Video : बघावं ते अजब! आधी उन्हात ऑम्लेट, आता डोसा, लोकांचं नेमकं चाललंय काय?, बघा व्हीडिओ…

टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम

| Edited By: |

Updated on: Jun 05, 2022 | 3:33 PM

सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. यात यात चक्क गाडीवर डोसा बनवला जातोय.हा व्हीडिओ खूप चर्चेत आहे.

Video : बघावं ते अजब! आधी उन्हात ऑम्लेट, आता डोसा, लोकांचं नेमकं चाललंय काय?, बघा व्हीडिओ...

मुंबई : सोशल मीडियावर (social media) विविध व्हीडिओ व्हायरल होत असतात. आताही असाच एक व्हीडिओ व्हायरल होत आहे. यात चक्क गाडीवर डोसा बनवला जातोय.हा व्हीडिओ खूप चर्चेत आहे. या व्हीडिओमध्ये एक व्यक्ती स्कूटीच्या सीटवर डोसा बनवताना दिसत आहे. हे पाहून अनेकांना आश्चर्य वाटतंय. अनेकांनी कमेंट करत याविषयीची आपली मतं व्यक्त केली आहेत. याआधी उन्हात चहा बनवण्याची तसंच उन्हात ऑम्लेट बनवण्याची सोशल मीडियावर चर्चा (viral video) झाली. आता हा डोश्याचा व्हीडिओ व्हायरल होत आहे.

व्हायरल व्हीडिओ

सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. यात यात चक्क गाडीवर डोसा बनवला जातोय.हा व्हीडिओ खूप चर्चेत आहे. या व्हीडिओमध्ये एक व्यक्ती स्कूटीच्या सीटवर डोसा बनवताना दिसत आहे. हे पाहून अनेकांना आश्चर्य वाटतंय. अनेकांनी कमेंट करत याविषयीची आपली मतं व्यक्त केली आहेत. सर्वात आश्चर्याची गोष्ट म्हणजे त्या व्यक्तीने स्कूटीच्या सीटवर हा डोसा बनवलाय. उन्हाच्या झळांमुळे हा डोसा तयार होतो. एक स्कूटी उन्हात उभी असल्याचे दिसते. तिथं एक व्यक्ती स्कूटीच्या सीटवर डोश्याचं पीठ पसरवतो.अन् पुढच्या काही वेळात डोसा तयार होतो.

View this post on Instagram

A post shared by Bharadwaj food blogger| Hyderabad (@streetfoodofbhagyanagar)

हा व्हीडिओ streetfoodofbhagyanagar या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून शेअर करण्यात आला आहे. या व्हीडिओला लाखो लोकांनी पाहिलं आहे तर सहा लाखांहून अधिकांनी लाईक केलंय.

असाच एक व्हीडिओ काही दिवसांआधी सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. समोर आला आहे. यात उन्हात चक्क अंड्याचं ऑम्लेट बनवण्यात आलं आहे. हा व्हीडिओ सध्या खूप व्हायरल होत आहे. यात उन्हात तव्यामध्ये अवघ्या काही क्षणात अंड बनवलेलं दिसत आहे. हा व्हीडिओ दिल्लीचा आहे. दिल्लीच्या तळपत्या उन्हात एक माणूस आपल्या घराच्या गच्चीवर उन्हाच्या दाहकतेवर ऑम्लेट बनवत आहे. त्या व्यक्तीने गॅसवर नाही तर उन्हात ऑम्लेट बनवले हे पाहून नेटकऱ्यांना मात्र चांगलाच धक्का बसलाय. हा व्हीडीओ cadel_tales नावाच्या इन्स्टाग्राम अकाउंटवर शेअर करण्यात आला आहे. या व्हीडीओला आतापर्यंत दीड कोटीहून अधिक व्ह्यूज मिळाले आहेत. तर आठ लाखांहून अधिक लोकांनी लाइक केलं आहे.

Non Stop LIVE Update

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI