31400000 रुपयांना विकल्या गेले ते 113 वय.र्षांपूर्वीचे जुने पत्र; ज्यात लिहिली होती टायटॅनिक जहाजाची भविष्यवाणी
Titanic Ship Prediction : टायटॅनिक जहाजाच्या चित्तरंजक कथेवर आधारीत चित्रपटाने काळजाचा ठाव घेतला आहे. टायटॅनिक जहाजाचे भाकीत करणारे एका पत्राला कोटींची किंमत मिळाली आहे. हे पत्र खरेदी करणाऱ्याचे नाव गुप्त ठेवण्यात आले आहे हे विशेष.

टायटॅनिक जहाजाची दुर्घटना अनेकांनी चित्रपटातून अनुभवली आहे. काहींनी याविषयीची डॉक्युमेंट्री पाहिली असेल, पुस्तक वाचले असेल. टायटॅनिक जहाजावरील एक प्रवाशाने लिहिलेल्या पत्राचा इंग्लंडमध्ये लिलाव झाल्या आहेत. कर्नल आर्चीबाल्ड ग्रेसी यांचे हे पत्र एका व्यक्तीने 3.41 कोटी रुपयांत (300,000 पाऊंड) खरेदी केले आहे. हा लिलाव रविवारी इंग्लंड येथील विल्टशायरमध्ये ‘हेनरी एल्ड्रिज अँड सन’ येथे झाला. हे पत्र खरेदी करणाऱ्याचे नाव गुप्त ठेवण्यात आले आहे हे विशेष.
मीडियाच्या वृत्तानुसार, या पत्राची सुरुवातीची अंदाजित किंमत जवळपास 60,000 पाऊंड इतकी होती. पण हे पत्र पाच पट अधिक किंमतीला विक्री झाले. हे पत्र जणू एखादी भविष्यवाणी असल्याचे म्हटले आहे. कारण या पत्रात कर्नल ग्रेसी यांनी एक वाक्य लिहिले आहे. त्यात, ‘हे जहाज निश्चितच चांगले आहे. पण याविषयी कोणताही निर्णय घेण्यापूर्वी आम्ही आमचा प्रवास पूर्ण होईपर्यंत थांबू’. असे म्हटले आहे.
हे पत्र 10 एप्रिल 1912 रोजी लिहिण्यात आले. त्यादिवशी कर्नल ग्रेसी टायटॅनिकवर उपस्थित होते. पाच दिवसानंतर हे जहाज उत्तरेतील अटलांटिक महासागरात एका हिमनगाला धडकून बुडाले. या दुर्घटनेत त्यावेळी जवळपास 1,500 लोकांना त्यांचे प्राण गमवावे लागले.
या जहाजात कर्नल ग्रेसी फर्स्ट क्लास प्रवाशी होते. त्यांनी कॅबिन क्रमांक C51 मधून हे पत्र लिहिले होते. हे पत्र दुसर्या दिवशी 11 एप्रिल रोजी क्वीन्सटाऊन येथून पोस्ट करण्यात आले होते. टायटॅनिक तिथे थांबले होते. या पत्रावर 12 एप्रिल रोजी लंडन येथील टपाल कार्यालयातील पोस्टमार्क पण लागलेला दिसतो. हे आतापर्यंतचे सर्वाधिक किंमतीला लिलाव झालेले पत्र असल्याची माहिती समोर येत आहे.
या दुर्घटनेत कर्नल ग्रेसी हे बचावले होते. त्यांनी ‘द ट्रुथ अबाऊट द टायटॅनिक’ नावाचे एक पुस्तक लिहिले होते. त्यांनी टायटॅनिक दुर्घटनेची माहिती यामध्ये दिली होती. या अति थंड पाण्यात एका लाईफबोटमुळे त्यांचे प्राण वाचले होते. लाईफबोटवर पोहचलेल्या अनेक लोकांचा थंड पाण्याने आणि थकव्यामुळे मृत्यू झाला होता. या घटनेनंतर ग्रेसी फार काळ जगू शकले नाही. त्यांची तब्येत अचानक बिघडली. ते कोमात गेले. पुढे 4 डिसेंबर 1912 रोजी मधुमेहामुळे त्यांचे निधन झाल्याचे मानण्यात येते.
