Xiaomi च्या ‘या’ फोनचा मार्केटमध्ये धुमाकूळ, अवघ्या 5 मिनिटात 3.5 लाख स्मार्टफोन्सची विक्री

अक्षय चोरगे

|

Updated on: Jan 01, 2021 | 6:26 PM

चीनची स्मार्टफोन निर्माती कंपनी Xiaomi गेल्या काही वर्षांपासून भारतीय मार्केटवर वर्चस्व गाजवत आहे.

Xiaomi च्या 'या' फोनचा मार्केटमध्ये धुमाकूळ, अवघ्या 5 मिनिटात 3.5 लाख स्मार्टफोन्सची विक्री

Follow us on

मुंबई : चीनची स्मार्टफोन निर्माती कंपनी Xiaomi गेल्या काही वर्षांपासून भारतीय मार्केटवर वर्चस्व गाजवत आहे. कंपनीने नुकताच Xiaomi Mi 11 हा स्मार्टफोन चीनमध्ये लाँच केला आहे. आज चीनमध्ये हा फोन विक्रीस उपलब्ध करण्यात आला होता. यावेळी अवघ्या पाच मिनिटात या फोनच्या 3 लाख 50 हजार युनिट्सची विक्री झाली आहे. शाओमीचा हा लेटेस्ट फ्लॅगशिप स्मार्टफोन क्वालकॉम स्नॅपड्रॅगन 888 SoC सह लाँच करण्यात आला आहे. (Xiaomi MI 11 record breaking sale crossed 3 lakhs units in just 5 minutes)

कंपनीने याबाबत म्हटलं आहे की, आम्ही Xiaomi Mi 11 च्या मार्केटमधील परफॉर्मन्सवर खूप खूश आहोत. इथल्या लोकल वेळेनुसार दुपारी 12 वाजता या स्मार्टफोनचा सेल आयोजित करण्यात आला होता. त्यानंतर केवळ 5 मिनिटात आम्ही एमआय 11 च्या 3 लाखांहून अधिक युनिट्सची विक्री केली आहे. शाओमी एमआय 11 ने ओम्नी चॅनेल सेल्सवर 1,677 कोटींचा सेल केला आहे. मायड्रायव्हरच्या रिपोर्टनुसार शाओमी एमआय 11 च्या विक्रीला सुरुवात केल्यानंतर सुरुवातीच्या सात तासांमध्ये या फोनसाठी 8 लाख 54 हजार ऑर्डर्स मिळाल्या आहेत, हा एक मोठा रेकॉर्ड आहे.

किंमत

Xiaomi Mi 11 च्या 8GB RAM आणि 128GB स्टोरेज असलेल्या वेरिएंटची किंमत 3,999 युआन (जवळपास 44,990 रुपये) इतकी आहे. तर 8GB RAM + 256GB स्टोरेज असलेल्या वेरिएंटची किंमत 4,299 युआन (जवळपास 48,366 रुपये) आणि 12GB RAM + 256GB स्टोरेज असलेल्या वेरिएंट की किंमत 4,699 युआन (52,866 रुपये) इतकी आहे. हा स्मार्टफोन स्टँडर्ड व्हाईट, ब्लू आणि ब्लॅक या तीन रंगांच्या वेरिएंटमध्ये लाँच करण्यात आला आहे.

Xiaomi Mi 11 मधील स्पेसिफिकेशन्स

या स्मार्टफोनमध्ये 6.81 इंचांचा 2K WQHD AMOLED डिस्प्ले देण्यात आला आहे, ज्याचा रिफ्रेश रेट 120 हर्ट्ज आणि टच सँपलिंग रेट 480 हर्ट्ज़ आहे. हा फोन स्नॅपड्रॅगन 888 प्रोसेसरवर चालतो. तसेच या फोनमध्ये 4600mAh क्षमतेची बॅटरी देण्यात आली आहे, जी 55W वायर्ड फास्ट चार्जिंग आणि 50W वायरलेस फास्ट चार्जिंग आणि 10W रिवर्स चार्जिंग सपोर्टसह देण्यात आली आहे. हा डुअल नॅनो सिम स्मार्टफोन Android 10 वर बेस्ड MIUI 12.5 वर चालतो. तसेच या फोनमध्ये हार्मन/कार्डन साऊंड ट्युनसह स्टीरियो स्पीकर्स देण्यात आले आहेत.

Xiaomi Mi 11 चा कॅमेरा आणि इतर फिचर्स

Xiaomi Mi 11 मध्ये ट्रिपल रियर कॅमेरा देण्यात आला आहे. यामधील प्रायमरी सेन्सर 108 मेगापिक्सलचा आहे, जो OIS सह (ऑप्टिकल इमेज स्टेबिलायजेशन) बनवण्यात आला आहे. तसेच फोनमध्ये 13 मेगापिक्सल अल्ट्रा-वाईड-अँगल कॅमरा सेन्सर आणि 5 मेगापिक्सल मॅक्रो सेन्सर देण्यात आला आहे. सेल्फी प्रेमींसाठी या फोनमध्ये 20 मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा देण्यात आला आहे. तसेच फोनमध्ये इन-डिस्प्ले फिंगरप्रिंट सेन्सर आणि बिल्ट-इन हार्ट रेट सेन्सरही आहे. एनएफसी, वाय-फाय 6E चाही सपोर्ट देण्यात आला आहे. दरम्यान कंपनीने अद्याप या फोनच्या ग्लोबल लाँचिंगबाबत कोणतीही माहिती दिलेली नाही.

हेही वाचा

जानेवारी 5 ला भारतामध्ये लॉन्च होणार Mi 10i, धमाकेदार आहेत फीचर्स

iPhone 12 Series सह अ‍ॅपलच्या इतर आयफोन आणि प्रोडक्ट्सवर मोठी सूट

Year Ender 2020 : 6000mAh बॅटरी आणि 48MP कॅमेरा असलेले टॉप 5 स्मार्टफोन्स

(Xiaomi MI 11 record breaking sale crossed 3 lakhs units in just 5 minutes)

Non Stop LIVE Update

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI