AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

मॅचची मजा घ्यायची आहे ? असा वाढवा तुमच्या WiFi चा स्पीड

IPL 2023 Livestream : जर तुम्हाला आयपीएलची मॅच विना व्यत्यय महायची असेल तर इंटरनेटचा स्पीड वाढवण्यासाठी काही टिप्स फॉलो करा.

मॅचची मजा घ्यायची आहे ? असा वाढवा तुमच्या WiFi चा स्पीड
Image Credit source: freepik
| Updated on: Apr 07, 2023 | 11:49 AM
Share

नवी दिल्ली : आजकाल सर्वजण स्मार्टफोन (smartphone) वापरत असतात. काही ना काही ब्राऊज करत असतात. त्यामुळे इंटरनेट कनेक्शन (internet connection) आपल्या जीवनाचा भाग बनले आहे. आपल्या दैनंदिन जीवनातील जवळजवळ प्रत्येक प्रकारच्या माहितीसाठी आपण त्याचा वापर करत असतो. अशा परिस्थितीत, सध्या सुरू असलेल्या IPLच्या मॅचेस कोणत्याही अडथळ्याशिवाय पाहण्यासाठीही तुम्हाला हाय स्पीड इंटरनेटची (high speed internet) आवश्यकता आहे. अनेक वेळा आपल्याला आवश्यक तेवढा इंटरनेट स्पीड सर्वत्र मिळत नाही. त्यामुळे सामना पाहण्याची मजाच जाते. अशा परिस्थितीत, जर तुम्हाला जर कोणत्याही अडचणीशिवाय आयपीएल सामना बघायची इच्छा असेल तर काही या स्टेप्सच्या मदतीने तुम्ही तुमचा इंटरनेट स्पीड वाढवू शकता.

स्मार्टफोन / डिव्हाईस रीस्टार्ट करा

तुम्हाला तुमच्या वायफायचा स्पीड वाढवायचा असेल तर तुम्ही तुमचा फोन काही काळ बंद करून पुन्हा चालू करू शकता. यामुळे तुमच्या वायफायच्या स्पीडची समस्या दूर होईल. तसेच तुम्ही तुमचा वायफायचा राउटर पुन्हा चालू आणि बंद करू शकता. यानेही स्पीड वाढण्यास मदत होऊ शकते.

वायफाय राऊटर रीस्टार्ट करा

तुमचा फोन रीस्टार्ट केल्याने समस्या सुटत नसेल, तर तुमचे वायफाय राउटर बंद करा. त्यानंतर ते अनप्लग करा आणि किमान एक किंवा दोन मिनिटे असेच राहू द्या. यानंतर पुन्हा सुरू करा.

राऊटर जवळ ठेवण्याचा प्रयत्न करा

तुमचे मोबाईल, लॅपटॉप किंवा अन्य डिव्‍हाइस आणि राऊटरमध्‍ये अनेक अडथळे आल्‍यामुळे इंटरनेट कनेक्‍टिव्हिटीमध्‍ये समस्या निर्माण होऊ शकतात. सिग्नल ब्लॉकेज कमी करण्यासाठी, राउटर आणि स्मार्टफोनमधील किंवा डिव्हाइसमधील अंतर शक्य तितके कमी ठेवण्याचा प्रयत्न करा. तुमचा राउटर जास्त उंचीवर ठेवून तुम्ही सिग्नलची चांगली स्ट्रेंथ देखील मिळवू शकता.

वायफाय नेटवर्क पुन्हा सेव्ह करावे

तुमचे पूर्वी सेव्ह केलेले WiFi नेटवर्क हटवा आणि पासवर्ड टाकून ते पुन्हा ॲड करावे. सर्व काही व्यवस्थित झाल्यास, यामुळे वाय-फाय सिग्नल वाढविण्या मदत होऊ शकेल. याशिवाय, तुम्ही तुमचा फोन एकदा रीस्टार्ट करून तुमच्या वायफायचा वेगही ठीक करू शकता.

रूपाली ठोंबरेंकडून बाळासाहेब अन् पवारांसोबत फोटो शेअर, चर्चांना उधाण
रूपाली ठोंबरेंकडून बाळासाहेब अन् पवारांसोबत फोटो शेअर, चर्चांना उधाण.
मुंबईत भाजपच्या महापौरामुळं कॉलर टाईट होणार! लोढांचं मोठं वक्तव्य काय?
मुंबईत भाजपच्या महापौरामुळं कॉलर टाईट होणार! लोढांचं मोठं वक्तव्य काय?.
चैत्यभूमीवर जनसागर... बाबासाहेबांच्या महापरिनिर्वाण दिनी मोठी गर्दी
चैत्यभूमीवर जनसागर... बाबासाहेबांच्या महापरिनिर्वाण दिनी मोठी गर्दी.
डॉ. आंबेडकरांना राज्यपाल, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांकडून आदरांजली
डॉ. आंबेडकरांना राज्यपाल, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांकडून आदरांजली.
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो.
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं.
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!.
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?.
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?.
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.