
Airhostess Secrets : एखाद्या विमानात प्रवासात तुम्ही असाल तर हवाईसुंदरी अर्थात एअरहोस्टेस तुमच्या सीटजवळ येते आणि हसून विचारते सर/ मॅडम, चहा की कॉफी, तुम्हाला काय प्यायला आवडेल ? तुम्हीपण तुमच्या आवडीने एखादं पेय सांगता आणि मग तिने ते आणून दिल्यावर आनंदाने चहा किंवा कॉफी प्यायला लागता. पण जी एअरहोस्टेस तुम्हाला खूप अदबीने चहा कॉफीबद्दल विचारते, ते सर्व करते, ती स्वत: मात्र विमानात मिळणारी चहा-कॉफी पीतही नाही.
एअर होस्टेस कोणत्याही अडचणीत असली तरी तिला विमानात चहा किंवा कॉफी पिणे आवडत नाही. विमानात एअरहोस्टेस चहा किंवा कॉफी का पीत नाहीत याचे खरे कारण जर तुम्हाला कळलं, तर तुम्ही विमानात चहा आणि कॉफी पिणे र थांबवालच पण विमानात उपलब्ध असलेल्या पाण्यालाही स्पर्श करणार नाही. हो, या संदर्भात एक मोठा खुलासा एअरहोस्टेस सिएरा मिस्टने केला आहे. एअरहोस्टेस सिएरा मिस्ट ही केवळ एका परदेशी एअरलाइनची क्रू मेंबर नाही तर ती आता सोशल मीडिया सेलिब्रिटी आहे. तिच्या फक्त इंस्टाग्राम अकाउंटवर तिचे 584 हजार पेक्षा जास्त फॉलोअर्स आहेत.
विमानातील चहा कॉफी न पिण्याचं मोठं कारण
एअर होस्टेस सिएरा मिस्ट हिला जेव्हा जेव्हा संधी मिळते तेव्हा ती विमानांच्या गुपितांशी,सिक्रेटशी संबंधित व्हिडिओ बनवत राहते. अलीकडेच तिने विमानांमध्ये उपलब्ध असलेल्या कॉफी आणि चहावर एक व्हिडिओ बनवला आहे. या व्हिडिओमध्ये, सिएराने स्वतः खुलासा केला की, उड्डाणादरम्यान एअर होस्टेस या विमानात चहा आणि कॉफी पिणे टाळतात. तिच्य मते, याचे कारण म्हणजे, विमानात पाणी साठवले जाते ती जागा आहे. या साठवलेल्या पाण्यापासून प्रवाशांसाठी चहा किंवा कॉफी तयार केली जाते. तिच्या सांगण्यानुसार, विमानातील पाण्याची टाकी वर्षानुवर्षे स्वच्छ केली जात नाही, त्यामुळे कोणतीही एअर होस्टेस विमानात चहा किंवा कॉफी पिऊन तिचे आरोग्य खराब करू इच्छित नाही.
पाण्याच्या गुणवत्तेची नियमित तपासणी केवळ दिखावा
एअर होस्टेस सिएरा मिस्टचा दावा आहे की, अडचणीत असतानाही एअर होस्टेस विमानात कॉफी आणि चहा पिणे टाळतात. तिच्या व्हिडिओमध्ये, सिएरा मिस्टने फ्लाइट अटेंडंट्सचे असे रहस्य उघड करण्याचा दावा केला, ज्याची बाहेरील जग कल्पनाही करू शकत नाही. सिएरा मिस्टचा हा व्हिडिओ 1.22 लाख व्ह्यूअर्सनी लाईक केला आहे.
एयर होस्टेस सिएरा मिस्ट का दावा है कि किसी मुसीबत में होने के बावजूद एयरहोस्टेस प्लेन की कॉफी और चाय पीने से परहेज करती हैं. सिएरा मिस्ट अपने वीडियो में फ्लाइट अटेंडेंट के ऐसे सीक्रेट बताने दावा भी करती है, जिसके बारे में बाहर की दुनिया अंदाजा भी नहीं लगा सकती है. सिएरा मिस्ट के इस वीडियो को भी 1.22 लाख व्यूवर्स ने पसंद किया है. सिएरा मिस्टने तिच्या व्हिडिओमध्ये पुढे सांगितलं की, जरी विमान कंपन्या नियमितपणे पाण्याची गुणवत्ता तपासण्याचा दावा करत असल्या तरी, सत्य हे आहे की पाण्याच्या टाकीमध्ये काही सापडल्याशिवाय ती स्वच्छ करण्याची तसदी घेत नाहीत,अस तिने नमूद केलं. त्यामुळे जर सिएरा मिस्टचा दावा खरा असेल तर विमानात चहा किंवा कॉफी पिण्यापूर्वी तुम्हीही नक्की विचार करा.