Data Breach | तुमच्या ऑनलाईन अकाऊण्टमधील डेटा लीक झालाय का? इथे तपासा

डेटा ब्रीचमध्ये ईमेल आयडी, पासवर्ड, जन्मतारीख, पत्ता, क्रेडिट किंवा डेबिट कार्ड नंबर, बँक अकाऊण्ट यासारखी वैयक्तिक माहिती संभाव्य हॅकर्ससमोर उघड होते. (Online Account Data Breach)

Data Breach | तुमच्या ऑनलाईन अकाऊण्टमधील डेटा लीक झालाय का? इथे तपासा
Online Account Data Breach
Follow us
| Updated on: Apr 30, 2021 | 2:52 PM

मुंबई : तुमच्या ऑनलाईन अकाऊण्टमधील डेटा पूर्णपणे सुरक्षित असल्याचा दावा केला जात असला, तरी डेटा ब्रीचचा (Data Breach) फटका कधीही, कोणालाही बसू शकतो. डेटा ब्रीच म्हणजे खासगी आणि गोपनीय माहिती एखाद्याकडून वाईट हेतूने बेकायदेशीरपणे पाहिली किंवा वापरली जाणे. मे 2016 मध्ये 100 मिलियन म्हणजेच 10 कोटी लिंक्डईन युझर्सचे पासवर्ड हॅकर्सने चोरले होते. (Where to Check If Your Online Account has been hacked info Leaked In a Data Breach)

यापूर्वीही डेटा ब्रीचच्या अशा अनेक घटना घडल्या आहेत, आणि भविष्यात अशा घटना घडणार नाहीत, असं ठामपणे सांगता येणार नाही. डेटा ब्रीचमध्ये ईमेल आयडी, पासवर्ड, जन्मतारीख, पत्ता, क्रेडिट किंवा डेबिट कार्ड नंबर, बँक अकाऊण्ट यासारखी वैयक्तिक माहिती संभाव्य हॅकर्ससमोर उघड होते.

लीक झालेल्या डेटाचे हॅकर्स काय करु शकतात?

आयडेंटिटी थेफ्ट – तुमच्या नावे बनावट बँक खाते उघडू शकतात हॅकिंग – ईमेल आयडी, पासवर्ड यासारखी माहिती लीक झाल्यास इतर ऑनलाईन अकाऊण्ट हॅक करु शकतात आणि त्यातील गोपनीय माहिती मिळवू शकतात फिशिंग – नाव, जन्मतारीख, पत्ता यासारखी माहिती मिळवून फिशिंग मेल पाठवून आणखी माहिती मिळवू शकतात.

थोडक्यात, डेटा ब्रीच ही वाईट घटना आहे. Haveibeenpwned.com या वेबसाईटवर युजर्स आपले ऑनलाईन अकाऊण्ट यापूर्वी कधी लीक झाले आहे का, हे तपासू शकतात. ही साईट वापरणे सोपे आहे. तुमचे ऑनलाईन अकाऊण्ट (ईमेल आयडी किंवा युजरनेम) एंटर करा आणि pwned? वर क्लिक करा.

जर तुमच्या अकाऊण्टमधून डेटा ब्रीच झाला असेल, तर तुम्हाला असे दिसेल.

मग काय करावे? (Online Account Data Breach)

तुमच्या ऑनलाईन अकाऊण्टचा पासवर्ड बदला. अपरकेस, लोअरकेस लेटर्स, स्पेशल कॅरेक्टर्स आणि नंबर वापरुन पासवर्ड तयार करा. उदा. InoNothin@343#

जर तुमच्या अकाऊण्टमधून डेटा ब्रीच झाला नसेल, तर तुम्हाला असे दिसेल.

तुमचे ऑनलाईन अकाऊण्ट सुरक्षित असल्याने तुम्हाला घाबरण्याचे कारण नाही. मात्र खूप दिवसात तुम्ही आपला पासवर्ड बदलला नसेल, तर जरुर बदला, कारण सतर्क राहणे केव्हाही चांगले.

संबंधित बातम्या :

फेसबुकच्या 53 कोटीपेक्षा अधिक युजर्सचा डेटा लीक, भारतासह 106 देशांचा समावेश

अनेक भारतीय युजर्सचा डेटा लीक, गुगल क्रोमकडून पासवर्ड बदलण्याचा सल्ला

(Where to Check If Your Online Account has been hacked info Leaked In a Data Breach)

Non Stop LIVE Update
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी.
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ.
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान.
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका.
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर.
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार.
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका.
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी.
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना.
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?.