AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

असंही कारण असत का राजीनाम्याचं; कारण ऐकून लोक म्हणाले, याला म्हणतात, सीधी बात नो बकवास

व्हायरल होत असलेल्या या फोटोमध्ये तुम्ही पाहू शकता की, एका व्यक्तीने आपल्या कंपनीला राजीनामा पत्र दिले आहे. कारण त्याला काम करण्यात अजिबात मजा येत नाही.

असंही कारण असत का राजीनाम्याचं; कारण ऐकून लोक म्हणाले, याला म्हणतात, सीधी बात नो बकवास
राजीनामा Image Credit source: tv9
| Updated on: Jun 20, 2022 | 11:12 PM
Share

नवी दिल्ली : आधुनिकतेच्या या युगात लोक खूप सर्जनशील झाले आहेत. कोणतेही काम करण्यासाठी, लोक लांब आणि विस्तृत पद्धतींचा अवलंब करत नाही, तर थेट लहान आणि सर्जनशील (Creative) पद्धतीने बोलतात. जेणेकरून त्यांचा मुद्दा थेट लोकांपर्यंत पोहोचेल आणि समजायला कोणतीही अडचण येत नही. लोक फक्त एकमेकांशी बोलण्यातच तर व्यावसायिक आयुष्यातही (professional life) ही या पद्धतीचा अवलंबू करत आहेत. याच्याशी संबंधित एक किस्सा सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे, जिथे एका व्यक्तीने राजीनामा (resignation) पत्रात सरळ सरळ आपले म्हणणे मांडले आणि तो आपल्या बॉसला दिला. तर हे पत्र म्हणजे चांगले उदाहरण, जे आपल्याला कसे आणि केव्हा काय बोलावं आणि काय लिहावं याचं.

व्हायरल होत असलेल्या या फोटोमध्ये तुम्ही पाहू शकता की, एका व्यक्तीने आपल्या कंपनीला राजीनामा पत्र दिले आहे. कारण त्याला काम करण्यात अजिबात मजा येत नाही. त्या व्यक्तीचे हे राजीनामा पत्र इंटरनेटच्या जगात खुपच प्रसिद्ध झाला आहे. विशेष म्हणजे हा राजीनामा लोकांना खूप आवडला आहे.

उद्योगपती हर्ष गोयंका यांनी हे छायाचित्र ट्विटरवर शेअर केले आहे. ज्यासोबत त्यांनी कॅप्शन लिहिले आहे की, ‘हे पत्र लहान असेल पण त्यामागची समस्या गंभीर आहे, जी आपण सर्वांनी सोडवली पाहिजे.’ तर आतापर्यंत अडीच हजारांहून अधिक लोकांनी या छायाचित्राला लाईक आणि कमेंट करून प्रतिक्रिया दिल्या आहेत.

यावर कमेंट करताना एका यूजरने लिहिले की, ‘सर्व व्यवस्थापकांनी हे समजून घेतले पाहिजे.’ तर दुसऱ्या यूजरने कमेंट करून लिहिले की, ‘या व्यक्तीला माझा द्यावा.’ दुसऱ्या यूजरने कमेंट करून लिहिले की, ‘आजकाल बरेच लोक लिंक्डनवरच आपला राजीनामा देतात. याशिवाय अनेकांनी कमेंट करून आपल्या प्रतिक्रिया दिल्या आहेत.

चुनाभट्टीजवळ आंबेडकर अनुयायी अन् पोलिसांमध्ये वाद, थेट रस्ताच रोखला...
चुनाभट्टीजवळ आंबेडकर अनुयायी अन् पोलिसांमध्ये वाद, थेट रस्ताच रोखला....
इंडिगोची आजही 500 विमानं रद्द, प्रवाशांचा आक्रोश, कुठं काऊंटवर चढलं तर
इंडिगोची आजही 500 विमानं रद्द, प्रवाशांचा आक्रोश, कुठं काऊंटवर चढलं तर.
तपोवनातील प्रस्तावित प्रदर्शन केंद्राच्या निविदा प्रक्रियेला स्थगिती
तपोवनातील प्रस्तावित प्रदर्शन केंद्राच्या निविदा प्रक्रियेला स्थगिती.
शिंदेंमुळे 2022ला भाजप सत्तेत, शिवसेनेच्या मंत्र्याच्या दाव्यानं खळबळ
शिंदेंमुळे 2022ला भाजप सत्तेत, शिवसेनेच्या मंत्र्याच्या दाव्यानं खळबळ.
भाजप पदाधिकाऱ्यांनी मनसे पदाधिकाऱ्याला जबर धुतलं; उरणमध्ये घडलं काय?
भाजप पदाधिकाऱ्यांनी मनसे पदाधिकाऱ्याला जबर धुतलं; उरणमध्ये घडलं काय?.
वलसाडच्या ‘हापूस’ नामांकनाला कोकणचा कडाडून विरोध थेट...
वलसाडच्या ‘हापूस’ नामांकनाला कोकणचा कडाडून विरोध थेट....
BMC इज नॉट फॅमिली बिझनेस... भाजप नेत्याचा उद्धव ठाकरे यांना खोचक टोला
BMC इज नॉट फॅमिली बिझनेस... भाजप नेत्याचा उद्धव ठाकरे यांना खोचक टोला.
चुनाभट्टी येथे चैत्यभूमीकडे जाणाऱ्या आंबेडकर अनुयायांचा रास्ता रोको
चुनाभट्टी येथे चैत्यभूमीकडे जाणाऱ्या आंबेडकर अनुयायांचा रास्ता रोको.
तिन्ही पक्षाचा मालिक एक, अ‍ॅनाकोंडा गिळल्याशिवाय... ठाकरेंचा निशाणा
तिन्ही पक्षाचा मालिक एक, अ‍ॅनाकोंडा गिळल्याशिवाय... ठाकरेंचा निशाणा.
अमित ठाकरे यांच्या मेहुण्याच्या दिल्लीत विवाह, मोदींची सोहळ्याला हजेरी
अमित ठाकरे यांच्या मेहुण्याच्या दिल्लीत विवाह, मोदींची सोहळ्याला हजेरी.