Video : चक्क ऑटो मेकॅनिकने गायले सुंदर गाणे,आनंद महिंद्रांची कृती पाहून नेटकरी फिदा!

सोशल मीडियावर (Social media) दररोज हजारो व्हिडीओ व्हायरल होतात. सोशल मीडिया एक असे व्यासपीठ आहे जिथे कोणताही व्हिडिओ किंवा पोस्ट येताच ते व्हायरल होते. मात्र, सोशल मीडियावर असे काही व्हिडीओ शेअर केले जातात की, ते पाहून आपल्याला विश्वासच बसत आहे.

Video : चक्क ऑटो मेकॅनिकने गायले सुंदर गाणे,आनंद महिंद्रांची कृती पाहून नेटकरी फिदा!
व्हायरल व्हिडीओ
| Edited By: | Updated on: Dec 31, 2021 | 10:45 AM

मुंबई : सोशल मीडियावर (Social media) दररोज हजारो व्हिडीओ व्हायरल होतात. सोशल मीडिया एक असे व्यासपीठ आहे जिथे कोणताही व्हिडिओ किंवा पोस्ट येताच ते व्हायरल होते. मात्र, सोशल मीडियावर असे काही व्हिडीओ शेअर केले जातात की, ते पाहून आपल्याला विश्वासच बसत आहे. आनंद महिंद्रा (Anand Mahindra) हे देखील सोशल मीडियावर खूप सक्रिय असतात. ते आपल्या चाहत्यांसाठी नेहमीच अनेक पोस्ट शेअर करतात.

आनंद महिंद्रा यांनी शेअर केला खास व्हिडीओ

नुकताच आनंद महिंद्रा यांनी एक व्हिडीओ शेअर केला आहे. ज्यामध्ये एका व्यक्तीने गाणे गाऊन सर्वांची मने जिंकली आहेत. आनंद महिंद्रा सोशल मीडियावर खूप सक्रिय असतात आणि दररोज आपल्या पोस्टने मन जिंकत असतात. ते ट्विटरवर बरेच मजेदार आणि प्रेरणादायी व्हिडिओ शेअर करतात. नुकताच त्यांनी एका दिव्यांग मेकॅनिकचा व्हिडिओ शेअर केला आहे. इतकेच नव्हेतर त्याची स्टाइल पाहून त्याला नोकरीची ऑफरही दिली आहे.

या व्हिडीओमध्ये मेकॅनिकने त्याच्या सुमधूर आवाजाने सर्वांना भूरळ पाडली आहे. आता हा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होताना दिसत आहे. आनंद महिंद्रा यांनी त्यांच्या ट्विटर अकाऊंटवर हा व्हिडिओ शेअर केला आहे. व्हिडिओ शेअर करताना त्याने कॅप्शनमध्ये लिहिले की, प्रत्येक कलाकार प्रथम हौशी असतो. एमर्सन या व्यक्तीच्या गॅरेजमध्ये वाहनांचे काम केले जाते, परंतु त्याचे टॅलेंट त्याला सुकूनचे गॅरेज देत आहे.

ऑटो मेकॅनिकने गायले दोस्ती चित्रपटातील गाणे

या व्हिडीओ लाईक आणि कमेंट मोठ्या प्रमाणात मिळत आहेत. ‘दोस्ती’ चित्रपटातील ‘आवाज मैं ना दूंगा’’ हे गाणे तो गात आहे. लोकांना हे गाणे खूप आवडत असून मेकॅनिकचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे. हा व्हिडिओ आतापर्यंत लाखो लोकांनी पाहिला आहे आणि त्या व्यक्तीचे कौतुक केले आहे. एका युजर्सने व्हिडीओला कमेंट करत लिहिले की, ही एक अद्भुत व्यक्ती आहे.

संबंधित बातम्या : 

VIDEO : रेड सिग्नलवर हेल्मेट बॉयचा बँग बँग गाण्यावर खास डान्स, व्हिडिओ पाहून लोक म्हणाले हाच रियल डान्सर!

Video | चित्त्याच्या समोरून माणसाने खेचली शिकार, चवताळलेल्या चित्त्याने काय केले? व्हिडीओ पाहून थरकाप उडेल!