विशाल माशाने चक्क माणसाला अर्धे गिळले, नंतर जे झाले ते थरकाप उडवणारे, Video

Viral Video: निसर्गाचा खेळ कधी-कधी मानवाच्या कल्पनेपलिकडचा असतो. आता या संदर्भातील एक धक्कादायक व्हिडीओ व्हायरल होत आहे. लोक हा व्हिडीओ पाहून हैराण झाले आहेत की एका व्यक्तीला माशाने अर्धे गिळण्याचा प्रयत्न केलेला आहे.

विशाल माशाने चक्क माणसाला अर्धे गिळले, नंतर जे झाले ते थरकाप उडवणारे, Video
Shocking viral video
| Updated on: Nov 23, 2025 | 4:58 PM

समुद्रात असे अनेक मासे आहेत जे इतके मोठे असतात की एकाच वेळी अनेक माणसांना गिळू शकतील. परंतू प्रत्यक्षात असे प्रत्यक्ष क्वचितच पाहायला मिळते.परंतू सोशल मीडियावर एक असा व्हिडीओ वेगाने व्हायरल होत आहे, तो पाहून अंगावर काटे येतील. व्हायरल व्हिडीओ एखाद्या हॉरर चित्रपटाचा सीन वाटत आहे. एका विशाल आकाराच्या माशाने एका व्यक्तीला अर्धे गिळले. त्यानंतर जो नजारा पाहायला मिळाला तो पाहून तुमचा थरकाप उठेल. हा व्हिडीओ पाहून अनेकांना धक्का बसला आहे. मोठ्या महत्प्रयासाने या व्यक्तीचे प्राण वाचवले.

व्हिडीओत तुम्ही पाहू शकता की हा मासा किती विशालकाय आहे. ज्याने एका व्यक्तीला जवळपास अर्धे गिळले आहे. त्याचे मित्र त्याला वाचवण्याचा प्रयत्न करताना दिसत आहे. एका मित्राने या जखमी व्यक्तीचे पाय पकडले आहेत. खूप प्रयत्न केल्यानंतर हे तीन मित्र या माशाच्या तोंडात अडकलेल्या त्यांच्या मित्राला कसेबसे बाहेर काढण्यात यशस्वी होतात. हा व्हिडीओ पाहायला अगदी खरोखरचा वाटत आहे. परंतू हा एक एआय जनरेटेड व्हिडीओ आहे. एका युजरने ग्रोकला ( Grok ) या संदर्भात विचारले असता अशी घटना घडल्याचा कोणतेही प्रमाण नसल्याचे ग्रोकने सांगितले.

कॅटफिशने व्यक्तीवर हल्ला केला

अत्यंत धक्कादायक असलेल्या या व्हिडीओला सोशल मीडियावर प्लॅटफॉर्म एक्स  ( ट्विटर )वर @yeeezyyy360 नावाच्या आयडीने शेअर केला आहे. कॅप्शनमध्ये लिहीले आहे की नदीत कॅटफिशचा धक्कादायक हल्ला. मित्रांनी व्यक्तीला सुरक्षित बाहेर काढले.

केवळ १५ सेकंदाच्या या व्हिडीओला आतापर्यंत ५ दशलक्ष म्हणजे ५० लाखाहून अधिक वेळा पाहिले गेले आहे. आतापर्यंत सात हजाराहून अधिक लोकांनी या व्हिडीओला लाईक केली आहे. आणि या व्हिडीओला वेगवेगळ्या प्रतिक्रीयाही दिलेल्या आहे. व्हिडीओला पाहून युजरने म्हटले की असा नजारा मी आधी कधीच नाही पाहिला. तर एका युजरने सांगितले की आता हा व्यक्ती पुन्हा या नदीच्या किनाऱ्यावर कधी दिसणार नाही. तर अनेक युजरने हा व्हिडीओ पाहाताच ओळखले की हा एआय जनरेटेड व्हिडीओ आहे. खरी घटना नाही.

येथे पाहा व्हिडीओ –