AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

मृतदेह पुरायला गेले अन्…संपूर्ण कुटुंबाचाच जीव धोक्यात, स्मशानभूमीत थरारक घटना!

सध्या एक अजब आणि विचित्र घटना समोर आली आहे. या घटनेत मृत व्यक्तीचा अंत्यविधी करताना तिचं संपूर्ण कुटुंबच संकटात सापडलं आहे.

मृतदेह पुरायला गेले अन्...संपूर्ण कुटुंबाचाच जीव धोक्यात, स्मशानभूमीत थरारक घटना!
america viral video
| Edited By: | Updated on: Apr 10, 2025 | 7:30 PM
Share

Viral Video : सोशल मीडियावर कधी काय व्हायरल होईल, हे सांगता येत नाही. सध्या अमेरिकेतील एक धक्कादायक व्हिडीओ समोर येत आहे. या व्हिडीओत अंत्यस्कारासाठी आणलेल्या एका व्यक्तीसोबत तिचे सर्वच कुटुंबीय कबरीत पडल्याची घटना घडली आहे. या घटनेचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर सगळीकडेच व्हायरल होत आहे.

नेमकं काय घडलं?

मिळालेल्या माहितीनुसार ही घटना अमेरिकेतील फिलाडेल्फिया येथील आहे. डेली मेलने यासंदर्भातील वृत्त दिले आहे. या वृत्तानुसार 21 मार्च रोजी बेंजामिन एविलेस (Benjamin Aviles) यांचा मृत्यू झाला होता. मृत्यूनंतर त्यांच्या अंत्यस्काराची तयारी केली जात होती. त्यांना एका शवपेटीत ठेवून दफनविधीसाठी नेले जात होते. मात्र ज्या ठिकाणी शव पुरण्यासाठी खड्डा खोदलेला होता. त्याच खड्ड्यात मृत व्यक्तीचे सर्व कुटुंबीय पडले आहेत.

अचानकपणे जमीन घसरली अन्….

मृत व्यक्तीला अंत्यसंस्कार करण्यासाठी ग्रीनमाउंट नावाच्या स्मशानभूमीत नेले जात होते. यावेळी शोकाकूल कुटुंबीय शवपेटीसोबत होते. ते शवपेटीला उचलून दफणविधीच्या ठिकाणी नेत होते. मात्र अचानकपणे दफणविधीच्या ठिकाणची जमीन घसरली आणि सर्वच कुटुंबीय शवपेटीसोबतच दफणविधीच्या खड्ड्यात जाऊन पडले. यात अनेकजण जखमी झाले आहेत.

कुटुंबीयाकडू प्रशासनावर टीका, कारवाईची मागणी

ही घटना घडल्यानंतर मृत व्यक्तीच्या कुटुंबीयांनी स्मशानभूमीच्या प्रशासनाला जबाबदार धरले आहे. या दुर्घटनेत मृत व्यक्तीचा मुलगा जखमी सर्वाधिक जखमी झाला आहे. कारण या मुलाच्या अंगावर मृत व्यक्तीची शवपेटी पडली होती. मृत व्यक्तीची सावत्र मुलगी मॅरिबेल रोड्रिगेज हिने तर स्मशानभूमीच्या प्रशासनावर कठोर कारवाई करावी, अशी मागणी केली आहे.

दरम्यान, या घटनेचा व्हिडीओ सध्या सगळीकडेच मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. एक्स या सोशल मीडिया साईटवर हा व्हिडीओ @CollinRugg या अकाऊंटवरून शेअर करण्यात आला आहे हा व्हिडीओ आतापर्यंत 63 लाख लोकांनी पाहिला आहे.

Follow Us
ते सर्व आरोपी अजूनही... संजय राऊतांचं पोलिस अधिकाऱ्यांसमोर मोठं विधान
Sanjay Raut At Thane : ते आरोपी अजूनही... संजय राऊतांचं पोलिस अधिकाऱ्यांसमोर मोठं विधान
तर काय करणार? प्रदीप पूर्णेकर प्रकरणी संजय राऊतांचा आक्रमक पवित्रा...
तर काय करणार? प्रदीप पूर्णेकर प्रकरणी संजय राऊतांचा आक्रमक पवित्रा; कापूरबावडी पोलीस ठाण्यात नेमकं काय घडतंय?
MPSC च्या विद्यार्थ्यांसाठी सर्वात मोठी बातमी!CM फडणवीसांच्या बैठकीत..
MPSC च्या विद्यार्थ्यांसाठी सर्वात मोठी बातमी! CM फडणवीसांच्या बैठकीतील ‘हे’ 5 महत्त्वाचे निर्णय
सचिन वाझेचा तुरुंगात मुक्काम वाढला; नेमकं कारण काय?
Sachin Waze | सचिन वाझेचा तुरुंगात मुक्काम वाढला; नेमकं कारण काय?
गडचिरोलीतील लेकाची गगनभरारी! थेट 'लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स'मध्ये निवड
गडचिरोलीतील लेकाची गगनभरारी! थेट 'लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स'मध्ये निवड
धक्कादायक! विमानात वैमानिकांचा वाद, थेट हल्ला नंतर विमान क्रॅश...
धक्कादायक! विमानात वैमानिकांचा वाद, थेट हल्ला नंतर विमान क्रॅश करण्याचा प्रयत्न: पुढे जे घडलं ते...
भोंदू अशोक खरातला मोठा झटका! गंभीर फसवणूक प्रकरणात कोर्टाचे महत्त्वाचे
भोंदू अशोक खरातला मोठा झटका! गंभीर फसवणूक प्रकरणात कोर्टाचे महत्त्वाचे निर्देश काय?
मातोश्री'वर राजकीय हालचालींना वेग! आधी विभागप्रमुखायंची बैठक नंतर...
मातोश्री बंगल्यावर राजकीय हालचालींना वेग! आधी विभागप्रमुखायंची बैठक नंतर राऊत आणि नार्वेकर... नेमकं काय घडतंय?
सुप्रीम कोर्टाच्या कार्यपद्धतीवर इंडिया आघाडी नाराज; थेट दिला इशारा...
सुप्रीम कोर्टाच्या कार्यपद्धतीवर इंडिया आघाडी नाराज; थेट दिला इशारा आता...
ठाण्यात प्रदीप पुर्णेकर प्रकरणी कुटुंबीयांचा पोलीस ठाण्यासमोर ठिय्या,
ठाण्यात प्रदीप पुर्णेकर प्रकरणी कुटुंबीयांचा पोलीस ठाण्यासमोर ठिय्या, जोपर्यंत...