
शिकार करणे हा प्रत्येक प्राण्याचा स्वभाव धर्म मानला जातो. जंगलात तर शिकार हमखास केली जाते. त्यामुळे प्रत्येक प्राण्याला दुसऱ्या प्राण्यापासून स्वतःचा बचाव करण्यासाठी सावध राहावे लागते. जंगलातील प्राण्याप्राण्यांमधील दुश्मनीचे (Enmity between forest animals) बरेच व्हिडिओज सोशल मीडियामध्ये व्हायरल होत असतात. सध्या असाच एक व्हिडिओ ट्विटर, फेसबुक अशा विविध माध्यमांमध्ये मोठ्या प्रमाणावर शेअर (Video share on social media) केला जात आहे. हा व्हिडिओ एका म्हशीने सिंहांच्या तावडीतून स्वतःची सुटका (buffalo escaped from the lions) कशी करून घेतली? त्याची प्रचिती आणून देणार आहे. अवघ्या 30 सेकंदामध्ये सगळा खेळ बदलला आणि म्हशीने स्वतःची सुटका करून घेतली.
कल्पना करा, तुम्ही जंगलात गेला आहात आणि तुमच्यासमोर वाघ किंवा सिंह उभा आहे. ते दोन्ही प्राणी फार अंतरावर असूनही आपली नक्कीच भीतीने कारण उडणार. साक्षात मृत्यूच आपल्यासमोर येऊन ठेपला आहे अशी भीती मनात अस्वस्थता निर्माण करू शकते.
पण सोशल मीडियात व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये तर म्हशीने चक्क मृत्यूच्या जबड्यातूनच सुटका करून घेतली आणि सर्वांना आश्चर्याचा मोठा धक्का दिला आहे. झाले असे की पाच सिंहांनी म्हशीला जमिनीवर खाली दाबून ठेवले.
आता सावज आपल्या तावडीत सापडले म्हणून पाचही सिंह फार खुशीत होते. पण इतक्यातच दोन सिंहिणींमध्ये झुंज सुरू झाली. त्यावरून म्हशीला जमिनीवर दाबणाऱ्या पाच सिंहाने आपापसात झगडण्यास सुरुवात केली. नेमकी हीच संधी साधत म्हशीने तिथून पळ काढला.
जणू मृत्यूच्या जबड्यातून तिने स्वतःची शिताफिने सुटका करून घेतली होती. तिच्या करामतीचा व्हिडिओ पाहताना एकीकडे आश्चर्याचा धक्का तर दुसरीकडे म्हशीला उत्स्फूर्त दाद देण्याचा मोह कुणालाही आवरे असा झाला आहे.
म्हशीने सिंहांच्या तावडीतून सुटका करून घेतल्याचा व्हिडिओ सोशल मीडियामध्ये प्रचंड लोकप्रिय झाला आहे. एकट्या ट्विटरवर हा व्हिडिओ 13 लाखांनी अधिक लोकांनी पाहिला आहे. हा व्हिडिओ ‘ओ टेरिफायिंग’ नावाच्या ट्विटर हँडलवरून शेअर करण्यात आला आहे.
अवघ्या दोन दिवसांमध्ये 13 लाखांहून अधिक व्हिडिओ पाहिला तर अडतीस हजारांहून लाईक्स आणि साडेचार हजार रिट्विट्स करण्यात आले आहेत. यावरून व्हिडिओची लोकप्रियता लक्षात येत आहे. अनेक युजर्सनी म्हशीच्या चलाखीला दाद देणाऱ्या कमेंट्स नोंदवल्या आहेत.