Video : “गाणं बंद करण पडण नही तर नागोबा कोनलेच आवराई रायंता नही”, असा नाग होणे नाही!

सध्या सोशल मीडियावर एका नागिन डान्सची जोरदार चर्चा आहे. यात एक दारूच्या नशेत तल्लीन असलेला व्यक्ती नागिन डान्स करताना पाहायला मिळत आहे.

Video : गाणं बंद करण पडण नही तर नागोबा कोनलेच आवराई रायंता नही, असा नाग होणे नाही!
आयेशा सय्यद

|

May 19, 2022 | 6:32 PM

मुंबई : डीजेचा आवज घुमू लागला की लोक ठेका धरतात. डीजेच्या तालावर अनेकदा नागिन डान्स केला जातो. हा नागिन डान्स इतका फेमस आहे की कुठेही डीजेचा आवाज आला की लोक नागिन डान्सच करातात. या नागिन डान्सचे विविध व्हीडिओ सोशल मीडियावर पाहायला मिळतात. सध्या अश्याच एका नागिन डान्सचा व्हीडिओ सोशल मीडियावर व्हायरल होतोय.

व्हायरल व्हीडिओ

सध्या सोशल मीडियावर एका नागिन डान्सची जोरदार चर्चा आहे. यात एक दारूच्या नशेत तल्लीन असलेला व्यक्ती नागिन डान्स करताना पाहायला मिळत आहे. डीजेवर नागोबा डुलाया लागला हे गाण लागलं आहे. त्याचवेळी हा दारूडा जमीनीवर पडलेला पाहायला मिळतोय. जसं गाणं सुरू होतो तसा हा व्यक्ती नाचायला लागतो. नाचतो कसला गडागडा लोळायला लागतो. त्याला असं रस्त्यावर लोळता लोळता तो रस्त्यावरून खाली कोसळतो.अन् शेजारच्या शेतात जाऊन पडतो. शेजारच्या मक्याच्या शेतात जाऊन तो पडतो. त्याला उचलण्यासाठी गावातली मंडळी जातात. पण तो त्यांना जुमानत नाही. तो उभं राहून डान्स करण्याचा प्रयत्न करतो. पण दारू त्याला इतकी चढली आहे की त्याला स्वत:चा तोल सांभाळता येत नाही. तो वारंवार खाली पडतो.

शेवटी खरा ट्विस्ट!

या व्हीडिओचा खरा क्लायमॅक्स शेवटी आहे. नागिन गाण्यावर डोलणारा हा व्यक्ती कुणालाही जुमानत नाही पण शेवटी जेव्हा गाणं बंद होतं तेव्हा तो शांत होतो.

असा नाग होणे नाही!

हा व्हीडिओ अहिराणी जोक्स या फेसबुक पेजवरून हा व्हीडिओ शेअर करण्यात आला आहे. सोशल मीडियावर या व्हीडिओची सध्या जोरदार चर्चा आहे. असा नाग पुन्हा होणे नाही!, अशीच प्रतिक्रिया या व्हीडिओला पाहून पहिल्यांदा मनात येते. या व्हीडिओवर अनेकांनी कमेंट करत आपली प्रतिक्रिया दिली आहे. अनेक कमेंट या अहिराणी भाषेत पाहायला मिळत आहेत. एकाने तर या दारूड्याला नागिन डान्स ऑफ द इयरचा किताब देऊ केलाय. तर दारू उतरली की नाग शांत होईल अशी कमेंट यावर पाहायला मिळत आहे. याला पुरस्कार द्या असं एकाने म्हटलंय. तर पॉवर ऑफ टॅन्गो असं दुसऱ्याने म्हटलंय.

Follow us on

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें