Video : ‘DO YOU KNOW’ म्हणत एअर होस्टेसने केला दिलजीत दोसांझच्या गाण्यावर डान्स, नेटकरी म्हणतात…

दररोज सोशल मीडियावर हजारो व्हिडीओ व्हायरल होतात. मात्र, त्यापैकी अर्धापेक्षाही जास्त व्हिडीओ हे डान्सचे असतात. लोकांना विशेष करून डान्सचे व्हिडीओ अधिक प्रमाणात बघायला आवडतात. सध्या सोशल मीडियावर एक अतिशय सुंदर डान्सचा व्हिडिओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होताना दिसत आहे.

Video : ‘DO YOU KNOW’ म्हणत एअर होस्टेसने केला दिलजीत दोसांझच्या गाण्यावर डान्स, नेटकरी म्हणतात...
एअर होस्टेसचा डान्स सोशल मीडियावर व्हायरल
| Edited By: | Updated on: Jan 01, 2022 | 12:10 PM

मुंबई : दररोज सोशल मीडियावर (Social media) हजारो व्हिडीओ व्हायरल होतात. मात्र, त्यापैकी अर्धापेक्षाही जास्त व्हिडीओ हे डान्सचे असतात. लोकांना विशेष करून डान्सचे व्हिडीओ अधिक प्रमाणात बघायला आवडतात. सध्या सोशल मीडियावर एक अतिशय सुंदर डान्सचा व्हिडिओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होताना दिसत आहे. या डान्सचा व्हिडीओवर कमेंट आणि लाईकचा अक्षरसा पाऊस पडताना दिसत आहे.

एअर होस्टेसचा डान्स सोशल मीडियावर व्हायरल

या व्हिडीओमध्ये एअर होस्टेस दिसत आहे. स्पाइसजेटची एअर होस्टेस उमा मीनाक्षी जिचा याअगोदरच्या लेझी लाॅडवर डान्स करतानाचा व्हिडिओ सोशल मीडियावर ट्रेंड झाला होता आणि नुकताच तिने एक नवीन व्हिडीओ शेअर केला आहे. नवीन व्हिडिओमध्ये उमा एअरपोर्टवर दिलजीत दोसांझच्या गाण्यावर अप्रतिम डान्स करताना दिसत आहे. उमाने हा डान्स विमानतळावरच केला आहे.

व्हिडिओमध्ये तिने स्पाइस जेटचा ड्रेस घातला असून ती मोठ्या उत्साहाने डान्स करत आहे. या व्हिडिओला आतापर्यंत हजारो लाईक्स मिळाले आहेत, तसेच हा व्हिडिओ सोशल मीडियाच्या इतर प्लॅटफॉर्मवरही पाहायला मिळत आहे. याशिवाय तिने सोशल मीडियावर आणखी एक व्हिडिओ शेअर केला होता. ज्यामध्ये ती सोलो डान्स करताना दिसली होती. त्या व्हिडिओमध्ये ती ‘अखियां मिलून कभी…’ गाण्यावर डान्स करताना दिसत आहे.

संबंधित बातम्या : 

फोटो शेअर करत आनंद महिंद्रा म्हणाले 2021मधील हा सर्वोत्तम फोटो, पाहा नक्की काय आहे या फोटोमध्ये!

Viral video | माकड चाळे नक्की कशाला म्हणतात ‘हे’ पाहायचे आहे? मग हा व्हिडीओमध्ये बघाच!