AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Redmi note 7 Pro आता सहज खरेदी करा, फ्लॅश सेलची गरज नाही

गेल्या सहा महिन्यांमध्ये Redmi Note 7 सिरीजचे जवळपास 1.5 कोटी स्मार्टफोन जगभरात विकले गेले. Xiaomi कंपनी भारतात Redmi Note 7 Pro ला फ्लॅश सेलमध्ये विकते. त्यामुळे अनेकदा ग्राहक हा स्मार्टफोन घेता येत नाही.

Redmi note 7 Pro आता सहज खरेदी करा, फ्लॅश सेलची गरज नाही
| Updated on: Jul 11, 2019 | 12:06 AM
Share

मुंबई : चायनाची स्मार्टफोन कंपनी Xiaomi चा Redmi Note 7 Pro हा सर्वात लोकप्रिय स्मार्टफोन आहे. गेल्या सहा महिन्यांमध्ये Redmi Note 7 सिरीजचे जवळपास 1.5 कोटी स्मार्टफोन जगभरात विकले गेले. Xiaomi कंपनी भारतात Redmi Note 7 Pro ला फ्लॅश सेलमध्ये विकते. त्यामुळे अनेकदा ग्राहक हा स्मार्टफोन घेता येत नाही. तर Redmi Note 7S हा स्मार्टफोन कधीही विकत घेता येतो.

मात्र, आता Redmi Note 7 Pro हा स्मार्टफोन तुम्हाला विना फ्लॅश सेलही खरेदी करता येणार आहे. कारण Xiaomi तीन दिवसांसाठी Redmi Note 7 Pro चे सर्व व्हेरिअंट तीन दिवसांसाठी विना फ्लॅश सेल खरेदीसाठी ठेवणार आहे. म्हणजे तुम्ही या तीन दिवसांमध्ये Redmi Note 7 Pro ला कधीही खरेदी करु शकाल. 12 जुलैआधी तुम्ही Redmi Note 7 Pro हा फोन खरेदी करु शकता.

Xiaomi Redmi Note 7 Pro चे भारतात तीन व्हेरिअंट उपलब्ध आहेत. बेस व्हेरिअंटमध्ये 4GB रॅम, 64GB इंटरनल स्टोरेज देण्यात आली आहे. दुसऱ्या व्हेरिअंटमध्ये 6GB रॅम, 64GB इंटरनल स्टोरेज देण्यात आली आहे. टॉप व्हेरिअंटमध्ये 6GB रॅम, 128GB इंटरनल स्टोरेज देण्यात आली आहे.

Redmi Note 7 Pro वर एअरटेलकडून ऑफरही दिली जात आहे. एयरटेलकडून 120 जीबी एक्स्ट्रा डेटा दिला जाणार आहे. Redmi Note 7 Pro खरेदी करताना एयरटेल युझर्सला ही ऑफर मिळणार आहे.

Redmi  Note 7 Pro ला या तीन दिवसांमध्ये विना फ्लॅश सेल फ्लिपकार्ट आणि Mi.com वरुन खरेदी करता येणार आहे. भारतात हा स्मार्टफोन याचवर्षी लॉन्च करण्यात आलं. Redmi Note 7 सिरीजची सुरुवातीची किंमत 10,999 रुपये आहे.

संबंधित बातम्या :

Windows 10 यूजर्सला Microsoft चा इशारा, 5 कोटी कम्प्युटर्सला धोका

लवकरच शाओमीचा 64 मेगापिक्सल कॅमेराचा फोन लाँच होणार

भारतात शाओमीचा नवा फोन लाँच, किंमत 6 हजार रुपयांपेक्षाही कमी

या मोबाईलवर व्हॉट्सअॅप बंद होणार

Follow Us
शरद पवार यांना ब्रीच कँडी रुग्णालयातून डिस्चार्ज, पवारांची प्रकृती....
शरद पवार यांना ब्रीच कँडी रुग्णालयातून डिस्चार्ज, पवारांची प्रकृती.....
गिधाड धमक्या देऊ नका, तुम्ही संप पुकारलात तर आम्हीही रस्त्यावर उतरू...
गिधाड धमक्या देऊ नका, तुम्ही संप पुकारलात तर आम्हीही रस्त्यावर उतरू....
बीड कारागृहातून धक्कादायक माहिती, आणखी एक ऑडिओ क्लिप समोर
बीड कारागृहातून धक्कादायक माहिती, आणखी एक ऑडिओ क्लिप समोर.
गांधी हत्येचं मुनींकडून समर्थन, हर्षवर्धन सपकाळ भयंकर संतापले....
गांधी हत्येचं मुनींकडून समर्थन, हर्षवर्धन सपकाळ भयंकर संतापले.....
सदावर्ते यांच्या मराठी विरोधातील भूमिकेला मनसे कार्यकर्त्यांचा विरोध
सदावर्ते यांच्या मराठी विरोधातील भूमिकेला मनसे कार्यकर्त्यांचा विरोध.
सहानुभूतीची लाट की राजकीय गणित?; पवार कुटुंबातील सदस्याचं विधान चर्चेत
सहानुभूतीची लाट की राजकीय गणित?; पवार कुटुंबातील सदस्याचं विधान चर्चेत.
लिंगपिसाट खरातला घाम फोडणारी बातमी, बडा मासा ईडीच्या जाळ्यात; थेट धाड
लिंगपिसाट खरातला घाम फोडणारी बातमी, बडा मासा ईडीच्या जाळ्यात; थेट धाड.
बारामती पोटनिवडणूक: काटेवाडीत सुनेत्रा पवारांसह पवार कुटुंबाचे मतदान
बारामती पोटनिवडणूक: काटेवाडीत सुनेत्रा पवारांसह पवार कुटुंबाचे मतदान.
रिक्षा-टॅक्सी चालकांचा सरकारविरोधात आक्रमक पवित्रा
रिक्षा-टॅक्सी चालकांचा सरकारविरोधात आक्रमक पवित्रा.
सकाळी 9 वाजेपर्यंत तामिळनाडू आणि पश्चिम बंगालमध्ये किती टक्के मतदान?
सकाळी 9 वाजेपर्यंत तामिळनाडू आणि पश्चिम बंगालमध्ये किती टक्के मतदान?.