AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

भारतात शाओमीचा नवा फोन लाँच, किंमत 6 हजार रुपयांपेक्षाही कमी

चीनची स्मार्टफोन कंपनी शाओमीने भारतात आपला लेटेस्ट बजट स्मार्टफोन ‘रेडमी 7A’ (Redmi 7A) लाँच केला आहे. शाओमीचे व्यवस्थापकीय संचालक मनु जैन यांनी ट्विट करत याची घोषणा केली.

भारतात शाओमीचा नवा फोन लाँच, किंमत 6 हजार रुपयांपेक्षाही कमी
| Updated on: Jul 04, 2019 | 6:10 PM
Share

नवी दिल्ली: चीनची स्मार्टफोन कंपनी शाओमीने भारतात आपला लेटेस्ट बजट स्मार्टफोन ‘रेडमी 7A’ (Redmi 7A) लाँच केला आहे. शाओमीचे व्यवस्थापकीय संचालक मनु जैन यांनी ट्विट करत याची घोषणा केली. यानुसार भारताच रेडमी 7A स्मार्टपोन रेडमी 6A ची जागा घेईल. या स्मार्टपोनची विक्री 11 जुलैपासून होणार आहे.

जैन यांनी सांगितले, “कंपनीने यावर्षी भारतात एप्रिलमध्ये रेडमी 4A, 5A आणि 6A हे 2.36 कोटी स्मार्टफोन विकले. हे स्मार्टफोन आता सॅमसंग गॅलक्सी M10 ((Samsung Galaxy M10) आणि नोकिया 2.2 (Nokia 2.2) या स्मार्टफोनलाही लवकरच मागे टाकेल.”

गिजमोचाईनाच्या अहवालानुसार रेडमी 7A स्मार्टफोन आधीच आंतरराष्ट्रीय बाजारात आला आहे. त्यात स्नॅपड्रॅगन 439 चिपसेट लावण्यात आला आहे. या स्मार्टफोनमध्ये रेडमी 6A प्रमाणे मीडियाटेक चिपसेट लावण्यात आलेला नाही.

स्मार्टफोनची स्पेसिफिकेशन

रेडमी 7A मध्ये एचडी प्लस रिजोल्यूशनसह 5.4 इंचाचा आयपीएस एलसीडी डिस्प्ले देण्यात आला आहे. हा फोन क्वॉलकम स्नॅपड्रॅगन 439 चिपसेटसह उपलब्ध आहे. यात नॅनो ड्युअल सिमची व्यवस्था असून एमआययूआय 10 वर आधारित आहे. या स्मार्टफोनमध्ये अँड्रॉईड 9 पाय ऑपरेटिंग सिस्टम देण्यात आली आहे. तसेच बॅटरीची क्षमता 4000 एमएएच एवढी आहे.

रेडमी 7A 2 जीबी रॅम + 16 जीबी इंटरनल स्टोरेज आणि 2 जीबी रॅम + 16 जीबी इंटरनल स्टोरेज वेरिएंटमध्ये उपलब्ध होईल. यूजर मायक्रोएसडी कार्डचा उपयोग करुन स्टोरेज स्पेस 256 जीबीपर्यंत वाढवू शकतात. या स्मार्टफोनमध्ये 12 मेगापिक्सलचा Sony IMX486 रिअर कॅमेरा आहे. त्यात फेस डिटेक्शन आणि ऑटोफोकस फीचरही उपलब्ध आहे. स्मार्टफोनमध्ये एआय फेस अनलॉकची (AI Face Unlock) व्यवस्थाही देण्यात आली आहे. तसेच फ्रंटला 5 मेगापिक्सल कॅमेरा आहे.

