मुकेश अंबानी आजोबा झाले, अंबानी कुटुंबात छोट्या पाहुण्याचे आगमन

आशिया खंडातील सर्वात श्रीमंत कुटुंब असलेल्या अंबानींच्या घरी नव्या पाहुण्याचं आगमन झालं आहे.

मुकेश अंबानी आजोबा झाले, अंबानी कुटुंबात छोट्या पाहुण्याचे आगमन
Follow us
| Updated on: Aug 03, 2023 | 12:57 PM

मुंबई : आशिया खंडातील सर्वात श्रीमंत कुटुंब असलेल्या अंबानींच्या घरी नव्या पाहुण्याचं (Mukesh Ambani Became Grandfather) आगमन झालं आहे. रिलायन्स इंडस्ट्रीचे मालक मुकेश अंबानी आजोबा आणि पत्नी नीता अंबानी आजी झाल्या आहेत. त्यांची सून श्वोकाने गुरुवारी सकाळी 11 वाजता एका गोंडस मुलाला जन्म दिला. त्यामुळे अंबानी कुटुंबात आनंदाचं वातावरण आहे. मुकेश अंबानींचा मुलगा आकाश आणि श्लोकाचा विवाह 9 मार्च 2019 ला झाला होता (Mukesh Ambani Became Grandfather).

एकीकडे कोरोना काळात मुकेश अंबानी यांनी जियो प्लॅटफॉर्म्सवर बक्कळ पैसा कमावला. दुसरीकडे, त्यांच्या नातवाचा जम्न झाला, त्यामुळे मुकेश अंबानींचा आनंद गगनात मावेनासा झाला आहे.

कोरोनाच्या काळात आर्थिक समस्येने ग्रासल्याने देश-जगातील अनेक मोठ्या कंपन्या रस्त्यावर आल्या. मोठं आर्थिक नुकसान त्यांना भोगावं लागलं. तिथे रिलायन्स ग्रूप मात्र फायद्यात राहिला. रिलायन्स जियोना यावर्षी आपली भागीदारी विकून तब्बल पाच लाख कोटी रुपये मिळवले.

आकाश-श्लोकाचा ग्रँड लग्न सोहळा

आकाश अंबानी आणि श्लोका यांचं लग्न माध्यमांमध्ये खूप चर्चेत राहिलं. आकाश आणि श्लोका यांचा 9 मार्च 2019 ला लग्न झालं. दोघेही शाळेपासून एकमेकांना ओळखत होते. आकाश आणि श्लोका हे शाळेपासूनचे मित्र आहेत. त्यांनी धीरुभाई अंबानी इंटरनॅशनल शाळेतून आपलं शिक्षण पूर्ण केलं. श्लोकाने लंडनच्या स्कूल ऑफ इकोनॉमिक्स अँड पॉलिटिकल सायन्स येथून तिने लॉमध्ये पदव्युत्तर शिक्षण केलं आहे (Mukesh Ambani Became Grandfather).

अंबानी कुटुंबात छोट्या पाहुण्याचे आगमन

रिलायन्सच्या प्रवक्त्यांनी दिलेल्या माहितीनुसार, “मुकेश अंबानी यांच्या कुटुंबात आज सकाळी एका छोट्या पाहुण्याचं आगमन झालं. आकाश अंबानी आणि श्लोकाच्या घरी आज सकाळी मुलाचा जन्म झाला आहे. आई आणि बाळाची प्रकृती स्थिर आहे. अंबानी कुटुंबासाठी हा एक अत्यंत खास क्षण आहे.”

Mukesh Ambani Became Grandfather

संबंधित बातम्या :

मुकेश अंबानी यांचा दिवाळी धमाका, देशातील शेतकऱ्यांसाठी महत्त्वपूर्ण निर्णय

मुकेश अंबानींना मोठा झटका!, फोर्ब्स बिलेनियर्सच्या यादीत अंबानीची ९व्या स्थानी घसरण

50 लाख ते 200 अब्ज डॉलरपर्यंतचा प्रवास, मुकेश अंबानींच्या यशाचं रहस्य उघड

Non Stop LIVE Update
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी.
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ.
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान.
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका.
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर.
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार.
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका.
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी.
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना.
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?.