AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

उडत्या विमानाचा अचानक दरवाजा उघडला, विमानात 25 जण! पाहा व्हिडीओमध्ये नेमकं काय घडलं

विमानाचा दरवाजा अचानक उघडल्याचा असाच एक प्रकार समोर आला आहे. याचा एक भयानक व्हिडिओही समोर आला आहे.

उडत्या विमानाचा अचानक दरवाजा उघडला, विमानात 25 जण! पाहा व्हिडीओमध्ये नेमकं काय घडलं
door of airplane opened in mid airImage Credit source: Social Media
Rachana Bhondave
Rachana Bhondave | Updated on: Jan 11, 2023 | 5:55 PM
Share

विमानाचे अनेक अपघात घडत राहतात बरेचदा या दुर्दैवी घटनांचे व्हिडिओ व्हायरल होत असतात. परंतु कल्पना करा की विमान हवेत टेकऑफ झाले आहे आणि त्यात प्रवासीही बसले आहेत. मग अचानक त्याचे दार उघडले तर काय होईल. विमानाचा दरवाजा अचानक उघडल्याचा असाच एक प्रकार समोर आला आहे. याचा एक भयानक व्हिडिओही समोर आला आहे.

वास्तविक, या विमानाने 9 जानेवारीला रशियाच्या सायबेरियन भागात असलेल्या मगन नावाच्या ठिकाणाहून उड्डाण केले होते. द मिररच्या ऑनलाइन रिपोर्टनुसार, हे विमान मगदानला जाणार होते.

मिळालेल्या माहितीनुसार, विमानात 25 प्रवासी आणि क्रू मेंबर्स होते. या विमानाने उड्डाण केले तेव्हा तिथे खूप थंडी पडली होती.

या विमानानं टेक ऑफ केलं, मगदानच्या दिशेने उड्डाण करताच त्याचा दरवाजा अचानक उघडला. आश्‍चर्यकारक बाब म्हणजे ज्या विमानाचा दरवाजा उघडा होता तोच सामान चढवण्या-उतरण्यासाठी वापरला जातो.

हा दरवाजा उघडताच वेगवान वाऱ्यामुळे विमानातील पडदे उडू लागले. त्यामुळे विमानातील तापमान कमालीचे घसरले.

विमानात उपस्थित असलेल्या एका प्रवाशाने या घटनेचा व्हिडिओ आपल्या मोबाईलमध्ये कैद केला. विमानात बसलेल्या प्रवाशांनी आरडाओरडा सुरू केला आणि त्यानंतर विमानाच्या पायलटने विमान उतरवण्याचा निर्णय घेतला.

सुदैवाने, विमान सुरक्षितपणे उतरले आणि त्यात बसलेले सर्व प्रवासी आणि इतर सदस्य सुरक्षित असल्याचे दिसून आले.

Follow Us
ठाणे कोपरी पोलीस ठाण्यात सिद्धू अभंगे यांना महिलांकडून मारहाण; नेमकं..
ठाणे कोपरी पोलीस ठाण्यात सिद्धू अभंगे यांना महिलांकडून मारहाण; नेमकं कारण काय?
दुष्काळातून तालुका वगळला, आता लोक... कार्यकर्त्याचा थेट भाजप खासदार...
दुष्काळातून तालुका वगळला, आता लोक... कार्यकर्त्याचा थेट भाजप खासदाराला फोन; नेत्याच्या उत्तराने सगळेच अवाक्
धर्मेंद्र प्रधान यांच्यानंतर ज्ञानेश कुमारांची विकेट पडणार? महिला...
धर्मेंद्र प्रधान यांच्यानंतर ज्ञानेश कुमारांची विकेट पडणार? महिला नेत्याच्या विधानाने खळबळ!
केंद्र सरकार 2000 वरील यूपीआय व्यवहारांवर शुल्क आकारणार
केंद्र सरकार 2000 वरील यूपीआय व्यवहारांवर शुल्क आकारणार. सर्वोच्च न्यायालयाने मागवले प्रतिज्ञापत्र
35 वर्षांच्या पाणी संघर्षानंतर तुळशी गावकऱ्यांनी घेतला टोकाचा निर्णय
Solapur : शेती उद्ध्वस्त, तरुण बेरोजगार अन्...; 30-35 वर्षांच्या पाणी संघर्षानंतर तुळशी गावकऱ्यांनी घेतला टोकाचा निर्णय...
यायचे असेल तर आमच्यात या, विलिनीकरणावर शरद पवारांचं मोठं विधान
Sharad Pawar : यायचे असेल तर आमच्यात या, विलिनीकरणावर शरद पवारांचं मोठं विधान, नेमकं काय म्हणाले?
मॅनहोलमध्ये काम करताना कामगाराचा मृत्यू
मॅनहोलमध्ये काम करताना कामगाराचा मृत्यू, मृतदेह स्वीकारण्यास कुटुंबीयांचा नकार
रकुल प्रीत , वासू भगनानी आयकर विभागाच्या रडारवर; अनेक ठिकाणी धाड
Video : रकुल प्रीत , वासू भगनानी आयकर विभागाच्या रडारवर; अनेक ठिकाणी धाड, सिनेमांच्याआड पैशांची लपवालपवी?
Video : पाणी प्रश्न ऐरणीवर, जिल्हाधिकारी कार्यालयावर विराट मोर्चा
Video : पाणी प्रश्न ऐरणीवर, जिल्हाधिकारी कार्यालयावर विराट मोर्चा
निवडणूक आयोगाने पक्षचिन्ह दिलं नाही तरी... विलिनीकरणाच्या विषयावर...
निवडणूक आयोगाने पक्षचिन्ह दिलं नाही तरी... विलिनीकरणाच्या विषयावर शरद पवारांचं मोठं विधान