AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

डीमार्टचा जानेवारी महिन्यात धमाका, थेट या वस्तूंवर मोठ्या सवलती, पैशांची करा बचत, ऑफरसाठी आजच..

D-Mart January Month Offer : डीमार्टमध्ये खरेदी करण्यासाठी जवळपास सर्वांनाच आवडते. विशेष म्हणजे बंपर ऑफरही डीमार्ट असतात. जानेवारी महिन्यात डीमार्टमध्ये खरेदी करण्यासाठी जात असाल तर आजच जा. अनेक वस्तूंवर मोठ्या ऑफर आहेत.

डीमार्टचा जानेवारी महिन्यात धमाका, थेट या वस्तूंवर मोठ्या सवलती, पैशांची करा बचत, ऑफरसाठी आजच..
D-Mart
| Updated on: Jan 14, 2026 | 1:59 PM
Share

अगदी कमी कालावधीमध्ये एक वेगळी ओळख भारतात डीमार्टने तयार केली. घरातील कोणतेही साहित्य खरेदी करायचे असेल तर सर्वांनाच अगोदर आठवण होते ती म्हणजे फक्त डीमार्टची. डीमार्टमध्ये किचनमधील सर्व वस्तू मिळतात. शिवाय घरातील प्रत्येक वस्तू डिमार्टमध्ये मिळते. लोक फक्त एकाच ठिकाणी सर्व वस्तू मिळतात म्हणून डीमार्टमध्ये खरेदी करिता जात नाही तर बाजारभावापेक्षा अगदी स्वस्त:मध्ये तिथे वस्तू मिळतात. शिवाय बाय 1 गेट 1 ची मोठी ऑफरही असते. उदाहरणार्थ एक किलो चहा पावडरच्या किंमतीमध्ये दोन किलो चहा पावडर मिळते. अनेक वस्तूंवर ही ऑफर असते. एखादी वस्तू बाहेर 100 रूपयांना आहे तर डीमार्टमध्ये ती 80 रूपयांना साधारणपणे मिळते. विशेष बाब म्हणजे सणासुदीच्या तोंडावर अनेक वस्तूंवर डीमार्टमध्ये मोठा डिस्काऊंट देखील मिळतो.

जानेवारी महिन्यासाठी खास ऑफर डीमार्टकडून देण्यात आली आहे. जर तुम्हीही जानेवारी महिन्यात डीमार्टमध्ये खरेदीसाठी जात आहेत तर ही मोठी संधी तुमच्याकडे आहे.  नवीन वर्षाच्या पहिल्या महिन्यात डीमार्टकडून ग्राहकांना अनेक वस्तूंवर मोठे डिस्काऊंट दिले जात आहेत. ज्यामुळे तुमच्या पैशांची मोठी बचत होईल. शेंगदाणे, तेल, तीळ, गूळ, साखर, मीठ आणि बिस्किटांवर सध्या मोठी ऑफर डिमार्टमध्ये आहे.

फक्त हेच नाही तर मिक्सर, नॉन स्टिक भांडी, ग्राइंडर यावर ऑफर आहे. किचनमध्ये लागणाऱ्या दैनंदिन वस्तूंवर 20 टक्क्यांच्या आसपास सूट आहे. शिवाय मॅगीसारख्या वस्तूंवरही सूट आहे. यासोबतच इतकी काही वस्तूंवर डीमार्टकडून मोठी सूट देण्यात आली. जर तुम्ही आता डीमार्टमध्ये साहित्य खरेदीसाठी जात असाल तर हीच योग्य वेळ असून पैशांची मोठी बचत होईल.

शनिवार आणि रविवारही डीमार्टमध्ये डिस्काऊंट बघायला मिळतात. यामुळेच कायम लक्षात ठेवा की, शनिवारी आणि रविवारी डीमार्टमध्ये मोठी गर्दी असते. डीमार्ट कंपनीचा सध्या शेअर बाजारातही जलसा बघायला मिळत आहे. डीमार्टच्या शेअरमध्ये 18 टक्के वरती गेले आहेत. डीमार्ट ही कंपनी देशभरात पैशांची मोठी उलाढाल करते. बाहेरपेक्षा वस्तू अत्यंत स्वत:मध्ये मिळत असल्याने लोक डीमार्टमधून खरेदी करण्यावर कायमच भर देतात.

पालिकेच्या मतदानाची तयारी अंतिम टप्प्यात; निवडणूक साहित्याच वाटप सुरू
पालिकेच्या मतदानाची तयारी अंतिम टप्प्यात; निवडणूक साहित्याच वाटप सुरू.
बिनविरोध निवडीवरची सुनावणी संपली, काय घडलं कोर्टात?; मोठा निर्णय काय?
बिनविरोध निवडीवरची सुनावणी संपली, काय घडलं कोर्टात?; मोठा निर्णय काय?.
संक्रातिनिमित्त नाशिकच्या गोदा घाट परिसरात पर्यटक, भाविकांची गर्दी
संक्रातिनिमित्त नाशिकच्या गोदा घाट परिसरात पर्यटक, भाविकांची गर्दी.
ठाकरे कुटुंबातला गोडवा वाढला! संक्रांतीसाठी दोन्ही कुटुंब शिवतीर्थवर
ठाकरे कुटुंबातला गोडवा वाढला! संक्रांतीसाठी दोन्ही कुटुंब शिवतीर्थवर.
अचानक येऊन तलवारीने हल्ला, उमेदवाराचा नवरा... काय घडलं?; नांदेड हादरलं
अचानक येऊन तलवारीने हल्ला, उमेदवाराचा नवरा... काय घडलं?; नांदेड हादरलं.
पाच-पाच हजार वाटले जातायत! राज ठाकरेंचा गंभीर आरोप
पाच-पाच हजार वाटले जातायत! राज ठाकरेंचा गंभीर आरोप.
पत्रकं वाटू शकत नाही, पैसे वाटू शकतात का? राज ठाकरेंचा खोचक प्रश्न
पत्रकं वाटू शकत नाही, पैसे वाटू शकतात का? राज ठाकरेंचा खोचक प्रश्न.
राज ठाकरेंच्या भेटीसाठी उद्धव ठाकरे मातोश्रीहून रवाना
राज ठाकरेंच्या भेटीसाठी उद्धव ठाकरे मातोश्रीहून रवाना.
पुण्यातील प्रभाग 38 मध्ये वस्तूंचे वाटप! वसंत मोरेंचा आरोप
पुण्यातील प्रभाग 38 मध्ये वस्तूंचे वाटप! वसंत मोरेंचा आरोप.
गोंदियात बिबट्याची दहशत की AI मुळे अफवा?
गोंदियात बिबट्याची दहशत की AI मुळे अफवा?.