मोहखेडमध्ये प्यायला पाणी नाही, मुख्यमंत्री म्हणतात ‘पाणीदार गाव’!

गणेश सोळंकी, टीव्ही 9 मराठी, बुलडाणा : बुलडाण्यातील मोहखेड शिवार पाणीदार झाल्याचे ट्वीट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केल्यानंतर बुलडाण्यात एकच चर्चा सुरु झाली. मोहखेड शिवार नेमके कुठे पाणीदार झाले? असा प्रश्न बुलडाणावासियांना पडला. त्यातच काँग्रेसचे आमदार राहुल बोंद्रे यांनी मुख्यमंत्र्यांच्या ट्वीटची पोलखोल केली आहे. दुष्काळाच्या झळा सोसणाऱ्या मोहखेडवासियांच्या जखमेवर मुख्यमंत्र्यांनी मीठ चोळल्याची टीका आमदार बोंद्रेंनी […]

मोहखेडमध्ये प्यायला पाणी नाही, मुख्यमंत्री म्हणतात 'पाणीदार गाव'!
Follow us
| Updated on: Nov 14, 2018 | 5:53 PM

गणेश सोळंकी, टीव्ही 9 मराठी, बुलडाणा : बुलडाण्यातील मोहखेड शिवार पाणीदार झाल्याचे ट्वीट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केल्यानंतर बुलडाण्यात एकच चर्चा सुरु झाली. मोहखेड शिवार नेमके कुठे पाणीदार झाले? असा प्रश्न बुलडाणावासियांना पडला. त्यातच काँग्रेसचे आमदार राहुल बोंद्रे यांनी मुख्यमंत्र्यांच्या ट्वीटची पोलखोल केली आहे. दुष्काळाच्या झळा सोसणाऱ्या मोहखेडवासियांच्या जखमेवर मुख्यमंत्र्यांनी मीठ चोळल्याची टीका आमदार बोंद्रेंनी केली असून, मुख्यमंत्र्यांनी मोहखेडवासियांची माफी मागण्याची मागणीही बोंद्रेंनी केली आहे.

मुख्यमंत्र्यांनी नेमके काय ट्वीट केले?

3 नोव्हेंबर 2018 रोजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ‘सीएमओ महाराष्ट्र’ या हँडलवरुन “मोहखेड़ शिवार झाले पाणीदार!” असे ट्वीट केले होते. या ट्वीटला त्यांनी काही वर्तमानपत्रांमधील कात्रणंही जोडली होती.

मुख्यमंत्र्यांच्या याच ट्वीटवरुन सध्या गदारोळ सुरु झाला आहे. मोहखेड भाग सध्या दुष्काळाच्या झळा सोसतो आहे. त्यामुळे तेथील जनतेच्या जखमेवर मुख्यमंत्र्यांनी मीठ चोळल्याचा आरोप काँग्रेस आमदार राहुल बोंद्रे यांनी केला आहे. शिवाय, मुख्यमंत्र्यांनी या ट्वीटप्रकरणी माफी मागण्याचीही मागणी बोंद्रेंनी केली आहे.

बुलडाण्यातील मेहकर तालुक्यातील मोहखेड गाव जलयुक्त शिवाराच्या कामांमुळे जलमय झाल्याचा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा दावा किती खोटारडा आहे, हे काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष आमदार राहुल बोंद्रे यांनी समोर आणले आहे. मोहखेडवासियांसह बोंद्रेंनी गावातच पत्रकार परिषद घेऊन मुख्यमंत्र्यांच्या दाव्याचा पर्दाफाश केला.

मोहखेडमध्ये नेमकी काय स्थिती आहे?

