
नवरा आणि बायकोचे नाते हे जगातील सर्वात सुंदर नाते असल्याचे म्हटले जाते. शेवटच्या क्षणापर्यंत एकमेकांची साथ देण्याचे वचन ते एकमेकांना देतात. पण या नात्यात अनेक चढ-उतार देखील येतात. कधी नवरा-बायकोमध्ये भांडण होते तर कधी ते एकत्र आनंदाचे क्षण साजरे करतात. सध्या सोशल मीडियावर एक असाच व्हिडीओ व्हायरल झाला आहे. या व्हिडीओमध्ये चालत्या गाडीवर नवरा-बायकोमध्ये भांडण सुरु असल्याचे दिसत आहे.
पती-पत्नीचे तुम्ही अनेक ड्रामे पाहिले असतील, दोघांमध्ये तीव्र शाब्दिक लढाई मारामारीपर्यंत पोहोचलेलेही पाहिले असेल. पण यावेळी सोशल मीडियावर व्हायरल होत असलेला व्हिडीओ मात्र वेगळ्याच लेव्हलचा आहे. यात पत्नीने पतीला बाइकवर बसवून २७ सेकंदांत सलग १४ कानाखाली मारल्या आहेत. व्हिडीओमध्ये असा दावा केला जात आहे की, पत्नीने पतीला दुसऱ्या एखाद्या महिलेसोबत पाहिले होते, त्यामुळे तिने हे कृत्य केले आहे.
पत्नीने पतीला सलग मारल्या १४ कानाखाली
खरेतर, सोशल मीडियावर एक व्हिडीओ खूप वेगाने व्हायरल होत आहे. त्यात एक महिला आपल्या पतीला बाइकवर बसवून एकापाठोपाठ कानाखाली मारताना दिसत आहे. या व्हिडीओमध्ये दिसते की, पती बाइक चालवत आहे आणि पत्नी मागे बसली आहे. अचानक ती पतीवर हल्ला करते आणि एकापाठोपाठ अनेक कानाखाली मारते. लोकांनी मोजले तर कळले की, महिलाने २७ सेकंदांत १४ कानाखाली मारल्या आहेत. या दरम्यान बाइक अनेकदा असंतुलित झाली, पण महिलाने मारणे थांबवले नाही.
Kalesh b/w Couple on bike (Recorded by Kaleshi bois) pic.twitter.com/qlZnjH3Ops
— Ghar Ke Kalesh (@gharkekalesh) January 12, 2026
पती शांतपणे मार सहन करत राहिला
सर्वात जास्त आश्चर्य वाटणारी गोष्ट म्हणजे, महिलेच्या सतत मारत असतानाही पतीकडून कोणताही प्रतिसाद आला नाही किंवा त्याने प्रत्युत्तर दिले नाही. पत्नी सतत कानाखाली मारत होती आणि पती फक्त शांतपणे बाइक चालवत मार खात राहिला. हा व्हिडीओ इंटरनेटवर पाहताच व्हायरल झाला आणि आता सोशल मीडिया यूजर्स त्यावर मजा घेत आहेत.
नेटकऱ्यांनी दिल्या प्रतिक्रिया
हा व्हिडीओ @gharkekalesh या एक्स अकाउंटवरून शेअर करण्यात आला आहे. त्याला लाखो लोकांनी पाहिले आहे आणि अनेकांनी लाईकही केले आहेत. सोशल मीडिया यूजर्स वेगवेगळ्या प्रतिक्रिया देत आहेत. एका यूजरने लिहिले… बाइक पडली असती तर पत्नीचा पोपट झाला असता. दुसऱ्या यूजरने लिहिले, नक्की पतीने काही वाईट काम केले असणार. तर आणखी एकाने लिहिले, पती बिचारा शांतपणे मार खात राहिला.