AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Viral: मुलाने गिटारवर वाजवले शिवतांडव, Video पाहून अंगावर येईल काटा!

Viral Video: सोशल मीडियावर कधी काय व्हायरल होईल याचा नेम नसतो. पण कधी कधी सोशल मीडियावर व्हायरल होणाऱ्या व्हिडीओंमुळे अंगावर काटा येतो. हा व्हिडीओ तुम्ही नक्की पाहा...

Viral: मुलाने गिटारवर वाजवले शिवतांडव, Video पाहून अंगावर येईल काटा!
shiv tandav on guitarImage Credit source: Tv9 Network
| Updated on: Nov 13, 2025 | 4:58 PM
Share

सोशल मीडियावर दररोज वेगवेगळ्या गोष्टी व्हायरल असतात. त्यामध्ये काही व्हिडीओ हे खरच चांगले असतात तर काही व्हिडीओ हे काहीही असतात. पण सध्या ज्या व्हिडीओची चर्चा रंगली आहे तो व्हिडीओ सर्वांचे लक्ष वेधून घेताना दिसत आहे. तुम्ही आजवर शिवतांडव स्त्रोताचे अनेक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होताना पाहिले असतील. पण कधी कोणी हे स्त्रोत्र गिटावर वाजवण्याचा प्रयत्न केला नाही. सोशल मीडियावर व्हायरल होणाऱ्या व्हिडीओमध्ये एक तरुण गिटारवर शिवतांडव स्तोत्र वाजवताना दिसत आहे. हा व्हिडीओ पाहून अनेकांनी त्याचे कौतुक केले आहे.

सोशल मीडियावर व्हायरल होणाऱ्या या व्हिडीओमध्ये एक टॅलेंटेड तरुण संगीतकार गिटारवर शिव तांडव स्तोत्रची मंत्रमुग्ध करणारी धून वाजवत आहे. हा व्हिडीओ सोशल मीडिया युजर्सना भोवला आहे. गिटारवादकाचे हे सादरीकरण इंटरनेटवर इतक्या वेगाने व्हायरल झाले आहे की आतापर्यंत ती २० लाखांहून अधिक वेळा पाहिला गेला आहे. हा व्हिडीओ आतापर्यंत 1 लाख 69 हजारांहून अधिक लोकांनी लाईक केला आहे. ज्याने हा व्हिडीओ पाहिला त्याच्या अंगावर अक्षरश: काटा आला आहे.

गिटारवादकाचा मधुर व्हिडीओ

व्हिडीओमध्ये गिटारवादक उघड्या जागेवर बसला असून धून वाजताना दिसत आहे. त्यामुळे त्याचे सादरीकरण आणखी मनमोहक वाटत आहे. संगीत आणि शांत वातावरणाचा हा मेळ नेटिझन्सना एक वेगळीच शांती देणारा अनुभव देत आहे. हा शानदार व्हिडीओ इंस्टाग्रामवर @saheel.music या खात्यावरून शेअर करण्यात आला आहे. साहिल नावाच्या युजरने व्हिडीओ शेअर करताना कॅप्शनमध्ये लिहिले आहे की, गिटारवर शिव तांडव स्तोत्रम्. हर-हर महादेव.

होत आहे जोरदार प्रशंसा

सोशल मीडियावर व्हायरल होणाऱ्या या व्हिडीओवर नेटिझन्स सतत कमेंट करून तरुणाची प्रचंड तारीफ करताना दिसत आहेत. एका युजरने गिटारवादकाच्या समर्पणाला पाहून लिहिले, “या पातळीवर येण्यासाठी वेडेपणा लागतो.” यावर गिटारवादक साहिलने उत्तर दिले, “मी वेडाच आहे पाजी.” दुसऱ्या युजरने कौशल्याची प्रशंसा करत म्हटले, “तुमच्या टॅलेंटसाठी माझ्याकडे शब्द नाहीत.” एका दुसऱ्या युजरने कमेंट केली की, “परफॉर्मन्समध्ये आग लावणे म्हणजे हे.” आणखी एका युजरने लिहिले, “अंगावर काटा आला भाई.” याशिवाय कमेंट बॉक्स ‘हर-हर महादेव’ च्या जयघोषांनी गजबजला आहे. एकंदरीत हा व्हिडीओ लोकांच्या धार्मिक आणि भावनिकतेशी जोडला गेल्याचे दिसत आहे.

उद्यापासून हिवाळी अधिवेशन; सरकारचा चहापानाच्या कार्यक्रमाला सुरुवात
उद्यापासून हिवाळी अधिवेशन; सरकारचा चहापानाच्या कार्यक्रमाला सुरुवात.
महिलांच्या फसवणुकींची आयोग दखल घेत नाही; अंधारेंचा गंभीर आरोप
महिलांच्या फसवणुकींची आयोग दखल घेत नाही; अंधारेंचा गंभीर आरोप.
इंडिगो अजूनही विस्कळीत, आजही अनेक विमानं रद्द
इंडिगो अजूनही विस्कळीत, आजही अनेक विमानं रद्द.
हिवाळी अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर नागपूरात नेत्यांची बॅनरबाजी
हिवाळी अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर नागपूरात नेत्यांची बॅनरबाजी.
विरोधी पक्षनेतेपदासाठी संख्याबळ आवश्यक; शंभूराज देसाईंचा खुलासा
विरोधी पक्षनेतेपदासाठी संख्याबळ आवश्यक; शंभूराज देसाईंचा खुलासा.
मुख्यमंत्र्यांनी शब्द दिलाय म्हणून..; जरांगेंची मराठा आरक्षणावर भूमिका
मुख्यमंत्र्यांनी शब्द दिलाय म्हणून..; जरांगेंची मराठा आरक्षणावर भूमिका.
विरोधी पक्षनेत्यांना बंगला नाही! काँग्रेसचा सरकारवर हल्ला
विरोधी पक्षनेत्यांना बंगला नाही! काँग्रेसचा सरकारवर हल्ला.
कॅसेट गुळगुळीत झाली! प्रवीण दरेकर यांचा विरोधी पक्षावर हल्ला
कॅसेट गुळगुळीत झाली! प्रवीण दरेकर यांचा विरोधी पक्षावर हल्ला.
लाडकी बहीण योजनेमुळे सरकार कर्जबाजारी नाही! भास्कर जाधवांचं मोठं विधान
लाडकी बहीण योजनेमुळे सरकार कर्जबाजारी नाही! भास्कर जाधवांचं मोठं विधान.
Move On ... स्मृती मानधनाचं लग्न अखेर मोडलं! म्हणाली, ही वेळ...
Move On ... स्मृती मानधनाचं लग्न अखेर मोडलं! म्हणाली, ही वेळ....