मुकेश अंबानींच्या नातवाचं नामकरण, आकाश-श्लोकाच्या बाळाला मुंबईकर क्रिकेटपटूचं नाव

मुकेश अंबानींचे पुत्र आकाश अंबानी आणि श्लोका मेहता यांच्या बाळाचा जन्म 10 डिसेंबरला मुंबईत झाला

मुकेश अंबानींच्या नातवाचं नामकरण, आकाश-श्लोकाच्या बाळाला मुंबईकर क्रिकेटपटूचं नाव
Follow us
| Updated on: Dec 24, 2020 | 11:48 AM

मुंबई : ‘रिलायन्स’ उद्योग समूहाचे सर्वेसर्वा मुकेश अंबानी (Mukesh Ambani) आणि नीता अंबानी (Neeta Ambani) यांच्या नातवाचं नामकरण करण्यात आलं आहे. आकाश अंबानी (Akash Ambani) आणि श्लोका मेहता (Shloka Mehta) यांनी आपल्या बाळाच्या नावाची अधिकृत घोषणा केली. अंबानी कुटुंबाच्या नव्या वारसदाराचं पृथ्वी (Prithvi) असं नाव ठेवण्यात आलं आहे. 10 डिसेंबरला अंबानी कुटुंबात बाळाचं आगमन झालं. (Ambani family reveals the name of Mukesh Ambani Grandson Akash and Shloka Son)

‘भगवान श्रीकृष्णाची कृपा आणि आशीर्वादांमुळे श्लोका आणि आकाश अंबानी यांच्या मुंबईतील घरी मुलाने जन्म घेतला’ अशी घोषणा अंबानी कुटुंबाने केली होती. अंबानी कुटुंबात आकाश हे नाव आधीच असल्यामुळे मुलाचे नाव पृथ्वी ठेवल्याचे बोलले जाते. सध्या मुंबईचा युवा क्रिकेटपटू पृथ्वी शॉच्या नावाचा सगळीकडे बोलबाला आहे. पृथ्वीने विक्रमादित्य सचिन तेंडुलकरच्या विक्रमांनाही गवसणी घातली होती. आता अंबानींचा पृथ्वी आपल्या नावाचा डंका जगभर वाजवेल, अशी कुटुंबाला खात्री आहे.

पणजीकडून नावाची घोषणा

‘भगवान श्रीकृष्णाच्या कृपेने धीरुभाई अंबानी यांच्या आशीर्वादांनी कोकिलाबेन अंबानी यांना पृथ्वी आकाश अंबानीच्या जन्माची घोषणा करताना आनंद होत आहे. बाळाचे आई-बाबा श्लोका आणि आकाशही आनंदी आहेत. बाळाच्या नावाची घोषणा करताना आजी-आजोबा मुकेश अंबानी आणि नीता अंबानी तसेच मोना आणि रसेल मेहता अत्यंत खुश आहेत’ असं अंबानी कुटुंबातर्फे बाळाचं नाव जाहीर करताना लिहिण्यात आलं आहे.

मुकेश अंबानींसोबतचा फोटो हिट

गोंडस नातवाला हातात धरला असतानाचा मुकेश अंबानींचा फोटो काही दिवसांपूर्वी सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. ज्युनिअर अंबानीच्या आगमनानंतर त्यांच्या अँटिलिया निवासस्थानी निळ्या रंगाची रोषणाई करण्यात आली होती.

आकाश-श्लोकाचा ग्रँड विवाह सोहळा

आकाश अंबानी आणि श्लोका मेहता यांचा साखरपुडा जून 2018, तर विवाह मार्च 2019 मध्ये झाला होता. लग्नाला राजकारण, क्रीडा आणि मनोरंजन विश्वातील दिग्गज व्यक्तींची उपस्थिती होती. ब्रिटनची माजी पंतप्रधान टोनी ब्लेयर आणि गूगलचे सीईओ सुंदर पिचाईही लग्नासाठी मुंबईला आले होते.

संबंधित बातम्या :

मुकेश अंबानी आजोबा झाले, अंबानी कुटुंबात छोट्या पाहुण्याचे आगमन

(Ambani family reveals the name of Mukesh Ambani Grandson Akash and Shloka Son)

Non Stop LIVE Update
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग.
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?.
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?.
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद.
दोनशे रूपये घ्या, पण... ठाकरेंच्या सभेसाठी आलेल्या लोकांकडून विनंती
दोनशे रूपये घ्या, पण... ठाकरेंच्या सभेसाठी आलेल्या लोकांकडून विनंती.
ज्या आईने तुम्हाला जन्म... राऊतांच्या त्या टीकेवर राणांची प्रतिक्रिया
ज्या आईने तुम्हाला जन्म... राऊतांच्या त्या टीकेवर राणांची प्रतिक्रिया.
म्हणून योग्य नेत्याला मतदान करा, तृतीयपंथीयांचं मतदरांना आवाहन काय?
म्हणून योग्य नेत्याला मतदान करा, तृतीयपंथीयांचं मतदरांना आवाहन काय?.
गुलाबी मतदान केंद्र कधी पाहिलंय? पिंक पोलिंग बूथची खासियत काय?
गुलाबी मतदान केंद्र कधी पाहिलंय? पिंक पोलिंग बूथची खासियत काय?.
आधी बजावला मतदानाचा हक्क मगच चढला बोहल्यावर, त्या नवदेवाची होतेय चर्चा
आधी बजावला मतदानाचा हक्क मगच चढला बोहल्यावर, त्या नवदेवाची होतेय चर्चा.
लोकशाहीच्या उत्सवाला प्रारंभ,विदर्भात 5 जागांवर पहिल्या टप्प्यात मतदान
लोकशाहीच्या उत्सवाला प्रारंभ,विदर्भात 5 जागांवर पहिल्या टप्प्यात मतदान.