AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Viral Video: 150 किलोची पल्सर डोक्यावर घेऊन हे महाशय थेट बसच्या टपावर चढले, असा देसी जुगाड तुम्ही पाहिला नसेल!

सध्या सोशल मीडियावर असाच एक व्हिडीओ व्हायरल होत आहे, या व्हिडीओत एक माणूस चक्क डोक्यावर पल्सर घेऊन बसवर चढताना दिसतो आहे. 45 सेकंदाचा हा व्हिडीओ पाहून अनेकांना आश्चर्याचा धक्का बसला आहे.

Viral Video: 150 किलोची पल्सर डोक्यावर घेऊन हे महाशय थेट बसच्या टपावर चढले, असा देसी जुगाड तुम्ही पाहिला नसेल!
45 सेकंदाचा हा व्हिडीओ पाहून अनेकांना आश्चर्याचा धक्का बसला आहे
| Edited By: | Updated on: Sep 21, 2021 | 3:12 PM
Share

जगात टॅलेंटेड लोकांची कमी नाही. त्यात भारतातील लोक तर काय जुगाड करतील हे सांगता येत नाही. हे पाहुन अनेकदा प्रश्न पडतो, आपल्याकडे इतकं टॅलेंट असताना आपण मागे का राहतो. सध्या सोशल मीडियावर असाच एक व्हिडीओ व्हायरल होत आहे, या व्हिडीओत एक माणूस चक्क डोक्यावर पल्सर घेऊन बसवर चढताना दिसतो आहे. 45 सेकंदाचा हा व्हिडीओ पाहून अनेकांना आश्चर्याचा धक्का बसला आहे. IPS रुपीन शर्मा यांनी हा व्हिडीओ ट्विट करत लिहलं आहे, वा काय बॅलेंस आहे! (A man riding a Pulsar bike climbed on top of the bus)

या व्हिडीओत तुम्ही पाहून शकता, एक बस उभी आहे. बस जवळचं काही लोक पल्सर बाईकला घेऊन उभे आहे. याचवेळी तिथं असलेल्या एक व्यक्ती या बाईकला उचलून आपल्या डोक्यावर ठेवतो. आणि हळू हळू बसची शिडी चढू लागतो. विशेष गोष्ट म्हणजे, शिड्या चढताना बाईकला लावलेले दोन्ही हात हा व्यक्ती सोडून देतो आणि डोक्यावर बॅलंस करत ही बाईक थेट बसच्या टपावर पोहचवतो.

पाहा व्हिडीओ:

आता तुम्ही पल्सरचं वजन काढलं तर ते 150 किलोच्या जवळपास आहे. रस्त्यावर चालवतानाही अनेकांना बाईकला बॅलंस करणं जमत नाही, त्यात हे महोदय थेट डोक्यावर घेऊन ही बाईक बॅलंस करत आहेत. या महाशयांच्या ताकदीचं आणि बॅलंसचं लोक भरभरुन कौतुक करताना दिसत आहेत.

आयपीएस रुपीन शर्मा यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवरुन हा व्हिडीओ ट्विट केला आहे. याच्या कॅप्शनमध्ये त्यांनी लिहलंय, वाह, काय बॅलंस आहे, परत एखदा भारतीय जुगाड. हा व्हिडीओ नेटकऱ्यांना चांगलाच आवडताना दिसतो आहे. एका युजने कमेंट केलीय की, आपल्या देशात टॅलेंटची कुठलीही कमी नाही, फक्त त्यांना सन्मानित करणाऱ्यांची कमी आहे. अशाच काही प्रतिक्रियांवर एक नजर टाकुयात..

कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल
कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल.
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?.
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने...
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने....
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?.
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा.
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका.
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?.
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन.
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की...
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की....
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक.