AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

ज्याची भीती तेच घडलं! या करणामुळे पुन्हा 80 लाख लाडक्या बहिणी अपात्र, तुमचंही नाव त्या यादीत नाही ना?

ज्याची भीती तेच घडलं! या करणामुळे पुन्हा 80 लाख लाडक्या बहिणी अपात्र, तुमचंही नाव त्या यादीत नाही ना?

| Updated on: May 31, 2026 | 12:38 PM
Share

लाडक्या बहिणींसाठी अत्यंत वाईट बातमी आहे. ज्या ज्या महिलांनी सरकारने ठरवून दिलेल्या वेळेत ई केवायसी केली नाही. त्या सर्व महिलांना महिन्याचे 1500 रुपये मिळणार नाही. या महिलांना या योजनेचा कोणताही लाभ मिळणार नाहीये. सरकारने तसा मोठा निर्णय घेतला आहे.

लाडक्या बहिणींसाठी अत्यंत वाईट बातमी आहे. ज्या ज्या महिलांनी सरकारने ठरवून दिलेल्या वेळेत ई केवायसी केली नाही. त्या सर्व महिलांना महिन्याचे 1500 रुपये मिळणार नाही. या महिलांना या योजनेचा कोणताही लाभ मिळणार नाहीये. सरकारने तसा मोठा निर्णय घेतला आहे. सरकारच्या या निर्णयामुळे राज्यातील 80 लाख लाडक्या बहिणींना मोठा फटका बसणार आहे. या महिला अपात्र ठरल्याने त्यांना लाडकी बहीण योजनेपासून वंचित राहावं लागणार आहे.

त्यानंतर सरकारने योजनेत अधिक पारदर्शकता आणण्यासाठी आणि गरजू महिलांना मदत मिळण्यासाठी योजनेतील महिला ई केवायसी करण्याच्या सूचना केल्या होत्या. या ई केवायसीसाठी महिलांना वेळोवेळी मुदतवाढही दिली होती. आता सरकारने 31 मार्चपर्यंतची शेवटची मुदत दिली होती. पण तरीही महिलांनी ईकेवायसी केली नाही. तसेच सरकारनेही मुदतवाढ देण्यास नकार दिला. त्यामुळे लाडकी बहीण योजनेतून 80 लाख महिलांना वगळण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे. म्हणजे या योजनेचा लाभ घेण्यासाठी 80 लाख महिलांना अपात्र ठरवण्यात आलं असून त्यांना योजनेचा 1500 रुपयांचा आर्थिक लाभ मिळणार नाही.

लाडकी बहीण योजनेच्या सुरुवातीला महिला लाभार्थ्यांची संख्या 2.46 कोटी इतकी होती. आता छाननी केल्यानंतर महिला लाभार्थ्यांची संख्या 1.66 कोटी इतकी झाली आहे. यातून केवायसी न केलेल्या महिला, सधन महिला, नोकरदार महिला आणि महिलांच्या नावाने लाभ घेणाऱ्या पुरुषांना वगळण्यात आलं आहे.

Published on: May 31, 2026 12:38 PM

Follow Us
Abhijeet Dipke : सोनम वांगचूक यांचं उपोषण मोडून काढल्यानंतर अभिजीत दीपके यांच्या दोन मोठ्या घोषणा.

Abhijeet Dipke : सोनम वांगचूक यांचं उपोषण मोडून काढल्यानंतर अभिजीत दीपके यांच्या दोन मोठ्या घोषणा

Aamir Khan : सलमान नंतर आता आमिर खान बिश्नोई गँगच्या रडारवर? मिळाली मोठी धमकी; कारण धक्कादायक.

Aamir Khan : सलमान नंतर आता आमिर खान बिश्नोई गँगच्या रडारवर? मिळाली मोठी धमकी; कारण धक्कादायक

Modi Govt : डिलिमिटेशन विधेयक मंजुरीसाठी दोन तृतीयांश बहुमताची गरज असताना भाजपसाठी एक Good News.

Modi Govt : डिलिमिटेशन विधेयक मंजुरीसाठी दोन तृतीयांश बहुमताची गरज असताना भाजपसाठी एक Good News

Sanjay Raut : आजच्या रामरक्षा आंदोलनावरून लक्ष हटवण्यासाठी वांगचुक यांना हटवलं – संजय राऊत कडाडले.

Sanjay Raut : आजच्या रामरक्षा आंदोलनावरून लक्ष हटवण्यासाठी वांगचुक यांना हटवलं – संजय राऊत कडाडले

चंद्रशेखर बावनकुळे मुख्यमंत्री फडणवीसांच्या भेटीला, ठाकरेंच्या आंदोलनापूर्वी नागपूरमध्ये मोठी घडामोड, कोणत्या विषयावर चर्चा?.

चंद्रशेखर बावनकुळे मुख्यमंत्री फडणवीसांच्या भेटीला, ठाकरेंच्या आंदोलनापूर्वी नागपूरमध्ये मोठी घडामोड, कोणत्या विषयावर चर्चा?

सोनम वांगचूक यांना अटक केली तरी आंदोलन सुरू राहणार; शरद पवार थेट बोलले.

सोनम वांगचूक यांना अटक केली तरी आंदोलन सुरू राहणार; शरद पवार थेट बोलले