मोहखेड गावाची लोकसंख्या 623 आहे. गावात पाणीपुरवठा योजनेचे तीनतेरा वाजले आहेत. गावाला आठ दिवसाआड पाणीपुरवठा होतो आहे. तोही गावातील शेतकऱ्याच्या विहिरीतून पाणी आणून ते पाणी नळयोजनेच्या विहिरीत टाकलं जातं आहे. त्यानंतरच गावाला पाणी मिळतं. गावाच्या बाहेर दोन पाझर तलाव असून तेही संपूर्णपणे आटलेले आहेत. तर गावाची निवड जलयुक्त शिवार योजनेत झाल्याने परिसरात पाच सिमेंट बंधारे झालेत. मात्र यावर्षी पाऊस कमी झाल्याने चार बंधाऱ्यात पाणीच नाही. परिसरातील सगळ्या विहिरी आटल्या आहेत. जनावरांना सुद्धा प्यायला पाणी नाही. शेतातील विहिरी आटल्याने शेतकऱ्यांनी रब्बी पिकेही पेरली नाहीत. संपूर्ण जिल्ह्यात दुष्काळी परिस्थिती आहे.

मुख्यमंत्र्यांनी दावा केलेल्या जलयुक्त शिवाराच्या कामांमुळे फायदा झाला खरा, मात्र तो फक्त एका बंधाऱ्यात  पाणी असल्याने त्याच्या बाजूला असलेल्या एक-दोन शेतकऱ्यांनाच झाला. मात्र मोहखेडला पाणीदार म्हणणं येथील ग्रामस्थांच्या जिव्हारी लागले आहे. सिमेंट बंधारे कोरडे असताना, पाझर तलाव सुकलेले असताना, पावसाळ्यातील फोटो दाखवून ग्रामस्थांची दिशाभूल मुख्यमंत्र्यांनी केली.

एवढेच नव्हे तर आमदार राहुल बोंद्रे यांनी जिल्हा प्रशासनाची अधिकृत आकडेवारी दाखवून मुख्यमंत्री किती दिशाभूल करत हे दखवले असून, परिसरातील पाण्याची पातळीही भूजल सर्वेक्षण विभागानुसार दीड मीटरने कमी झालेली आहे. हे भीषण वास्तव असताना मुख्यमंत्री यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून खोट्या माहितीच्या आधारे संपूर्ण महाराष्ट्राची दिशाभूल केली आणि  मोहखेडवासियांचे जखमेवर मीठ चोळण्याचा प्रकार केला असल्याचा आरोप राहुल बोंद्रेंनी केला आहे.

Non Stop LIVE Update
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग.
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?.
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?.
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद.
दोनशे रूपये घ्या, पण... ठाकरेंच्या सभेसाठी आलेल्या लोकांकडून विनंती
दोनशे रूपये घ्या, पण... ठाकरेंच्या सभेसाठी आलेल्या लोकांकडून विनंती.
ज्या आईने तुम्हाला जन्म... राऊतांच्या त्या टीकेवर राणांची प्रतिक्रिया
ज्या आईने तुम्हाला जन्म... राऊतांच्या त्या टीकेवर राणांची प्रतिक्रिया.
म्हणून योग्य नेत्याला मतदान करा, तृतीयपंथीयांचं मतदरांना आवाहन काय?
म्हणून योग्य नेत्याला मतदान करा, तृतीयपंथीयांचं मतदरांना आवाहन काय?.
गुलाबी मतदान केंद्र कधी पाहिलंय? पिंक पोलिंग बूथची खासियत काय?
गुलाबी मतदान केंद्र कधी पाहिलंय? पिंक पोलिंग बूथची खासियत काय?.
आधी बजावला मतदानाचा हक्क मगच चढला बोहल्यावर, त्या नवदेवाची होतेय चर्चा
आधी बजावला मतदानाचा हक्क मगच चढला बोहल्यावर, त्या नवदेवाची होतेय चर्चा.
लोकशाहीच्या उत्सवाला प्रारंभ,विदर्भात 5 जागांवर पहिल्या टप्प्यात मतदान
लोकशाहीच्या उत्सवाला प्रारंभ,विदर्भात 5 जागांवर पहिल्या टप्प्यात मतदान.