AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

बाबा जॅक्सनला नाचताना पाहिलं आहे का? लोक म्हणतात, “शिलाई मशीन”

सोशल मीडियावर त्यांच्या डान्सशी संबंधित व्हिडिओ अनेकदा व्हायरल होत असतात. जगात असे अनेक लोक आहेत जे त्यांच्या डान्सची कॉपी करताना दिसतात.

बाबा जॅक्सनला नाचताना पाहिलं आहे का? लोक म्हणतात, शिलाई मशीन
Baba jacksonImage Credit source: Social Media
Rachana Bhondave
Rachana Bhondave | Updated on: Feb 11, 2023 | 1:43 PM
Share

मायकल जॅक्सनला कोण ओळखत नाही? लोक त्यांना ‘किंग ऑफ पॉप’ म्हणूनही ओळखत होते. त्याच्या गाण्यांचे आणि नृत्याचे जगाला वेड लागले होते. विशेषत: नृत्याच्या बाबतीत त्यांच्याशी स्पर्धा करू शकणारे त्यावेळी कोणीच नव्हते. मायकेल जॅक्सनचा डान्स खूप अनोखा होता, जो लोकांना आजही पहायला आवडतो. सोशल मीडियावर त्यांच्या डान्सशी संबंधित व्हिडिओ अनेकदा व्हायरल होत असतात. जगात असे अनेक लोक आहेत जे त्यांच्या डान्सची कॉपी करताना दिसतात. त्यातील काही खरोखरच मायकेल जॅक्सनचे प्रतिबिंब आहेत. ‘बाबा जॅक्सन’ हा देखील त्यापैकीच एक आहे, ज्याचा डान्स व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे.

बाबा जॅक्सन खरंतर एक मुलगा आहे, ज्याचे खरे नाव युवराज सिंग आहे. तो त्याच्या उत्कृष्ट नृत्यासाठी ओळखला जातो. त्याच्या डान्सशी संबंधित वेगवेगळे व्हिडिओ सोशल मीडियावर अनेकदा व्हायरल होत असतात.

सध्या व्हायरल होत असलेल्या व्हिडिओमध्ये बाबा जॅक्सनने इतका जबरदस्त डान्स केला आहे की तो पाहून लोकही थक्क झाले आहेत. किती अप्रतिम पद्धतीने त्यांनी आपल्या पायांचा वापर केला आहे.

शिलाई मशीन वेगाने धावत असल्याचे दिसत आहे. कुठल्याही प्रोफेशनल डान्सरसाठी त्यांच्या हात-पायाचा वापर सर्वात महत्त्वाचा असतो आणि बाबा जॅक्सनमध्ये ही कला भरलेली आहे.

हा भन्नाट डान्स व्हिडिओ स्वत: बाबा जॅक्सनने आपल्या आयडीवरून सोशल मीडिया प्लॅटफॉर्म इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे, ज्याला आतापर्यंत 6.6 मिलियन वेळा पाहिले गेले आहे, तर 66 लाख 6 हजारांहून अधिक लोकांनी हा व्हिडिओ लाइक देखील केला आहे.

त्याचबरोबर लोकांनी व्हिडिओ पाहून वेगवेगळ्या प्रतिक्रियाही दिल्या आहेत. कुणी त्याच्या डान्सचं कौतुक करतंय, तर कुणी गंमतीने ‘या भावाला काय प्रॉब्लेम आहे’ असं म्हणतंय. त्याचप्रमाणे आणखी एका युजरने लिहिलं, ‘टेलरलेस शिलाई मशीन’, तर दुसऱ्या युजरने अशाच मजेशीर अंदाजात लिहिलं, ‘हायवे ब्रेकरवर अशी गाडी धावते’.

Follow Us
परभणीत दूध पेढीवर FDAची धडक कारवाई! रिशा मिल्क अँड मिल्क प्रोडक्ट्स...
FDA Raid | परभणीत दूध पेढीवर FDAची धडक कारवाई! रिशा मिल्क अँड मिल्क प्रोडक्ट्सचा अन्न परवाना निलंबित
गणेशोत्सवाआधी BMCचा मोठा निर्णय! रस्ते-पदपथ अडवणाऱ्या जाहिरात...
Mumbai | गणेशोत्सवाआधी BMCचा मोठा निर्णय! रस्ते-पदपथ अडवणाऱ्या जाहिरात फलकांवर बंदी; उल्लंघन केल्यास कारवाई होणार
पाईप दिसला नाही अन् काळाचा घाला! नाशिकमध्ये भीषण अपघात
Nashik | पाईप दिसला नाही अन् काळाचा घाला! नाशिकमध्ये भीषण अपघात; संतप्त नागरिकांचा महापालिकेत ठिय्या
बिकानेरच्या रसमलाईत चक्क बुरशी! कामोठ्यात धक्कादायक प्रकार समोर
Navi Mumbai | बिकानेरच्या रसमलाईत चक्क बुरशी! कामोठ्यात धक्कादायक प्रकार समोर; दुकान मालकाने चूक मान्य करत...
मध्य रेल्वेची लोकल सेवा ठप्प! कल्याण स्थानकवरून प्रवाशांवर भर पावसात..
Mumbai Local | मध्य रेल्वेची लोकल सेवा ठप्प! कल्याण स्थानकवरून प्रवाशांवर भर पावसात रुळावरून पायी चालण्याची आली वेळ
अमित शाहांनी मुंबईतून दिली दोन मोठी अपडेट! सेवा संकल्प अभियानची घोषणा
Amit Shah | अमित शाहांनी मुंबईतून दिली दोन मोठी अपडेट! सेवा संकल्प अभियानची घोषणा, पुढे म्हणाले...
नांदेडमध्ये दुष्काळग्रस्तांची दहीहंडी! दीड महिन्यापासून पाऊस गायब...
Nanded | नांदेडमध्ये दुष्काळग्रस्तांची दहीहंडी! दीड महिन्यापासून पाऊस गायब; शेतकऱ्यांनी चौकात मांडली करपलेल्या पिकांची व्यथा
जरांगेंना विखे पाटलांची कळकळीची विनंती! चर्चेतून मार्ग काढू...
Radhakrishna Vikhepatil | जरांगेंना विखे पाटलांची कळकळीची विनंती! चर्चेतून मार्ग काढू... मराठा आरक्षणावर मोठी अपडेट समोर
तोंडाला पाने पुसण्यापेक्षा कोर्टात टिकणारं आरक्षण हवं!
Shivendraraje Bhonsle | तोंडाला पाने पुसण्यापेक्षा कोर्टात टिकणारं आरक्षण हवं! शिवेंद्रराजे भोसले स्पष्टच बोलले, पुढे म्हणाले...
संजय राऊतांचा अमित शाहांवर फंड कलेक्शनचा आरोप; बन यांचा सडेतोड पलटवार
Sanjay Raut Vs Navnath Ban | संजय राऊतांचा अमित शाहांवर फंड कलेक्शनचा आरोप; नवनाथ बन यांचा सडेतोड पलटवार, मुंबई दौऱ्यावरून वार- पलटवार सुरूच