Video | बाण मारला अन् थेट अंगठीत घुसला, धडाकेबाज तिरंदाजाची दमदार कामगिरी, व्हिडीओ पाहाच

या मंचावर लोक कुकिंग, सिंगिंग, डान्सिंगचे व्हिडीओ शुट करुन ते सोशल मीडियावर अपलोड करतात. मात्र, सध्या समाजमाध्यमावर एक धडाकेबाज तिरंदाज व्हायरल होतोय. त्याने डोळ्यांचे पारणे फेडणारी तिरंदाजी करुन दाखवली आहे.

Video | बाण मारला अन् थेट अंगठीत घुसला, धडाकेबाज तिरंदाजाची दमदार कामगिरी, व्हिडीओ पाहाच
| Edited By: | Updated on: Jun 20, 2021 | 8:30 PM

मुंबई : सोशल मीडियावर रोज हजारो व्हिडीओ व्हायरल होतात. लोक कुकिंग, सिंगिंग, डान्सिंगचे व्हिडीओ शूट करुन ते सोशल मीडियावर अपलोड करतात. नंतर हेच व्हिडीओ चर्चेचा विषय़ ठऱतात. सध्या समाजमाध्यमावर एक धडाकेबाज तिरंदाज व्हायरल होतोय. त्याने डोळ्यांचे पारणे फेडणारी तिरंदाजी दाखवली आहे. (Archer surprisingly shoot arrow in ring video went viral on social media)

Josh O’Dell हे तिरंजादीमध्ये पारंगत

सध्या व्हायरल होत असलेल्या तिरंदाजाचे नाव Josh O’Dell असे आहे. Josh O’Dell हे तिरंजादीमध्ये अतिशय पारंगत आहेत. दर्शकांना काहीही समजायच्या आत ते आपल्या लक्ष्याला भेदतात. सध्या व्हायरल होत असलेला व्हिडीओ पाहून त्यांच्या परफेक्ट टायमिंगचे नेटकऱ्यांनी कौतूक केले आहे.

अंगठी हवेत फेकल्यानंतर बाण मारला

या व्हिडीओमध्ये सुरुवातीला Josh O’Dell यांनी त्यांच्या हातातील धनुष्यावर एक अंगठी ठेवली आहे. त्यानंतर Josh O’Dell यांनी ही अंगठी हवेत फेकली आहे. व्हिडीओमध्ये काय होत आहे सुरुवातीला समजत नाही. मात्र नंतर Josh O’Dell यांनी अंगठी हवेत फेकल्यानंतर थेट अंगठीमधून बाण मारला आहे. नंतर मारलेल्या बाणामुळे ही अंगठी थेट समोरच्या बोर्डामध्ये फसली आहे.

पाहा व्हिडीओ :

व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल

दरम्यान, Josh O’Dell हे सोशल मीडियावर arrow sniper या नावाने ओळखले जातात. जोश त्यांच्या  इन्स्टाग्रामच्या अकाऊंटवर तिरंदाजीचे थरारक व्हिडीओ अपलोड करतात. जोश यांच्या तिरंदाजीचे सर्वच व्हिडीओ पाहण्यासारखे आहेत.

इतर बातम्या :

Video | नवरदेव लग्न विधीमध्ये गुंतला, नवरीचा पाणीपुरीवर ताव, हटके व्हिडीओ एकदा पाहाच

Video | एकाकीपणा घालवण्यासाठी तरुणाचा जबरदस्त जुगाड, नेटकरी म्हणतायत हा तर सर्वोत्तम उपाय !

Video | ‘मैं शराबी हूं’ गाण्यावर तरुण थिरकला, हावभाव पाहून सोशल मीडियावर धुमाकूळ

(Archer surprisingly shoot arrow in ring video went viral on social media)