‘या’ स्टार्टअप कंपनीकडून एक रुपयात 1 GB डेटा

सर्व जगात भारतामध्ये सर्वाधिक स्वस्त इंटरनेट डेटा प्लान (one gb internet data in one rupees) मिळत आहे. कारण बंगळुरुची 'Wifi Dabba' स्टार्टअप कंपनी सर्वात कमी पैशात युजर्सला डेटा देत आहे.

'या' स्टार्टअप कंपनीकडून एक रुपयात 1 GB डेटा

बंगळुरु (कर्नाटक) : सर्व जगात भारतामध्ये सर्वाधिक स्वस्त इंटरनेट डेटा प्लान (one gb internet data in one rupees) मिळत आहे. कारण बंगळुरुची ‘Wifi Dabba’ स्टार्टअप कंपनी सर्वात कमी पैशात युजर्सला डेटा देत आहे. विशेष म्हणजे ही कंपनी 1 रुपयामध्ये 1 जीबी डेटा देत आहे. कंपनी विश्वास आणि स्वस्त सर्व्हिससह कनेक्टिव्हिटीची समस्या संपवण्याचा प्रयत्न करत आहे. ज्याला सुपरनोड्स (one gb internet data in one rupees) म्हणतात.

फेब्रुवारी 2010 मध्ये बंगळुरुमध्ये या कंपनीची सुरुवात झाली. या कंपनीचे उद्दिष्ट इंटरनेट कनेक्शन स्वस्त करणे आहे. ज्यावेळी कंपनीने आपली सर्व्हिस सायबर सेक्टरमध्ये देण्यास सुरुवात केली. तेव्हा कंपनीला वाटले कनेक्टिव्हिटी आणि चार्ज सर्वात मोठी समस्या होती. त्यामुळे कंपनीने ISP अॅग्नीगेटरवर काम करण्यास सुरुवात केली.

दरम्यान, Wifi Dabba सॉफ्टवेअर, हार्डवेअर या इन्फ्रास्टक्चरच्या विश्वासावर नसून कंपनीने स्वत: आपले नेटवर्क विकसीत केले आहे. ही कंपनी वेंडर मार्जिनसारख्या बऱ्याच वस्तूंचे सेव्हिंग करते.

“कुणीही आपल्या मोबाईल नंबर आणि OTP सह वायफाय डब्बा सिग्नलसोबत जोडू शकता. याचा खर्चही फार कमी आहे. एकूणच हे खूप स्वस्त आहे. ज्या युजर्सला अप्रतिम सर्व्हिस पाहिजे ते त्याच पद्धतीने डेटा खरेदी करु शकतात. ब्रॉडबँड कनेक्शनवर आपण FUP टॉप अप करु शकता. वायफाय डब्बा 1 रुपयामध्ये 1 जीबी डेटा देत आहे. सध्या कंपनीने आपले प्लॅन बंगळुरुच्या बाहेरील लोकांना देण्याचा विचार केलेला नाही”, असं कंपनीने सांगितले.

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI