AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

सुशांतची आत्महत्या होती यावर विश्वासच नाही… ज्येष्ठ अभिनेत्याचा संशय; सुशांतसिंह राजपूतच्या मृत्यू प्रकरणाची पुन्हा चर्चा

ज्येष्ठ अभिनेते शिशिर शर्मा यांना आजही विश्वास बसत नाही की सुशांत सिंह राजपूतने आत्महत्या केली. सुशांत साधा, सरळ आणि मानसिकदृष्ट्या संतुलित होता, त्यामुळे तो इतके टोकाचे पाऊल उचलेल असे त्यांना वाटत नाही.

सुशांतची आत्महत्या होती यावर विश्वासच नाही... ज्येष्ठ अभिनेत्याचा संशय; सुशांतसिंह राजपूतच्या मृत्यू प्रकरणाची पुन्हा चर्चा
Sushant Singh Rajput Image Credit source: TV9 Marathi
| Updated on: May 31, 2026 | 10:58 PM
Share

सुशांत सिंह राजपूतला जाऊन सहा वर्ष झाली आहेत. मात्र, आजही त्याचे चाहते त्याला विसरले नाहीत. कोणत्या ना कोणत्या कारणाने सुशांतसिंह राजपूतची चर्चा होतेच. ज्येष्ठ अभिनेते शिशिर शर्मा यांनाही सुशांतच्या आठवणीने राहवलं नाही. त्यांनाही गहिवरून आलं. शिशिर शर्मा यांनी सुशांतच्या आठवणी जागवल्या आहेत. सुशांतने आत्महत्या केली. तो आपल्यात नाही, यावर आजही विश्वास बसत नाही. हे मानायला मन तयार नाही, असं शिशिर शर्मा यांनी म्हटलं आहे. तसेच सुशांतची आत्महत्या होती, यावर विश्वासच बसत नाही, असंही ते म्हणाले.

एका मुलाखतीत शिशिर शर्मा यांनी सुशांतच्या आठवणींना उजाळा दिला. त्यांनी या दु:खद घटनेवर मनमोकळ्या गप्पा मारल्या. असं टोकाचं पाऊल सुशांत उचलेलं असं वाटत नाही. ती व्यक्तीच वेगळी होती, असं शिशिर यांनी म्हटलं आहे. सुशांत साधा सरळ माणूस होता. तो शांत, विचारशील आणि भावनात्मकरित्या संतुलित होता, असं त्यांनी म्हटलं आहे.

मनातून तुटलो…

शिशिर शर्मा यांनी सुशांत सिंह राजपूतच्या आठवणींना उजाळा दिल्यानंतर पुन्हा एकदा सुशांतबाबतच्या चर्चांना हवा मिळाली आहे. सुशांत गेला त्या दिवशीची आठवणीही त्यांनी सांगितली. मला 14 जून 2020 रोजी संध्याकाळी 4 वाजता बातमी कळली. सुशांत गेला यावर विश्वासच बसेना. सुशांतच्या जाण्याची बातमी मिळाली आणि मी हतबलच झालो. त्या दिवसापासून मी मनातून तुटलोय. बातमी मिळाल्यानंतर मला धक्का बसला. मला त्यावर विश्वासच बसेना, असंही त्यांनी सांगितलं.

काही तरी रहस्य…

मी माझे अश्रू रोखू शकलो नाही. स्वत:ला सांभाळणं खूप कठिण होऊन बसलं होतं. सुशांत सारखा टॅलेंटेड आणि आपल्या कामाबद्दल अत्यंत गंभीर असलेला व्यक्ती, एवढ्या दु:खद मृत्यूची शिकार कसा होऊ शकतो? या मागे काही तरी रहस्य असू शकतं, असंही त्यांनी सांगितलं.

काही तरी कारण…

काही तरी कारण असेलच, असं कोणी आत्महत्या करत नाही. ती आत्महत्या होती असं मला वाटतच नाही. इतकं टोकाचं पाऊल उचलणारा तो व्यक्ती नव्हता. तो साधासरळ होता. त्यामुळे तो आत्महत्या करेल यावर माझा विश्वासच नाही. असं करण्यासाठी खूप मोठी हिंमत असावी लागते. कठोर काळीज असावं लागतं. एक दोरी आणावी आणि आत्मह त्या करावी, असं होत नाही. त्यावेळी तुमच्या डोक्यात बरंच काही चालत असतं. तुम्ही विचार करू शकत नाही. काय परिणाम होईल हे सांगता येत नाही. एवढा टोकाचा निर्णय घेण्यासाठी एक अशी परिस्थिती निर्माण होते, असं ते म्हणाले.

Follow Us
अखेर व्हिडीओ समोर आलाच! पुण्यात भाजपसोबतच्या बैठकीत राष्ट्रवादी...
अखेर व्हिडीओ समोर आलाच! पुण्यात भाजपसोबतच्या बैठकीत राष्ट्रवादी नेत्याकडून तीव्र खदखद व्यक्त
दिल्लीत वातावरण तापलं! अभिजीत दीपकेंना पुन्हा ताब्यात घेतलं; दिल्ली...
दिल्लीत वातावरण तापलं! अभिजीत दीपकेंना पुन्हा ताब्यात घेतलं; दिल्ली पोलिसांनी CJP चं आंदोलन सुरु होण्याआधीच...
ठाकरे गटाला पुन्हा मोठा धक्का! एकच कारण अन् बड्या नेत्यानं सोडला पक्ष,
ठाकरे गटाला पुन्हा मोठा धक्का! एकच कारण अन् बड्या नेत्यानं सोडला पक्ष, उपमुख्यमंत्री शिंदेंच्या उपस्थितीत पक्ष प्रवेश
प्रभादेवीच्या भवानीमाता मंदिरात नवरात्रोत्सवाचा उत्साह; 58 वर्षांची...
प्रभादेवीच्या भवानीमाता मंदिरात नवरात्रोत्सवाचा उत्साह; 58 वर्षांची परंपरा आजही कायम!
गोपीचंद पडळकर यांना मोठा दिलासा, मध्यवर्ती बँकेचा निवडणूक अर्ज वैध...
गोपीचंद पडळकर यांना मोठा दिलासा, मध्यवर्ती बँकेचा निवडणूक अर्ज वैध, न्यायालयाचा मोठा निर्णय
अभिजीत दीपकेंना नोटीस; दिल्लीतील करोल बाग परिसरात आर्ध्या तासापासून...
अभिजीत दीपकेंना नोटीस; दिल्लीतील करोल बाग परिसरात आर्ध्या तासापासून...
मोठी खळबळ! अभिजीत दीपके थांबलेल्या ठिकाणी दिल्ली पोलीस दाखल; दिल्लीत..
मोठी खळबळ! अभिजीत दीपके थांबलेल्या ठिकाणी दिल्ली पोलीस दाखल; दिल्लीत तातडीने...
महायुतीत मिठाचा खडा कुणामुळे? संजय शिरसाटांनी थेट बड्या नेत्याकडे...
महायुतीत मिठाचा खडा कुणामुळे? संजय शिरसाटांनी थेट बड्या नेत्याकडे इशारा, नेमकं कारण काय?
दिल्लीत TV9 फेस्टिव्हल ऑफ इंडियाचा भव्य शुभारंभ; दुर्गापूजा, संगीत अन्
TV9 Festival of India 2026 : दिल्लीत TV9 फेस्टिव्हल ऑफ इंडियाचा भव्य शुभारंभ; दुर्गापूजा, संगीत अन् भारतीय संस्कृतीचा अनोखा संगम
टेस्लाचा आविष्कार! हवेत झेप घेणाऱ्या कारची पहिली झलक समोर, जगभरात...
Tesla Car Video: टेस्लाचा आविष्कार! हवेत झेप घेणाऱ्या कारची पहिली झलक समोर, जगभरात होतेय चर्चा