
दररोज सोशल मीडियावर काही ना काही व्हायरल होत असते. कधी कोणाचा मेजशीर व्हिडीओ व्हायरल होतो तर कधी कुणाच्या आयुष्यातील नको असलेल्या गोष्टी देखील व्हायरल होतात. सध्या सोशल मीडियावर जंगलातील प्राण्यांचे व्हिडीओ मोठ्या प्रमाणावर व्हायरल होताना दिसतात. सध्या असाच एक माकडांचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे. या व्हिडीओमध्ये माकडांसमोर एक प्लास्टिकचा साप ठेवला असल्याचे दिसत आहे. हा साप पाहून माकडांची जी प्रतिक्रिया आहे ती पाहण्यासारखी आहे.
नेमकं काय घडलं?
सोशल मीडियावर व्हायरल होणाऱ्या व्हिडीओमध्ये ओरंगुटानचा कळप प्लास्टिकच्या सापाला पाहून प्रचंड घाबरला असल्याचे दिसत आहे. ओरंगुटान ही माकडांचीच एक प्रजाती आहे, जी इंडोनेशिया आणि मलेशियाच्या जंगलांमध्ये आढळते. व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता की ओरंगुटानचा कळप जंगलात एका ठिकाणी बसलेला आहे, तेव्हा त्यांचे लक्ष प्लास्टिकच्या सापाकडे जाते तेव्हा ते खरा साप समजून त्याला घाबरतात.
वाचा: धक्कादायक! अभिनेत्रीच्या दोन्ही मुलांचा शॉर्ट सर्किटमुळे गुदमरून मृत्यू
Teaching Orangutan the fear of snakes for survival 🦧 pic.twitter.com/OyEZW6rvgs
— Wildlife Uncensored (@TheeDarkCircle) September 28, 2025
भीतीने एकमेकांना घट्ट पकडतात. काही सेकंदांत त्यांची जी अवस्था होते, ती पाहण्यासारखी आहे. भीतीने सर्व ओरंगुटान दूर जाऊन बसतात आणि लपून त्या बनावट सापाकडे पाहत राहतात. दरम्यान, तिथे एक व्यक्ती येते आणि ती बनावट सापाला काठीने मारायला लागते. हा सारा प्रकार सर्व ओरंगुटान पाहत असतात, पण तरीही त्यांच्या मनातील भीती स्पष्ट दिसते. त्यांनी या प्लास्टिकच्या सापापासूनही लांब राहण्याचा निर्णय घेतला आहे.
व्हिडीओ जोरदार व्हायरल
हा मजेदार व्हिडीओ सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्स (ट्विटर) वर @TheeDarkCircle या आयडीवरून शेअर करण्यात आला आहे. सुमारे एक मिनिटांच्या या व्हिडीओला आतापर्यंत 19 हजारांहून अधिक वेळा पाहिले गेले आहे, तर शेकडो लोकांनी व्हिडिओला लाइक केलं आहे आणि विविध मजेदार प्रतिक्रिया दिल्या आहेत. व्हिडीओ पाहून एका युजरने लिहिले की, ‘माकडंही प्रयोग करून पाहत आहेत, कुठे ही चतुर माणसांची चाल तर नाही’, तर दुसऱ्या युजरने मिश्किलपणे लिहिलं की, ‘प्लास्टिकच्या सापाने माकडांची इज्जतच काढली.’ दुसरीकडे, एकाने लिहिलं आहे की, ‘खरं सांगायचं तर आम्हीही अचानक असा साप पाहिला तर पळून जाऊ’, तर आणखी एकाने लिहिले की, ‘माकडांच्या प्रतिक्रिया खूपच रोचक आणि आकर्षक आहेत.’