440 वर्षे जुन्या सोन्याच्या नाण्याने तोडले सर्व रेकॉर्ड, लिलावात मिळाले इतके रुपये…
440 वर्षांपूर्वीच्या काळातील एका सोन्याच्या नाण्याचा लिलाव झाला आहे. हे नाणे इतके दुर्मिळ आहे की जगात अशी मोजकीच नाणी उरली आहेत.

लंडन – इतिहासातील एका सोन्याच्या नाण्याला लिलावात कोट्यवधी रुपये मिळाले आहेत. ब्रिटनच्या सर्वात प्रसिद्ध शासकांपैकी एक असलेल्या महाराणी एलिझाबेथ प्रथम (1558-1603) यांच्या शासनकाळात आलेल्या एका नाण्याचा लिलाव रेकॉर्डब्रेक किंमतीत झाला आहे.यास अधिकृतपणे ‘एलिझाबेथ प्रथम गोल्ड शिप रायल’ (Ship Ryal) म्हटले जाते. हे नाणे केवळ सोन्याचा तुकडा नाही तर यामागे एक रोमांचक इतिहास लपला आहे. हे नाणे 1584 ते 1586 दरम्यानचे आहे.
हेरिटेज ऑक्शनद्वारा नोव्हेंबरमध्ये आयोजित लिलावात हे नाणे 3,72,000 डॉलर ( सुमारे 3.30 कोटी रुपयांना विकले गेले आहे. ही एलिझाबेथ शिप रायल नाण्याची आतापर्यंत सर्वात मोठी बोली म्हटली जात आहे. इतिहास तज्ज्ञांच्या मते या नाण्यांना तयार करण्यासाठी जे सोने वापरण्यात आले होते ते सर फ्रान्सिस ड्रेक यांनी स्पॅनिश जहाजातून लुटले होते. ड्रेक यांना इंग्रज एक हिरो आणि प्रायवेटियर मानायचे. तर स्पॅनिश त्यांना समुद्री चाचा (Pirate) म्हणायचे. त्यावेळी खुपच कमी ‘शिप रायल’ नाणी तयार करायची. इतिहासकारांनी सांगितले की ही नाणी अमेरिकन वसाहतीकरणाची सुरुवात आणि 1588 मध्ये स्पॅनिश अर्माडाच्या पराभवाच्या आधी समुद्रावरील इंग्लंडच्या दबदब्याला दर्शवते.
नाण्यांवरील डिझाईन काय संदेश ?
या नाण्याचे सौदर्य पाहातच रहावे असे आहे. याच्या समोरच्या भागावर (Obverse) महाराणी एलिझाबेथ प्रथम यांना एका जहाजावर उभे असल्याचे दाखवले आहे. त्यांनी गाऊन परिधान केला असून त्यांच्या हातात राजदंड (Scepter) आणि ओर्ब (Orb)आहे. ही मुद्रा समु्द्रावर त्यांच्या शक्तीचे प्रतिक आहे.
नाण्याच्या पाठच्या भागावर (Reverse) फुलांची डिझाईनसह एक क्रॉस बनवले आहे. याला चमकत्या सुर्यावर गुलाब आणि मुकूट घातलेले सिंह दिसत आहेत. यात चारही बाजूंनी लॅटीन भाषेत एक बायबल संदेश लिहिलेला आहे. “IHS AVT TRANSIENS PER MEDIV ILLORVM IBAT” याचा अर्थ, ‘परंतू येशू त्यांच्यातून चालत, आपल्या रस्त्याने निघून गेले’ हा ल्यूक 4:30 चा संदर्भ आहे. त्या वेळी अनेक ट्युडर नाण्यांवर लिहिलेला असायचा.
का आहे रायल ?
‘रायल’ हा मूळ रुपातील स्कॉटलँडचे एक सोन्याचे नाणे होते. एक रायल सर्वसाधारणपणे 60 शिलिंगच्या बरोबरचा आहे. नाण्यांच्या इतिहासातील एक सर्वात प्रसिद्ध ‘रोज रायल’ आहे. जो एलिझाबेथ यांच्या नंतर राजा जेम्स प्रथम यांच्या शासनकाळात आला होता. आजच्या काळात रियाल (Rial) इराण, ओमान आणि यमन सारख्या देशांच्या नाण्यांमध्ये मानक एकक आहे, परंतू ब्रिटनमध्ये हे चलन नाही.
हेरिटेज ऑक्शनचे मॅनेजिंग डायरेक्टर काईल जॉनसन यांनी सांगितले की हा एक अविश्वसनीय कलेक्शनचा हिस्सा आहे. 400 वर्षांहून अधिक जुने असूनही हे नाणे ‘मिंट स्टेट’ (MS63) कंडीशनमध्ये आहे.ज्यामुळे हे खूपच खास नाणे आहे. ब्रिटिश नाणेशास्त्र संग्राहक यांचया दरम्यान सर्वात जास्त मागणी असणाऱ्या नाण्यांपैकी हे एक आहे. हे मध्ययुगीन डिझाईन शैलीत तयार केल्या शेवटच्या नाण्यांपैकी एक असून जगात आज अशी खूपच कमी नाणी उरली आहेत. त्यामुळेच याला कोट्यवधीचा भाव मिळाला आहे.
