AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

चार हात, चार पाय, दोन हृदयाचं बाळ जन्मलं, लोकांची हॉस्पिटलमध्ये पाहायला गर्दी

या बाळाचा जन्म होताच त्याची बातमी वाऱ्यासारखी पसरली आणि रुग्णालयाच्या बाहेर तोबा गर्दी झाली, मुलीचे फोटो लागलीच व्हाट्सएपवर फिरायला लागले, लोक श्रद्धापूर्वक तिचे दर्शन घेऊ लागले.

चार हात, चार पाय, दोन हृदयाचं बाळ जन्मलं, लोकांची हॉस्पिटलमध्ये पाहायला गर्दी
unusual babyImage Credit source: socialmedia
| Updated on: Jun 15, 2023 | 6:07 PM
Share

छपरा : बिहारच्या ( Bihar Baby ) सरण जिल्ह्यातील छप्रामध्ये एका महिलेने विचित्र बाळाला ( Unusual Baby ) जन्म दिला आहे. या बाळाला चक्क चार हात, चार पाय आणि दोन हृदयं असल्याने त्याला पाहायला गर्दी जमली आहे. याला बाळ कन्या असल्याने त्याला देवीचा अवतार मानले जात असून सोशल मिडीयावर देखील हे बाळ प्रचंड व्हायरल (  Bihar Viral Baby )  झाले आहे. सर्वसामान्यांना हे बाळ म्हणजे दैवी चमत्कार वाटून या नर्सिंग होमला दर्शनासाठी गर्दी जमायला लागली.

बिहारातील छपरा येथील शामचक येथील संजीवनी नर्सिंग होम येथे मंगळवारी प्रसुता प्रिया देवी या महिलेने एका विचित्र बालिकेला जन्म दिला आहे. या बाळा चार हात, चार पाय आणि चार कान होते. आणि धडधडणारी दोन हृदयं आणि पाठीचे कणेही दोन होते. शिवाय डोक्याचा आकार देखील नेहमीपेक्षा वेगळा होता. या नर्सिंग होम बाहेर हे विचित्र बाळ पहाण्यासाठी मोठी गर्दी उसळली होती. काही जण या बाळाला दैवी चमत्कार म्हणून त्याचं दर्शन करीत होते. तर इतर लोक बायोलॉजिक घटना म्हणून पाहत होते. या मुलीचा जन्म झाल्यानंतर अवघा वीस मिनिटांत तिचा मृत्यू झाला. या महीलेचे हे पहिलेच अपत्य होते.

unusual baby

bihar unusual baby

हॉस्पिटलचे संचालक डॉ. अनिल कुमार या विचित्र बाळाविषयी माहीती दिली. या बाळाला एक डोके, चार कान, चार पाय आणि चार हात शिवाय दोन स्पायनल कॉड आहेत. तिच्या छातीत दोन हृदयं धडकत होती. हॉस्पिटलने या महिलेची सिजेरीयन शस्त्रक्रिया करण्यात येऊन या बाळाची प्रसुती करण्यात आली. अर्था हे बाळ फारसे जगले नाही. जन्मानंतर 20 मिनिटातच त्याचा मृत्यू झाला.

असे का होते ? 

या बाळाच्या आईचे हे पहिलेच बाळ असल्याने ती तणावात होती. त्यातच अपेक्षित वेळेत बाळ जन्माला येऊ न शकल्याने ही महिला तणावाखाली होती. त्यामुळ डॉक्टरांनी तपासण्या करुन बाळाला ऑपरेशन करुन बाहेर काढले. सुदैवाने आईची प्रकृती सध्या चांगली आहे. एकावेळी अनेक अंडबिजांचे एकत्र फलन झाल्यानंतर गर्भाशयात अशी विचित्र बाळं जन्माला येतात परंतू ती फार काळ वाचू शकत नाही. अशी बाळं जन्माला येणे हा काही दैवी चमत्कार नसून अत्यंत सर्वसामान्य घटना आहे. दोन बाळाच्या बिजाचे एका अंड्यात फलन झाल्यावर असा प्रकार घडतो.

उद्यापासून हिवाळी अधिवेशन; सरकारचा चहापानाच्या कार्यक्रमाला सुरुवात
उद्यापासून हिवाळी अधिवेशन; सरकारचा चहापानाच्या कार्यक्रमाला सुरुवात.
महिलांच्या फसवणुकींची आयोग दखल घेत नाही; अंधारेंचा गंभीर आरोप
महिलांच्या फसवणुकींची आयोग दखल घेत नाही; अंधारेंचा गंभीर आरोप.
इंडिगो अजूनही विस्कळीत, आजही अनेक विमानं रद्द
इंडिगो अजूनही विस्कळीत, आजही अनेक विमानं रद्द.
हिवाळी अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर नागपूरात नेत्यांची बॅनरबाजी
हिवाळी अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर नागपूरात नेत्यांची बॅनरबाजी.
विरोधी पक्षनेतेपदासाठी संख्याबळ आवश्यक; शंभूराज देसाईंचा खुलासा
विरोधी पक्षनेतेपदासाठी संख्याबळ आवश्यक; शंभूराज देसाईंचा खुलासा.
मुख्यमंत्र्यांनी शब्द दिलाय म्हणून..; जरांगेंची मराठा आरक्षणावर भूमिका
मुख्यमंत्र्यांनी शब्द दिलाय म्हणून..; जरांगेंची मराठा आरक्षणावर भूमिका.
विरोधी पक्षनेत्यांना बंगला नाही! काँग्रेसचा सरकारवर हल्ला
विरोधी पक्षनेत्यांना बंगला नाही! काँग्रेसचा सरकारवर हल्ला.
कॅसेट गुळगुळीत झाली! प्रवीण दरेकर यांचा विरोधी पक्षावर हल्ला
कॅसेट गुळगुळीत झाली! प्रवीण दरेकर यांचा विरोधी पक्षावर हल्ला.
लाडकी बहीण योजनेमुळे सरकार कर्जबाजारी नाही! भास्कर जाधवांचं मोठं विधान
लाडकी बहीण योजनेमुळे सरकार कर्जबाजारी नाही! भास्कर जाधवांचं मोठं विधान.
Move On ... स्मृती मानधनाचं लग्न अखेर मोडलं! म्हणाली, ही वेळ...
Move On ... स्मृती मानधनाचं लग्न अखेर मोडलं! म्हणाली, ही वेळ....