‘अजमा फसाद बक’ औरंगजेबाचे ते अखेरचे शब्द…ठरले खरे, त्याची मुलं, नातवांचं काय झालं पुढे? अशी रक्तरंजीत कहाणी तुम्ही वाचली नसेल कुठे

Azma Fasad Baq Aurangzeb : इतिहासातील सर्वात क्रूरकर्मा शासक म्हणून बाबर नंतर औरंगजेबाकडे पाहिले जाते. अत्यंत पाताळयंत्री, धोकेबाज, धर्मवेडा म्हणून तो ओळखल्या जातो. त्यांचे अखेरचे शब्द होते 'अजमा फसाद बक', त्याचे हे भाकीत खरं ठरले.

अजमा फसाद बक औरंगजेबाचे ते अखेरचे शब्द...ठरले खरे, त्याची मुलं, नातवांचं काय झालं पुढे? अशी रक्तरंजीत कहाणी तुम्ही वाचली नसेल कुठे
उत्तराधिकाऱ्यांविषयीचे भाकीत ठरले खरे
Image Credit source: गुगल
| Updated on: Apr 10, 2025 | 3:56 PM

औरंगजेबाच्या कबरीवरून महाराष्ट्राच नाहीतर भारतात वातावरण तापले होते. अनेकांनी त्याची कबर खोदण्याचा नारा दिला तर काहींनी मराठ्यांना हरवण्यासाठी आलेला हा पाताळयंत्री मुघल शासक महाराष्ट्राच्या मातीत गाडल्या गेला म्हणून कबर न हटवण्याची भूमिका घेतली. इतिहासातील सर्वात क्रूरकर्मा शासक म्हणून बाबर नंतर औरंगजेबाकडे पाहिले जाते. अत्यंत पाताळयंत्री, धोकेबाज, धर्मवेडा म्हणून तो ओळखल्या जातो. त्यांचे अखेरचे शब्द होते ‘अजमा फसाद बक’, त्याने त्याच्या पिढ्यांसाठी अत्यंत समर्पक असे शब्द वापरले होते. त्याचे हे भाकीत खरं ठरले.

‘अजमा फसाद बक’ म्हणजे काय?

छत्रपती संभाजी महाराज यांना झुकवण्याचा प्रयत्न व्यर्थ गेला. मराठ्यांचे साम्राज्य अंकित करता आले नाही. 20 वर्षे दक्षिणेत तळ ठोकूनही काहीच हाती न लागल्याने औरंगजेब पुरता निराश झाला होता. त्यातच त्याला मरण जवळ असल्याची जाणीव झाली होती. आपल्यानंतर कोण शासक होईल, कोण उत्तराधिकारी असेल याविषयी तो संभ्रमात होता. त्याला मोठी चिंता लागलेली होती. अहिल्यानगर येथे त्याची छावणी पडली होती. त्याचवेळी मरणाच्या दारात त्याने ‘अजमा फसाद बक’ हे शब्द उच्चारले होते.

‘अजमा फसाद बक’ म्हणजे माझ्यानंतर आता केवळ अराजकता ती शिल्लक राहिल. केवळ रक्तरंजित इतिहास घडेल. तख्तासाठी मारामार्‍या होतील. मुडदे पडतील. भांडणं होतील. अस्थिरता माजेल. त्याचे हे अखेरचे शब्द खरे ठरेल. जणू मरणाच्या दारात औरंगजेबाला त्याच्या वंशाचा, त्याच्या मुलांचे, नातवांचे भविष्य दिसले होते. त्याने जे पेरले तेच उगवले होते.

मार्च 1707 मध्ये क्रूरकर्माचा मृत्यू

औरंगजेबाचा मार्च 1707 मध्ये वयाच्या 88 व्या वर्षी मृत्यू झाला. अहिल्यानगरजवळ त्याचा मृत्यू झाला. त्याच्या अखेरच्या इच्छेनुसार, त्याच्या गुरूच्या समाधीजवळ त्याला गाडण्यात आले. त्याची कबर तयार करण्यात आली. इतिहासातील नोंदीनुसार, औरंगजेबाला तीन बेगमपासून 9 मुलं होती. मोहम्मद सुलतान, बहादुर शाह, आजम शाह, सुलतान मोहम्मद अकबर आणि मोहम्मद कामबख्श हे त्याचे पुत्र होते. तर चार मुली होत्या. औरंगेजाबाच्या मृत्यूनंतर सत्तेसाठी या भावांमध्ये युद्ध सुरू होते. त्यात औरंगजेबाची मुलं आणि मुली सुद्धा ठार करण्यात आल्या.

मोहम्मद सुलतान : हा औरंगजेबाचा पहिला मुलगा होता. त्याने बापाविरोधातच काकाच्या मदतीने बंड केले होते. त्याला पकडून तुरूंगात डांबण्यात आले. पुढे 1676 मध्ये सलीमगडच्या किल्ल्यात त्याचा मृत्यू झाला.

बहादूर शाह : हा दुसरा मुलगा होता. औरंगजेबाने मृत्यूपूर्वी 1707 मध्ये आजम शाह याला उत्तराधिकारी जाहीर केले होते. त्यावेळी बहादूर शाह हा लाहोर येथे होता. अब्बाजान गेल्याचे कळताच त्याने सत्तेसाठी कत्तलेआम सुरू केला. आजम शाह आणि त्याच्या दोन मुलांना ठार केले. तर औरंगजेबाचा सर्वात लहान पुत्र काम बख्श याची लढाईत हत्या केली.

अकबर : औरंगजेबाचा चौथा मुलगा शहजादा अकबर हा पूर्वपासूनच बापाच्या विरोधात होता. त्याला दिल्ली खुणावत होती. त्याने राजपूतांच्या मदतीने बंडाळी केली. पण औरंगजेबाने राजपूतांवर दबाव तंत्राचा वापर केला. त्यानंतर अकबर दक्षिणेत मराठ्यांच्या आश्रयाला आला. येथे ही तो थांबला नाही. पुढे 1704 मध्ये त्याचा मृत्यू झाला.

बहादूर शाहचे हाल : सर्वांशी बंडाळी करून बहादूर शाह बादशाह झाला. पण त्याचे अतोनात हाल झाले. औरंगजेबाच्या मृत्यूनंतर अवघ्या पाच वर्षांतच 1712 मध्ये बहादूर शाहचा मृत्यू झाला. त्याला जहांदार शाह, अजीमुशान, रफीउशान आणि जहानशाह अशी चार मुलं होती. त्यांच्यात सत्तेसाठी लढाई सुरू झाली. इकडे बहादूर शाह याचा दफनविधी होण्यासाठी 10 आठवड्यांचा कालावधी लागला. जहांदार शाह हा नंतर मुघल सम्राट झाला.