AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

तशी घटना घडलीच नाही, पिस्तुल लावून धमकी… हे फक्त कुंभाड; धनंजय देशमुख प्रकरणाच्या तपासात मोठी माहिती उघड

धनंजय देशमुख यांच्यावर समाधान खिंडकर यानेच पिस्तुल लावून आपल्याला धमकावल्याची तक्रार दिली होती. मात्र, या प्रकरणाचा तपास केला असताना पोलिसांना या प्रकरणात दोन्ही बाजूंनी खोटी तक्रार दिल्याचे निष्पन्न झाले आहे.

तशी घटना घडलीच नाही, पिस्तुल लावून धमकी... हे फक्त कुंभाड; धनंजय देशमुख प्रकरणाच्या तपासात मोठी माहिती उघड
Dhananjay Deshmukh
| Updated on: May 31, 2026 | 10:50 PM
Share

Dhananjay Deshmukh : मस्साजोग येथील सरपंच दिवंगत संतोष देशमुख यांचे बंधू धनंजय देशमुख यांच्यावर पिस्तूल लावून जीवे मारण्याची धमकी दिल्याचा खळबळजनक आरोप झाला. धनंजय देशमुख यांच्याविरोधात समाधान खिंडकर यांनी ही फिर्याद दिली आहे. या प्रकरणात आता पोलिसांच्या प्राथमिक तपासात सत्य भलतेच असल्याचे उघडकीस आले आहे.

बीडच्या ग्रामीण पोलीस स्टेशन हद्दीतील एका हॉटेलवर धनंजय देशमुख यांनी आपल्याला पिस्तूल लावून जीवे मारण्याची धमकी दिली, असा खळबळजनक आरोप समाधान खिंडकर यांनी केला होता. धनंजय देशमुख हे बीड येथील मस्साजोगचे दिवंगत सरपंच संतोष देशमुख यांचे बंधू आहेत. संतोष देशमुख यांची निर्घृण हत्या झाल्याने हे प्रकरण देशभर गाजले होते. या हत्येच्या प्रकरणात वाल्मिक कराड आणि त्याची टोळी सध्या तुरुंगात आहे. धनंजय देशमुख यांच्याविरोधात समाधान खिंडकर याच्या दाखल फिर्यादीनुसार आता धनंजय देशमुख यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता.

बीड ग्रामीण पोलीस ठाण्यात समाधान खिंडकर याने तक्रार देत धनंजय देशमुख यांनी पिस्तूल लावून आपल्याला धमकी दिल्याचे म्हटले होते. यावरून बीड ग्रामीण पोलीस ठाण्यात धनंजय देशमुख यांच्या विरुद्ध हत्येचा प्रयत्न केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला होता. मात्र पोलिसांनी सकाळपासून कसून तपास केला. घटनास्थळावरील CCTV फुटेज आणि साक्षीदारांच्या जबाबांची तपासणी केली असता, अशी कोणतीही घटना घडली नसल्याचे निष्पन्न झाले आहे.

खोट्या तक्रारी करणाऱ्यांवर कठोर  कारवाई

यानंतर धनंजय देशमुख यांनी देखील समाधान खिंडकर यानेच उलट धमकावल्याची तक्रार दिली होती. दोन्ही बाजूंच्या फिर्यादींनी जाणूनबुजून पोलिसांत खोटी तक्रार दिल्याचे तपासात स्पष्ट झाले आहे. याप्रकरणी पोलिसांकडून न्यायालयात सविस्तर अहवाल सादर केला जाणार असून, खोट्या तक्रारी करणाऱ्यांवर कठोर कायदेशीर कारवाई केली जाईल असा इशारा पोलिसांनी दिला आहे. दरम्यान आपण पोलिसांना रात्रीच शहानिशा करून पुढील कारवाई करा असे सांगितले होते. मात्र कुठली एवढी गडबड झाली होती माहित नाही. त्यांनी पहाटेच हा गुन्हा दाखल करून घेतला, मात्र आता तपासात असं काही घडलं नाही हे सर्व काही खोटं आहे हे निष्पन्न झालं आहे असं धनंजय देशमुख यांनी बोलताना सांगितले.

Follow Us
अपघाताच्या चौकशीबाबत सरकारकडून माहिती नाही; सुप्रिया सुळे यांचा संताप
अपघाताच्या चौकशीबाबत सरकारकडून माहिती नाही; सुप्रिया सुळे यांचा संताप
लक्ष्मण हाके यांचा सरकारला इशारा; ओबीसी काय करेल, हे आम्ही दाखवून देऊ
लक्ष्मण हाके यांचा सरकारला इशारा; ओबीसी काय करेल, हे आम्ही दाखवून देऊ...
शिवसेना पक्षचिन्हावर उद्या सुनावणी; एकनाथ शिंदे दिल्लीत दाखल
शिवसेना चिन्हाच्या सुनावणीपूर्वी एकनाथ शिंदे दिल्लीत; म्हणाले, धनुष्यबाण गोठवणे दुर्दैवी
अनावश्यक सोने खरेदी आणि परदेशी प्रवास टाळा, पंतप्रधान मोदींचे आवाहन
अनावश्यक सोने खरेदी आणि परदेशी प्रवास टाळा, पंतप्रधान मोदींचे आवाहन
नवी मुंबईत एक्सपायरी डेट बदलून खाद्यपदार्थांची विक्री
नवी मुंबईत एक्सपायरी डेट बदलून खाद्यपदार्थांची विक्री; एफडीए आणि गुन्हे शाखेची मोठी कारवाई
महाराष्ट्रात पावसाचा ब्रेक! नगरमध्ये 80%, बीडमध्ये 86% तूट
महाराष्ट्रात पावसाचा ब्रेक! नगरमध्ये 80%, बीडमध्ये 86% तूट; सप्टेंबरमध्येही कमी पावसाचा अंदाज
हल्ला केला, काचेच्या बाटल्या फेकल्या, चेनही खेचल्या! पोलीस कुठे होते?
Krushnaraj Mahadik On MNS | हल्ला केला, काचेच्या बाटल्या फेकल्या, चेनही खेचल्या! पोलीस कुठे होते? म्हणत कृष्णराज महाडिक आक्रमक
मनोज जरांगेंच्या भेटीसाठी सरकारचं शिष्टमंडळ सज्ज; तोडग्यासाठी...
Manoj Jarange | मनोज जरांगेंच्या भेटीसाठी सरकारचं शिष्टमंडळ सज्ज; तोडग्यासाठी हालचालींना वेग!
आम्ही 100% उद्धव ठाकरेंसोबतच!; आमदार फुटीच्या चर्चेला पूर्णविराम
Praveen Swami | आम्ही 100% उद्धव ठाकरेंसोबतच!; आमदार फुटीच्या चर्चेला पूर्णविराम, प्रवीण स्वामी थेट म्हणाले...
तुकाराम मुंढे यांच्या निर्णयाला सरकारचा ब्रेक; सुट्टे तेल विक्रीसाठी..
तुकाराम मुंढे यांच्या निर्णयाला सरकारचा ब्रेक; सुट्टे तेल विक्रीसाठी व्यापाऱ्यांना आणखी 1 वर्षाची दिली मुभा