Viral Video: “अरे असा का चालतोय, चंद्रावर आहेस का?”, असं का म्हणतात ते हा व्हिडीओ बघून कळेल

| Updated on: Jun 10, 2022 | 12:17 PM

एका अकाऊंटने एक व्हिडिओ पोस्ट केला आहे, ज्यात अनेक अंतराळवीर आपल्या स्पेस सूटमध्ये चंद्रावर चालत आहेत आणि बऱ्याच वेळा पडत देखील आहेत. ते चालण्यासाठी स्ट्रगल करतायत हे दिसून येतंय.

Viral Video: अरे असा का चालतोय, चंद्रावर आहेस का?, असं का म्हणतात ते हा व्हिडीओ बघून कळेल
ISS
Follow us on

शेवटचे चंद्रावर लँडिंग 1972 मध्ये झाले होते. 12 दिवसांच्या अपोलो 17 मोहिमेत (Apollo 17 Mission) अंतराळवीरांनी अनेक नमुने आणले होते. चंद्राचा बराचसा पृष्ठभागही शोधून काढला त्यांनी शोधून काढला होता. सोशल मीडियावर आता एक व्हिडिओ व्हायरल होत आहे, हा व्हिडीओ अंतराळवीरांचा (Astronauts)असल्याचा दावा केला जातोय. ज्यात चंद्रावर पाऊल ठेवताना अंतराळवीरांचे (Moon Walk) पाय कसे हादरले होते हे दिसत असल्याचा दावा केला जातोय. हा ब्लुपर व्हिडिओ पाहिल्यानंतर लोकांकडून विविध प्रकारच्या प्रतिक्रिया येत आहेत. @konstructivizm नावाच्या एका अकाऊंटने एक व्हिडिओ पोस्ट केला आहे, ज्यात अनेक अंतराळवीर आपल्या स्पेस सूटमध्ये चंद्रावर चालत आहेत आणि बऱ्याच वेळा पडत देखील आहेत. ते चालण्यासाठी स्ट्रगल करतायत हे दिसून येतंय.

नासाचा ब्लूपर्स व्हिडिओ

या व्हिडिओला कॅप्शन देण्यात आलंय कि, “नासाचा ब्लूपर्स व्हिडिओ ज्यामध्ये चंद्रावर चालताना अनेक अंतराळवीर खाली पडत आहेत.” हा व्हिडिओ ट्विटरवर 3,50,000 हून अधिक वेळा पाहिला गेला आहे कारण हा व्हिडिओ अनेक सोशल मीडिया वापरकर्त्यांनी शेअर केला आहे आणि लोकं त्यावर प्रतिक्रिया देत आहे. मात्र, काही युझर्सनी हा व्हिडिओ पाहिल्यानंतर त्यांची खिल्लीही उडवली. काहींनी तर दिवंगत गायक मायकल जॅक्सनच्या प्रसिद्ध डान्स स्टेप ‘मूनवॉक’ची तुलना केलीये. एका युझरने लिहिले, “जेव्हा तुम्हाला मूनवॉक कसं करावं हे माहित नसतं.” आणखी एका यूजरने अंतराळवीरांच्या स्पेस सूटचा संदर्भ देत लिहिले, “चंद्रावर चालताना माझा सूट फाटू नये, असा विचार अंतराळवीर करत असावेत.”

हे सुद्धा वाचा

पाहा व्हिडिओ –

असं काहीसं आनंद महिंद्रांनी शेअर केलं होतं

उद्योगपती आनंद महिंद्रा यांनी काही दिवसांपूर्वी असाच एक अंतराळवीरांचा व्हिडीओ एक व्हिडिओ शेअर केला होता, जो व्हायरल झाला होता. त्यात आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकावर (आयएसएस) काम करताना अंतराळात एक अंतराळवीर उडताना दिसत होता. आनंद महिंद्रांनी लिहिले की, “हे पाहून मी खूप मंत्रमुग्ध झालो. अक्षरश: एखाद्या जगाबाहेरच्या बॅलेटसारखा. या अंतराळवीराचे काम #MondayMotivation असल्यामुळे माझे कामही तितकेच महत्त्वाचे आणि तितकेच आकर्षक होणार आहे, असा विश्वास ठेवून मला माझ्या आठवड्याची सुरुवात करायची आहे.”

वंडर ऑफ सायन्सच्या म्हणण्यानुसार, आयएसएस (ISS) च्या बाहेर असलेल्या निकेल-हायड्रोजन बॅटरीच्या जागी नवीन लिथियम-आयन बॅटरी ठेवण्यासाठी 21 जुलै 2020 रोजी स्पेसवॉक दरम्यान हा व्हिडिओ कैद करण्यात आला होता.