Video : कन्व्हेयर बेल्ट पेपरमध्ये गुंडाळलेला मृतदेह?, एअरपोर्टवरचा व्हीडिओ व्हायरल

हा व्हीडिओ ViralHog इन्स्टाग्राम अकाऊंटवरून शेअर करण्यात आला आहे. या व्हीडीओला 90 हजारांहून अधिक व्ह्यूज मिळाले आहेत.

Video : कन्व्हेयर बेल्ट पेपरमध्ये गुंडाळलेला मृतदेह?, एअरपोर्टवरचा व्हीडिओ व्हायरल
| Edited By: | Updated on: May 23, 2022 | 6:43 PM

मुंबई : सध्या एक व्हीडिओने सोशल मीडियावर खळबळ माजवली आहे. हा व्हीडिओ सध्या सोशल मीडियावर वाऱ्याच्या वेगाने व्हायरल होतोय. विमानतळाच्या आत कन्व्हेयर बेल्टवर फॉइल आणि टेपने गुंडाळलेली एक वस्तू दिसत आहे. हे प्रेत असल्याचं बोललं जातंय. असं प्रेत एअरपोर्टवर दिसल्याने अनेकांना आश्चर्याचा धक्का बसलाय. कन्व्हेयर बेल्टवरील सामानाव्यतिरिक्त असा प्रकार पाहून अनेकजण हादरलेत.

व्हायरल व्हीडिओ

सध्या सोशल मीडियावर एक व्हीडिओ वाऱ्याच्या वेगाने व्हायरल होतोय. विमानतळाच्या आत कन्व्हेयर बेल्टवर फॉइल आणि टेपने गुंडाळलेली एक वस्तू दिसत आहे. हे प्रेत असल्याचं बोललं जातंय. असं प्रेत एअरपोर्टवर दिसल्याने अनेकांना आश्चर्याचा धक्का बसलाय. कन्व्हेयर बेल्टवरील सामानाव्यतिरिक्त असा प्रकार पाहून अनेकजण हादरलेत.

वास्तव काय आहे?

व्हायरल होणारा हा व्हीडिओ अनेकांनी पाहिला आहे. त्यामुळे एक प्रकारचं कुतुहल निर्माण झालं आहे. प्रेतासारखं दिसणारं हे नेमकं काय आहे? याविषयी अनेक तर्कवितर्क लावले जात आहेत. पण व्हीडीओमध्ये दिसणारी ही वस्तू नेमकी काय आहे? तर हे कोणतंही प्रेत नसून कपड्याच्या दुकानात ठेवला जाणारा पुतळा आहे. त्याला असं कन्व्हेयर बेल्ट पेपरमध्ये गुंडाळेलं पाहून अनेकांना ते प्रेत असल्याचा भास झाला पण वास्तव वेगळं आहे. हे कोणतंही प्रेत नसून कपड्याच्या दुकानात ठेवला जाणारा पुतळा आहे.

हा व्हीडिओ ViralHog इन्स्टाग्राम अकाऊंटवरून शेअर करण्यात आला आहे. या व्हीडीओला 90 हजारांहून अधिक व्ह्यूज मिळाले आहेत. तर साडे सहा हजारांहून अधिकांनी त्याला लाईक केलंय. या व्हीडीओवर अनेकांनी कमेंट करून प्रतिक्रिया दिल्या आहेत. मला वाटलं हा मृतदेह आहे, असं एका नेटकऱ्याने म्हटलंय. तर बापरे हा व्हीडिओ खूप घाबरवणारा आहे, वास्तव वेगळं आहे, असं दुसऱ्याने म्हटलंय.