Video : भर रस्त्यात पोलीस हवालदारानं हात उगारला! चूक डिलिव्हरी बॉयची की पोलिसाची? तुम्हीच सांगा

Swiggy Delivery boy beaten : ज्याला मारहाण करण्यात आली, त्या तरुणाचं नाव मोहनसुंदरम आहे. 38 वर्ष वय असलेला मोहनसुंदरम हा गेल्या दोन वर्षांपासून स्विगीचा डिलिव्हरी पार्टनर म्हणून काम करतोय.

Video : भर रस्त्यात पोलीस हवालदारानं हात उगारला! चूक डिलिव्हरी बॉयची की पोलिसाची? तुम्हीच सांगा
वाहतूक पोलिसाची दादागिरी?Image Credit source: TV9 Marathi
Follow us
| Updated on: Jun 05, 2022 | 2:07 PM

पोलीस हवालदारानं (Police Constable) एका दुचाकीस्वाराच्या कानशिलात लगावली. त्यानंतर तो दुचाकीस्वाराचा मोबाईल हिसकावून ऐटीत चालत गेला. ही संपूर्ण घटना मोबाईल कॅमेऱ्यात (Mobile Viral Video) कैद झाली आहे. या घटनेचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियात व्हायरल (Social Media Viral) झाला आहे. एका फुड डिलिव्हरी बॉयला वाहतूक पोलीस हवालदारानं मारहाण केली असल्याचं या व्हिडीओमध्ये दिसून आलंय. या घटनेनंतर नेमकी चूक कुणाची? फुड डिलिव्हरी बॉयला मारहाण करणाऱ्या पोलिसाची? फुड डिलिव्हरी बॉयने असं काय केलं, की त्याला मारहाण करण्यात आली? असाही प्रश्न उपस्थित करण्यात येतोय. 3 जून रोज घडलेली ही घटना सध्या सोशल मीडियात व्हायरल झाली आहे. या घटनेवरुन चर्चांना उधाण आलंय.

ही घडना तामिळनाडूमध्ये घडली होती. शुक्रवारी 3 जून रोजी घडलेल्या या घटनेचा व्हिडीओही समोर आलाय. वुई लव कोवई या ट्वीटर अकाऊंटवरुन या घटनेचा व्हिडीओ शेअर करण्यात आलाय. तामिळनाडूच्या अविनाशी रोडवरील ट्रॅफिक जंक्शनवर ही घटना घडली.

हे सुद्धा वाचा

पाहा व्हिडीओ :

फुड डिलिव्हरी बॉयला मारहाण करणाऱ्या या वाहतूक पोलीस हवालदाराचं नाव सतिश आहे. तो दमदाटी करताना व्हिडीओमध्ये दिसून आलाय. त्यानंतर त्यानं फुड डिलिव्हरी बॉयच्या कानाखाली लगावली. या घटनेचा व्हिडीओ समोर आल्यानंतर अखेर सतीश यांच्यावर वरीष्ठांनी कारवाईदेखील केली आहे. त्यांची बदली करण्यात आली आहे.

का केली मारहाण?

ज्याला मारहाण करण्यात आली, त्या तरुणाचं नाव मोहनसुंदरम आहे. 38 वर्ष वय असलेला मोहनसुंदरम हा गेल्या दोन वर्षांपासून स्विगीचा डिलिव्हरी पार्टनर म्हणून काम करतोय. शुक्रवारी संध्याकाळी एका सिग्नलजवळ असताना एका स्कूल बस चालकाला त्यानं भरधाव गाडी चालवल्याचा जाब विचारला होता.

स्कूल बसचालक भरधाव वेगान गाडी चालवत होता. काही गाड्यांना तो धडक देता देता थोडक्यात वाचला होता. त्यामुळे मोहनसु्ंदरम या तरुणानं स्कूल बस चालकाला जाब विचारला होता. यामुळे काही काळ वाहतुकीची कोंडी झाली होती. दरम्यान, यानंतर सतिश नावाच्या वाहतूक पोलीस हवालदाराने स्कूल डिलिव्हरी बॉयलाच दमदाटी केली. त्याला शिविगाळ करत कानशिलातही लगावण्यात आली.

ही सगळी घटना एकानं मोबाईल कॅमेऱ्यात कैद केली होती. ही घटना व्हायरल झाल्यानंतर सतिश यांची कंट्रोल रुमला बदली करण्यात आली आहे. या मारहाणीवरुन सतीश यांची पोलीस आयुक्तांकडे तक्रार करण्यात आली होती. दरम्यान, फुड डिलिव्हरी बॉयला केलेली मारहाण कितपत योग्य, असा प्रश्न आता उपस्थित केला जातोय.

Non Stop LIVE Update
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी.
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ.
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान.
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका.
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर.
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार.
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका.
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी.
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना.
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?.