुख्याने तुमच्या बँक अकाऊंटशी संबंधित माहिती शेअर करु नका.

5. केवळ तुमच्या ओळखीच्या लोकांकडून आलेल्या पेमेंट्स रिक्वेस्ट स्वीकारा. एखादी व्यक्ती तुमच्या व्हॉट्सअॅप कॉन्टॅक्टमध्ये नसेल तर त्या व्यक्तीची पेमेंट्स रिक्वेस्ट स्वीकारु नका.

6. पेमेंट करताना आणि केल्यानंतर पुन्हा एकदा तपासून पाहा की, तुम्ही योग्य व्यक्तीलाच पेमेंट करत आहात का? अनेकदा चुकून दुसऱ्याच व्यक्तीला पेमेंट केलं जातं. त्यामुळे कोणतीही घाई न करता तपासूनच पेमेंट्स करा. तसेच पेमेंट करण्यापूर्वी त्या व्यक्तीला मेसेज करुन पाहणं हा योग्य उपाय आहे.

संबंधित बातम्या

Whatsapp वरुन पैसे ट्रान्सफर कसे कराल? जाणून घ्या नव्या फिचरची स्टेप बाय स्टेप माहिती

WhatsApp मध्ये सिक्रेट चॅट करणं सोपं होणार; लवकरच येणार ‘हे’ कमालीचं फिचर

WhatsApp द्वारे शॉपिंग करा! नवं फिचर येतंय

(6 Things Whatsapp wants you to know while using payments)

Non Stop LIVE Update
२०२३ ला कल्याण लोकसभेचा खासदार कोण होणार? भाजप नेत्याकडून नावच जाहीर
२०२३ ला कल्याण लोकसभेचा खासदार कोण होणार? भाजप नेत्याकडून नावच जाहीर
विद्यार्थ्यांसाठी शिक्षकांना जीवाची पर्वा नाही ! कुठं आहे भीषण वास्तव?
विद्यार्थ्यांसाठी शिक्षकांना जीवाची पर्वा नाही ! कुठं आहे भीषण वास्तव?
राज्यातील, दिल्लीतील सत्ता लवकरच जाणार? कुणाची भविष्यवाणी अन् इशाारा?
राज्यातील, दिल्लीतील सत्ता लवकरच जाणार? कुणाची भविष्यवाणी अन् इशाारा?
रोहित पवार अमेरिकेचे राष्ट्रध्यक्ष व्हावे, 'त्या' बॅनवरून कुणाचा टोला?
रोहित पवार अमेरिकेचे राष्ट्रध्यक्ष व्हावे, 'त्या' बॅनवरून कुणाचा टोला?
शरद पवार अन् प्रफुल्ल पटेल यांच्या 'त्या' भेटीवर अजितदादांच भाष्य
शरद पवार अन् प्रफुल्ल पटेल यांच्या 'त्या' भेटीवर अजितदादांच भाष्य
'पवारांवर पूर्ण विश्वास ठेवणारा माणूस महाराष्ट्रात नाही', कुणाचा टोला?
'पवारांवर पूर्ण विश्वास ठेवणारा माणूस महाराष्ट्रात नाही', कुणाचा टोला?
शाहांच्या दौऱ्याला अजितदादा का होते गैरहजेर? खडसेंनी सांगितले कारण...
शाहांच्या दौऱ्याला अजितदादा का होते गैरहजेर? खडसेंनी सांगितले कारण...
'माझं अर्थखातं टिकेल की नाही माहित नाही', अजित पवार यांचं मोठं वक्तव्य
'माझं अर्थखातं टिकेल की नाही माहित नाही', अजित पवार यांचं मोठं वक्तव्य
राज्यात पुढील 3 दिवस अतिमुसळधार पाऊस, हवामान खात्याचा इशारा काय?
राज्यात पुढील 3 दिवस अतिमुसळधार पाऊस, हवामान खात्याचा इशारा काय?
कल्याण-ठाकुर्लीतील बाप्पांचा परतीचा प्रवास रेल्वे रुळांवरून, पण का?
कल्याण-ठाकुर्लीतील बाप्पांचा परतीचा प्रवास रेल्वे रुळांवरून, पण का?