किंमत

भारतात रेडमी 7A च्या 2 जीबी रॅम आणि 16 जीबी स्टोरेज वेरिएंटची किंमत 5,999 रुपये आहे. तसेच 2 जीबी रॅम आणि 32 जीबी स्टोरेज वेरिएंटची किंमत 6,199 रुपये आहे. हा फोन मॅट ब्लॅक, मॅट ब्लू आणि मॅट गोल्ड अशा 3 रंगांमध्ये उपलब्ध होणार आहे.

लाँच ऑफर

लाँच ऑफरमध्ये Redmi 7A स्मार्टफोनच्या दोन्ही वेरिएंटच्या किमतीत 200 रुपयांची सुट मिळणार आहे. हँडसेटची सुरुवातीची किंमत 5,799 रुपये ठेवण्यात आली आहे. ही ऑफर केवळ जुलैपर्यंत लागू असणार आहे.

Redmi 7A ची विक्री 11 जुलैला दुपारी 12 वाजल्यापासून होईल. हा फोन फ्लिपकार्ट, एमआय डॉट कॉम आणि एमआय होम स्टोअर्समध्ये उपलब्ध होईल. त्यानंतर हा स्मार्टफोन ऑफलाईन बाजारातही उपलब्ध होईल.

चुनाभट्टी येथे चैत्यभूमीकडे जाणाऱ्या आंबेडकर अनुयायांचा रास्ता रोको
चुनाभट्टी येथे चैत्यभूमीकडे जाणाऱ्या आंबेडकर अनुयायांचा रास्ता रोको.
तिन्ही पक्षाचा मालिक एक, अ‍ॅनाकोंडा गिळल्याशिवाय... ठाकरेंचा निशाणा
तिन्ही पक्षाचा मालिक एक, अ‍ॅनाकोंडा गिळल्याशिवाय... ठाकरेंचा निशाणा.
अमित ठाकरे यांच्या मेहुण्याच्या दिल्लीत विवाह, मोदींची सोहळ्याला हजेरी
अमित ठाकरे यांच्या मेहुण्याच्या दिल्लीत विवाह, मोदींची सोहळ्याला हजेरी.
जसं पार्थ पवारांना माफ केलं तसं तपोवनातील झाडांना...मनसेकडून थेट इशारा
जसं पार्थ पवारांना माफ केलं तसं तपोवनातील झाडांना...मनसेकडून थेट इशारा.
मालवणमध्ये फिरायला जाताय? सिंधुदुर्गात जाणाऱ्या जेटीची अवस्था बघा!
मालवणमध्ये फिरायला जाताय? सिंधुदुर्गात जाणाऱ्या जेटीची अवस्था बघा!.
नटरंगी नार.... रुपाली ठोंबरेंचा रोख कुणावर? कोणाचा घेतला खरपूस समाचार?
नटरंगी नार.... रुपाली ठोंबरेंचा रोख कुणावर? कोणाचा घेतला खरपूस समाचार?.
फडणवीसांचा दरिंदा, जल्लाद अन् गजनी उल्लेख, काँग्रेस नेता पुन्हा बरळला
फडणवीसांचा दरिंदा, जल्लाद अन् गजनी उल्लेख, काँग्रेस नेता पुन्हा बरळला.
इंदू मिल स्मारकाबाबत CM फडणवीसांची मोठी घोषणा, थेट सांगितली डेडलाईन
इंदू मिल स्मारकाबाबत CM फडणवीसांची मोठी घोषणा, थेट सांगितली डेडलाईन.
तपोवन वृक्षतोडीविरोधात मनसे नाशिककरांच्या सोबतीला, चित्रपट सेना आक्रमक
तपोवन वृक्षतोडीविरोधात मनसे नाशिककरांच्या सोबतीला, चित्रपट सेना आक्रमक.
फडणवीस सरकारच 1 वर्ष, मुख्यमंत्र्यांना किती मार्क? काय सांगतो सर्व्हे?
फडणवीस सरकारच 1 वर्ष, मुख्यमंत्र्यांना किती मार्क? काय सांगतो सर्व्हे?.